Daily Quiz # २५४
विद्यमान इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांच्या लहान भावाचा ठीक ४१ वर्षांपूर्वी एका अशक्य कोटी आणि अत्यंत थरारक सैनिकी कारवाईत मृत्यू झाला. या सैनिकी कारवाईचे नाव काय ?
उत्तर : ऑपरेशन एंटेबी
२७ जुन १९७६, दुपारी साडेबाराला 'एअर फ्रांसचे' उड्डाण संख्या A १३९ हे एअरबस ३०० विमान ग्रीस मधिल अथेन्स विमानतळाहून पॅरीसला जाण्याकरीता उडाले. इज्राइल मधिल 'तेल अवीव' येथून निघालेल्या या विमानात २४८ प्रवासी व १२ हवाई कर्मचारी होते.
विमानात मुख्यतः इज्राईल, फ्रांस, ग्रीक, अमेरीका, इंग्लंड तसेच इतर देशातील नागरीक प्रवास करीत होते. विमान अवकाशात झेपावताच अवघ्या काही वेळातच विमानाला २ पॅलेस्तीनी आणि २ जर्मन अतिरेक्यांनी अपह्रुत केले. पैकी २ अतिरेकी 'Popular Front for the Liberation of Palestine – External Operations' आणि उर्वरीत २ 'German Revolutionary Cells' या संघटनांशी संबंधीत होते.
अपह्रुत विमानाला लिबिया मधे बांगझेईला(अवांतर -बांगझेइ काही महिन्यांपूर्वी गद्दाफीमूळे बाताम्यांत होते.) उतरविण्यात आले. तिथे विमानात इंधन भरून तब्बल ७ तासांनी म्हणजे पहाटे ३ला विमान युगांडामधे एंटेबी विमानतळावर उतरविण्यात आले. दरम्यान बांगझेइला एका महिला प्रवाश्याला तिने गर्भपात झाल्याचे सांगितल्याने(बतावणी केल्याने) सोडून देण्यात आले होते.
एंटेबीला या ४ अतिरेक्यांना आणखी ४ अतेरेकी येऊन मिळाले. त्यांना युगांडचे तत्कालीन राष्ट्र्पती इदी अमीन यांचा पूर्ण पाठींबा होता.
विमानाला सोडण्यासाठी अतिरेक्यांनी इज्राइअलमधे बंदी असलेले ४० व इतर देशांतील १३ असे एकूण त्रेपन्न पॅलेस्तीनी जणांच्या सुटकेची मागणी ठेवली तसे न केल्यास १ जुलै पासून सर्व बंधकांना मारण्याची धमकी दिली.
अतिरेक्यांनी बंधकांना इज्राईली नागरीक व ईतर अशा दोन गटात विभागले. पुढील एक आठवडा या सर्व बंधकांना विमानतळातील एका खोलीत ठेवण्यात आले होते. दरम्यान परत काही बंधकांना सोडण्यात आले पण तरी तब्बल १०६ बंधक अजुनही अतिरेक्यांच्या ताब्यात होते.
अतिरेक्यांनी त्यांचा मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास उर्वरीत बंधकांना मारण्याची परत धमकी दिली. त्याचबरोबर फ्रांसहून आलेल्या विशेष विमानानी विमानातील कर्मचारी व ज्यू लोकांव्यतिरीक्त इतर बंधकांना जाण्याची मुभा देण्यात आली. ही घोषणा ऐकताच मुख्य वैमानीक मायकेल बाकोस याने 'विमानासकट सर्व प्रवासी हे माझी जबाबदारी असल्याने' विमान सोडण्यास तीव्र निषेध केला. इतर कर्मचार्यांनी सुद्धा त्याला अनुमोदन दिले. या कर्मचार्यांव्यतिरीक्त एक फ्रेंच धर्मोपदेशीकेनीपण विमान सोडण्यास नकार दिला पण तीला बळजबरीने एअर फ्रांसच्या विमानात चढविण्यात आले.
आता विमानात ८५ ज्यू आणि २० इतर असे एकूण कर्मचारी मिळून १०५ जण शिल्लक राहिलेत. या मुक्त केलेल्या बंधकात एक 'फ्रेंच ज्यु' प्रवासीपण चुकून मुक्त झाला होता. हा प्रवासी सैनिकी प्रशिक्षण घेतलेला असल्याने त्याने अतिशय महत्वपूर्ण व नेमकी माहिती मोसादला पुरविली.
वाटाघाटी
मधिल एक आठवड्यात इज्राइलनी राजकीय पातळीवरून वाटाघाटी सुरू केल्या होत्या. सोबतच सैनिकी कारवाईचीपण तयारी चालविली होती. पण ही अतिशय धाडसी आणि महत्वाकांक्षी सैनिकी कारवाई जर अयशस्वी झालीच तर अतिरेक्यांची मागणी पूर्ण करण्याची मानसिक तयारीपण ठेवली होती.
