Daily Quiz # २५९
शहाजीराजे आदिलशहाच्या कैदेत असताना मोगलांच्या कोणत्या शहजाद्या मार्फत शिवरायांनी शहाजहानशी संधान बांधले?
उत्तर :- मुराद
मुस्तफाखानाने बाजी घोरपडेला शाहाजी राजांवर पाठवून २५-७-१६४८ च्या पहाटे दगाबाजीने कैद केले. अफझलखानाने त्यांना विजापूरला आणले. पुढे आदिलशाही सरदारांशी शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात लढाया होउन आदिलशाही सरदार पराभूत झाले.
शहाजीराजे आदिलशहाच्या कैदेत असताना मोगलांच्या कोणत्या शहजाद्या मार्फत शिवरायांनी शहाजहानशी संधान बांधले?
उत्तर :- मुराद
मुस्तफाखानाने बाजी घोरपडेला शाहाजी राजांवर पाठवून २५-७-१६४८ च्या पहाटे दगाबाजीने कैद केले. अफझलखानाने त्यांना विजापूरला आणले. पुढे आदिलशाही सरदारांशी शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात लढाया होउन आदिलशाही सरदार पराभूत झाले.
बंडखोर
शहाजीला चांगली शिक्षा करण्याचे शहाचे विचार चालू असतां आणि तो विजापुरास येऊन
दाखल होतो तोंच, त्याच्या दोघां मुलांनीं स्वपराक्रमाने दोन भिन्न प्रदेशांत विजापुरी
फ़ौजेचा निभाव होऊ दिला नाही, हें वर्तमान दरबारात आल्यावर पुढे काय करावें
याचा विचार शहास पडला. इकडे यत्किंचित् माघार घेण्याचा प्रसंग वडिलांवर येऊ
न देतां आपण त्यांची सुटका करु अशी धमक शिवाजीराजास होती, म्हणूनच त्या संबंधाने
बाह्य उपाय त्यांनी चालविले. शहजादा मुरादबक्ष मोगल सुभेगिरीवर होता, त्यास
शिवरायांनी पत्र लिहून त्याचे मार्फत शहाजीराजेंच्या सुटकेचा इलाज सुरू केला. या
पत्रास ता. १४-३-१६४९ चा जबाब शहाजाद्याकडून आला कीं, “तुमचा इतबारी
वकील बोलणे करण्यास पाठवा .’ त्यावर शिवरायांनी काहीच जबाब पाठविला नाहीं ।
तेव्हां शहजाद्याने पुनः त्यांस ता. १४-८-१६४९ ला पत्र पाठवले कीं तुम्ही
हुजर यावे म्हणजे मनसब व इनाम दिल्हा जाईल.’ याचेही उत्तर शिवरायांनी पाठविलें
नाही, त्या वरून ता. ३-११-१६४९ चे शहजाद्याचे पत्र शहाजीराजास आलें कीं
तुमची मोकळिक करण्याविषयीं शिवजीने लिहिले आहे. हल्ली आम्ही दिल्लीकडेस जात
आहें. हुजूर पावल्यावर तुमचेविषयीं अर्ज करून बंदोबस्त करून देऊ. तुमचा इतबारी
वकील पाठत्रावा. तुम्हांकरितां पोषाख पाठविला आहे.’ याच तारखेचं शिवजीराजांसही
मुरादचे पत्र आले की ‘जुन्नर व अहमदनगर येथील देशमुखविषयी तुम्ही
लिहिले त्यास हुजूर गेल्यानंतर हा मजकूर घडोन येईल, ही खातरजमा ठेवावी.
आपणाकडील एक वकील पाठवावा म्हणजे काम होण्यास दिरंग लागणार नाही.
या वरून स्पष्ट आहे की मोगलांकडे वशिला लावून शहाजीच्या सुटकेचा प्रयत्न
शिवाजीराजांनी केला. त्या वरून मोगल बादशहापाशीं या पितापुत्रांचे वजन भारी आहे
आणि हे जाऊन मोगलांस सामील झाल्यास आपणांवर कठिण प्रसंग ओढवेल अशी
आदिलशहाची खात्री झाली.
दुसरी एक भीति शहाला होती की, शहाजी पुत्र संभाजी व श्रीरंगराय वगैरे हिंदु
सत्ताधीश, ज्यांना शहाजीवल मोठा आदर वाटत होता, ते सर्व एक होऊन कर्नाटकांत मिळविलेला प्रदेश हिसकावून घेतील; आणि मावळांतही शिवाजीराजांची बंडखोरी
वाढेल. अशी संकटे मुद्दाम ओडून आणण्यापेक्षां शहाजीराजांनाच समजुतीने वळवून
प्रकरण मिटविण्यांत राज्याचे हित आहे ही गोष्ट शइस पटली. मुस्ताफाखानाचे
मरणाने दरबारांतला कट्टर पक्ष बहुतेक नरमला होता. अफझलखानासारखे शहाजीराजांना
पायांत पाहणारे कित्येक होते, त्यांचे वजन खान महंमद वजिरापुढे चाललें नाहीं.
No comments:
Post a Comment