Daily Quiz # २५६
निजामशाहीतील प्रसिद्ध राज्यकर्ती स्त्री चांदबीबी हिचा खून कोणी व कधी केला?
उत्तर :- हमीदखान, अहमद नगर राजवाड़ा
इ.स.१५९९ मध्यें मोगल शहजादा दानियल हा पुन्हां अहमदनगरावर चालून आला. त्यावेळीं चांदबिबीनें कोणाही दरबारी इसमावर विश्वास न ठेवतां आपल्या स्वत:च्या विचारानें या आलेल्या संकटाचा परिहार करण्याचा संकल्प केला. पण मोंगली सैन्य प्रचंड असल्यामुळें त्याशीं टक्कर देण्याचें सामर्थ्य निजामशाही सैन्यांत बिलकुल राहिलें नव्हतें. तेव्हां चांदबिबी हिनें युक्तीनें तह करून, बालवयात आलेल्या बादशहासह जुन्नरास जाण्याचा विचार मनांत आणिला. परंतु निजामशाही सरदारांमध्येच दुफळी होऊन त्यांनीं चांदबिबीवर छुपा हल्ला करण्याचा निर्णय घेतला व इकडे किल्ल्याच्या बाहेर मोंगल सैन्याशीं लढाई चालू असतांच हमीदखान नामक एका पठाण सरदारानें तिचा अहमदनगर किल्ल्याच्या राजवाड्यांत खून केला ( सन १५९९ ).

shahajirajani nizam vansh wachawila to kadhi?
ReplyDelete