इज्राइल सेनेतून निवृत्त झालेल्या एक बड्या अधिकार्याचे इदी अमीन बरोबर असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेऊन त्यालापण अमीनसोबत बोलणी करायला लावले पण प्रयत्न निष्फळ झाला. तसेच अमेरीकेकरवी इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अन्वर सादत यांचीसुद्धा अमीनशी बोलणी करण्याबद्दल विनवणी केली गेली.
या सर्व निष्फळ प्रयत्नात १जुलै उजाडला.
इज्राइललने अतिरेक्यांना वाटाघाटी करण्यासाठी मुदत ४ जुलै पर्यंत वाढवण्याची विनंती केली जिला इदी अमीन यांनीसुद्धा धूर्त पाठींबा दर्शविला. पण या पाठींब्याचे कारण पात्र वेगळे होते. या मुदतीत अमीनचा मॉरीशसला जाउन 'Organisation of African Unity' या संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रं सिवसागर रामगुलाम यांना सोपविण्याचा मनसुबा होता. हे तीन दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरलेत.
३ जुलैला इज्राइली मंत्रीमंडळानी सैनिकी कारवाईला परवानगी दिली . या मिशनची मुख्य जबाबदारी मेजर जनरल येकुतीएल कुती अॅडम व मातान विलनाई यांचेवर तर ब्रिगेडीयर जनरल डान शोमरोन यांना खर्या कारवाईची कमान सोपविण्यात आली. हे सगळं घडत असताना सुद्धा राजकीय पातळीवरून प्रयत्न सुरूच होते. इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांची शिष्टाईपण मदत करू शकली नाही.
अभियानाची तयारी व आखणी
मोसाद या इज्राइली शासकीय गुप्तहेर संस्थेने एंटेबी विमानतळाची हुबेहूब प्रतीकृती बनविण्याची तयारी चालविली होती. हे करताना मुक्त केल्या गेलेल्या बंधकांचीपण मदत घेतली गेली. त्याचबरोबर या विमानतळच्या बांधकामात ज्या इज्रायली कंपनीने मदत केली होती त्यांनापण पाचारण करण्यात आले. या बांधकामात ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता त्यांना बोलावून एक गोष्ट सांगितली गेली ती ही की प्रतिकृती पूर्ण झाल्यावर त्यांना जोपर्यंत अभियान पूर्ण होणार नाही तो पर्यंत राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तिथेच राहावे लागेल.
अभियानाची योजना करताना एक गोष्ट निश्चीत झाली की बहुतांश आफ्रिकन देशांची सहानुभूती इज्राइली बंधकांसोबत असली तरी प्रत्यक्षात इदी अमीनच्या विरोधात इज्राइलच्या संभावित कारवाईत मदत करायाला कोणाताही देश धजावणार नव्हता.
आता पंचाइत अशी होती की इज्राइलने या अभियानाकरीता निवडलेल्या लोकहीड सी १३० हर्क्युलीस विमानाला इतका लांबचा पल्ला पुन्हा इंधन भरल्याखेरीज साधणे कठीण होते. सोबतच इतक्या दुरवर हवेतच ५-६ विमानांना इंधन पूरविणे शक्य नव्हते. प्रतिकूल गोष्टींची यादी बरीच लांब होती. इतकी सगळी शस्त्रास्त्रे विमानातून घेऊन जाताना ज्या देशाची सीमा ओलांडायची होती त्या- त्या देशांची संमती आवश्यक होती अन्यथा या कृतीकडे चिथवणी समजून संबंधीत देशांकडून प्रत्युत्तर मिळण्याची दाट शक्यता होती.
याशिवाय एकातरी पूर्व आफ्रिकन देशाची सीमा ओलांडल्याखेरीज एंटेबीला पोचणे शक्य नव्हते. त्यातल्या त्यात केनिया थोडा अधिक सौम्य असल्याने केनियातील एका बड्या इज्राइली हॉटेल उद्योजकाने केनियन सरकारची मनधरणी करून इज्राइलला केनियाची सीमा वापरण्याची परवानगी मिळवून दिली सोबतीलाच 'Jomo Kenyata International Airport' या विमानातळावर इंधन भरण्याची अनुमती पण मिळवली.
ही सर्व सज्जता करून ३ जुलैच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत ४ लोकहीड सी १३० हर्क्युलीस विमानांनी एंटेबीच्या दिशेनी कूच केले.
गटांची विभागणी
१०० इज्राइली कमांडो हे ३ गटात विभागल गेले होते.
