Daily Quiz # २५१
अतिरिक्त (surplus) उत्पन्नाची निर्मिती आणि वितरण याबद्दल अर्थव्यवस्थेची प्रतिकृती सर्वप्रथम बनवणार अर्थशास्त्रज्ञ कोण ?
उत्तर - फ्रँस्वा केने
फ्रँस्वा केने चा जन्म ४ जून १६९४ रोजी व्हर्साय जवळील मेरे येथे झाला.
केनेने जगातली सर्वात पहिली 'टाब्लु इकॉनॉमिक' नावाची अर्थव्यवस्थेची प्रतिकृती बनवली. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त उत्पन्न अर्थात सरप्लस किती निर्माण होतो त्यावर आर्थिक वाढ अवलंबून असते. हा सरप्लस कसा निर्माण होतो आणि त्याचे वितरण किंवा डिस्ट्रिब्युशन कसे होते तसेच अर्थव्यवस्थेतील सर्व विभागांचा एकमेकांशी काय संबंध असतो याचे सविस्तर विवेंचन सर्वप्रथम केने ने केले.
केने वयाच्या तेराव्या वर्षीच अनाथ झाला, अकराव्या वर्षापर्यंत तर त्याला वाचताही येत नव्हते. १७१७ साली सर्जरीत मास्टर्स डिग्री मिळवून त्याने प्रॅक्टिस सुरू केली पण डोळ्यात झालेल्या बिघाडाने त्याने सर्जन ऐवजी फिजिशीयन व्हायचे ठरवले. १७४४ साली त्याने मेडिसिन मध्ये डॉक्टरेट मिळवली आणि तो फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस चा सभासद झाला. त्याने पंधराव्या लुईचा वैद्यकीय सल्लागार म्हणूनही काम केले. वयाच्या ६०व्या वर्षांपर्यंत केने चा अर्थशास्त्राशी काहीच संबंध नव्हता. दी गुर्ने या अर्थतज्ञ-उद्योजकाशी मैत्री झाल्यावर केने अर्थशास्त्राकडे वळला. पैसा आणि वस्तू यांच्या चक्राकार प्रवाहाविषयी केनेने आपली मते मांडली. ही कल्पना त्याला रक्ताभिसरणा वरून सुचली असे त्याने लिहून ठेवलेय. बचत करणं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हानिकारक असत, त्यामुळे बचत केलेला पैसा अर्थव्यवसंस्थेच्या चक्रीय प्रवाहातून बाहेर पडतो आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न कमी होते असा विचार केने ने मांडला. व्यापार, कारखानदारी आणि वाहतूक यामुळे वस्तूंचे आकार आणि त्यांची मालकी बदलते पण त्यामुळे नवीन काही निर्माण होत नाही असे त्याचे मत होते.
१६ डिसेंबर १७७४ रोजी केनेचे निधन झाले. पण त्याच्या टाब्लु इकॉनॉमिक मुळे अर्थशास्त्रात त्याचे नाव अजरामर झाले आहे.

No comments:
Post a Comment