१.भूदल नियंत्रण तुकडी
या छोटेखानी तुकडीत ब्रि. ज. शोम्रोन, प्रसारण व सहाय्यक सैनिकांच ताफा होता.
२. हल्लाबोल गट
ले.क. योनातन नेतनयाहु यांच्या नेतृत्वात 'सियेरात मत्कल' या इज्राइल्च्या २९ ब्लॅक कमांडोंचा गट. याची मुख्य जबाबदारी म्हणजे जुन्या विमानतळाला उध्वस्त करणे आणि बंधकांची सुखरूप सुटका. यांची परत दोन गटांमधे विभागणी केल्या गेली होती. मेजर बेत्सर व मतन विलनाइ हे त्या गटांचे प्रमुख.
३. 'रिएंफोर्समेंट टीम'
अ. जागा सुरक्षित करणे, इज्राइली विमानांना शत्रुपासुन सुरक्षित ठेवणे व सुटका कीलेल्या बंधकांना विमानात चढविणे.
ब. युगांडा वायु सेनेच्या मिग फायटर विमानांना नष्ट करणे जेणेकरून ते परतीला पाठलाग करण्यास असमर्थ होतील.
क. विमानात इंधन भरण्यात मदत करणे.
परिक्षेचा दिवस
एंटेबीचा मार्ग शर्म - अल - शेख वरून अंतरराष्ट्रीय हवाई मार्गानी लाल समुद्रावरून जार्णारा होता. या मार्गावरून जाताना उडाणाची उंची अवघ्या १०० फुटांवर ठेवण्यात आली होती जेणेकरून इजिप्त, सुदान आणि सौदी अरेबीयाला याचा सुगावा लागणार नाही. लाल समुद्राच्या दक्षिण निकासावर हा ताफा परत दक्षिणेकडे वळून डिजबोटी मार्गे ईशान्येकडे नैरोबीकडे मार्गक्रमण करू लागला. या मार्गात सोमालीया, इथिओपीआ ओलांडून आफ्रिकन रिफ्ट दरी व विक्टोरीया तलावावरून उडाला.
दोन बोइंग ७०७ विमाने मालवाहू विमानांच्या मागोमाग उडडत होती. पैकी वैद्यकीय सुविधा असलेलं पहीलं बोइंग नैरोबी विमानतळावर उतरलं. तर दुसरं बोइंग (जन. येकुतीएल अॅडम असलेलं) कारवाई सुरू असताना एंटेबी विमानतळावर घिरट्या घालत राहीलं.
रात्री ११ वाजता इज्राइली फौजा एंटेबी विमानतळावर उतरल्या. उतरण्यापूर्वीच विमानाचे कार्गो दरवाजे हवेतच उघडण्यात आले होते. विमान उतरताच त्यामधून काळी मर्सीडीज व सोबतीला लॅड रोव्हर्सचा ताफा चपळाइनी बाहेर आला व मुख्य ईमारतीकडे मार्गक्रमण करू लागला.
ही खेळी युगांडन फौजांना गुंगारा देण्यासाठी होती. जणू युगांडन राष्ट्राध्यक्ष अमीन परदेशी दौरा करून परत आलेत व इतर उच्च अधिकारी सोबत आहेत असे भसवण्यासाठी. या गाड्यांमधून हल्लाबोल गट वेगानी ईमार्तीकडे झेपावला. पण एक चूक झाली काही दिवसापूर्वीच अमीन यानी काळी मर्सीडीज सोडुन पांढरी मर्सीडीज ताफ्यात सामील केली होती व याची कल्पना तेथिल सुरक्षा रक्षकांना असल्याने त्यांनी हा काफीला थांबवण्यास सांगताच त्यांना 'सायलेंसर' बसविलेल्या बंदूकीने फैरी झाडण्यात आल्या.
जसे ते पुढे जऊ लागले लँड रोव्हर मधील कमांडोंना ते रक्षक मेलेले नसुन जिवंत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ रायफलनी गोळ्या झाडून त्यांना मारले पण या रायफलला सायलेंसर न्हवता. त्यामूळे या जोराच्या आवाजानी मिशन फसू नये म्हणून कमांडोंनी लगेच मोटारीबाहेर उड्या घेतल्या.
बंधक सुटका
सर्व बंधक धावपाट्टीलगतच्या ईमारतीच्या मुख्य खोलीत होते, कमांडो आत शिरताच हिब्रू व इंग्रजीतून ओरडू लागले " खाली बसा आम्ही इज्रायली सैनीक आहोत" एक बंधक उभा राहाताच त्याला चुकून अतिरेकी समजून मारण्यात आले. कारवाई सुरू होतच बंधकांच्या खोलीत शिरलेला अतिरेक्याने बंधकांना शौचालयात आश्रय घेण्यास सांगीतले. "बाकीचे अतिरेकी कुठे आहेत?"कमांडो ओरडले त्यासरशी बंधकांनी दुसर्या खोलीकडे बोट दाखविले कमांडोनी लगेच तिकडे काही ग्रेनेड भिरकावले व क्षणाता आत घुसून इतर ३ अतिरेक्यांना कंठस्नान घातले.
अशाप्रकारे मुख्य हल्ला संपला होता. याच दरम्यान उर्वरीत ३ मिग विमानातून बंधकांना विमानांपर्यंत नेण्यासाठी चिलखती गाड्या उतरल्या. या गाड्यांचा उपयोग इंधन भरताना बचावासाठी व युगांडन वायु दलाच्या विमानांना नष्ट करण्यासाठीपण झाला.
परतीची वाट
सुटका केलेल्या बंधकांना विमानात चढ्विताना युगांडन सैनिकांनी प्रतिहल्ला चढविला. याला सडेतोड प्रत्यत्तर देण्यात आले पण असे करताना योनातन नेतन्याहू यांच्या छतीत गोळी घुसून ते मरण पावले. या व्यतिरीक्त ५-६ कमांडोसुद्ध जखमी झाले. हे अभियान एकूण ५३ मिनीटे चालले. यात सर्व अतिरेकी ठार झाले तसेच ४०-४५ युगांडाचे सैनिक व ११ युगांडन वायु सेनेची मिग विमाने उध्वस्त केली गेली. १०६ बंधकांपैकी ३ ठार झाले, १० जखमी तर एका बंधकाला युगांडात सोडून देण्यात आले. नंतर याचा वचपा म्हणून अमीन यांनी युगांडात वस्तव्यास असलेल्य शेकडो केनियन नागरीकांची कत्तल घडविली.
जागतीक प्रतिक्रीया
चिडलेल्या युगांडने संयुक्त राष्ट्रसंघच्या सुरक्षा समितीची बैठक बोलावून इज्राएल विरूद्ध निंदाप्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उत्तर देताना इज्राइली राजदूतानी अतिशय समर्पक व बाणेदार उत्तर दिले, "आम्ही या समितीपुढे सरळ संदेश घेउन आलो आहोत : आम्ही जे काही केलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण आम्ही जागाला दाखवून दिलं की इज्राइल सारखा एक छोटासा देश, ज्याला या परिषदेतील सगळे सदस्य ओळखतात, त्याच्यासाठी मानवी स्वाभिमान, जीवन आणि स्वातंत्र्य ही सर्वोच्च मूल्ये आहेत. आम्हाला शेकडो स्त्री, पुरूष व बालकांचा जीव वाचविल्याचा जितका अभिमान आहे त्याहून जास्त अभिमान मानवी स्वातंत्र्यासाठी केलेल्या धाडसाचा आहे".
साहाजिकच हा प्रस्ताव पार झाला नाही. संपूर्ण पाश्चिमात्य देशांनी या धाडसी कृतीबद्दल इज्राएलची पाठराखण केली. योगायोगानी कारवाईचा दिवस ४-जुलै -१९७६ आणि अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहिरनामा प्रसिद्ध झाल्याचा २०० वा वर्धापनदीन एकाच दिवशी आलेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सचिवांनी या हल्ल्याची 'राष्ट्रसंघाच्या सदस्याच्या सार्वभौमिकतेवरील हल्ला म्हनून निर्भत्सना केली'. अरब व कम्युनिस्ट देशांनीपण या घटनेची निंदा केली.
संधी मिळूनसुद्धा विमान न सोडल्याबद्दल एअर फांसच्या वैमानिकाला सक्त ताकीद देउन सेवेतून निलंबीत केलं गेलं. या वैमानिकाला पुढे जाऊन फ्रांसचा सर्विच्च बहुमान ' National Order of the Legion of Honour' तर इतर कर्मचार्यांना 'French Order of Merit' ह सम्मान प्रदान केला गेला.
पुढे या धर्तीवर आधारीत कमांडोंचा एक गट अमेरिकेनीसुद्धा तयार केला. या संपूर्ण रोमहर्षक, धाडसी अभियानावर बेतलेले कित्तेक चित्रपट बनविले गेले.
आजही जगातील अत्यंत जिकरीच्या, अशक्य कोटितील साहसाची परीसीमा गाठणर्या अभियानांच्या यादीत 'ऑपरेशन एंटेबीला' मानाचं अढळ स्थान आहे.
या घटनेवर आधारित raid on entebbe हा Hollywood चा चित्रपट पहाण्या सारखा आहे
यावरील पुस्तक :
मराठी - किबुत्झ मधला डॅनी इथे आला होता - अनंत सामंत
English - 90 Minutes at Entebbe.