Wednesday, 28 June 2017

मोडीलिपीचे वर्गिकरण कोणत्या चार कालखंडात केले जाते ?

Daily Quiz # २४७

प्रश्न :- मोडीलिपीचे वर्गिकरण कोणत्या चार कालखंडात केले जाते ?

उत्तर :- यादवकालिन, शिवकालिन, पेशवेकालिन,आंग्लकालिन या चार कालखंडात केले जाते

मोडी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात
१२६० - १३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला.

छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बालबोध ( देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ई्स्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यानी केली. उर्दूप्रमाणे मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वापरून कमीतकमी ओळीत सारांश लिहिला जातो.

मोडीतली अक्षरांची वळणे गोलाकार (circular) असतात, त्यांमध्ये मराठीच्या विपरीत, काना खालून वर जातो. यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते. तसेच प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते. मोडी लिपीत चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणे प्रसिद्ध आहेत. पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला असे मानले जाते. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून इतिहास संशोधनाकरिता मोडी जाणकारांची कमतरता भासते.

मोडी लिपीचा इतिहास
मोडी लिपीचा नमुना - हे पत्र सवाई माधवराव पेशवे यांनी सेनापती महादजी शिंदे यांस ३०-१२-१७८४ रोजी लिहिले होते
मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते व मतभेद आहेत. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते मोडी लिपी अशोककालातील मौर्यी(ब्राह्मी)चाच एक प्रगत प्रकार आहे. वाकणकर आणि वालावलकरांच्या मते मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिण्याच्या तिच्या वैशिष्ट्यामुळे इतर लिपींपेक्षा वेगळी झाली आहे. मोडी लिपी श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही. [पहा: Typography Of Devanagari, १९६१, मुद्रक: महाराष्ट्र सरकार.]

मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात आहे. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे. मोडी लिपी अल्पप्रमाणात का होईना, १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती. शेवटच्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७००च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रांतील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.

मोडी लिपी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवाजी महाराजांचा काळ ते उत्तर पेशवाई ह्या काळांतील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे लक्षात येतात व मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मताप्रमाणे

ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या काळात मोडी संकल्पना महाराष्ट्रात येत होती. याच काळात पहिले मुस्लिम आक्रमण भारतात होत होते. लिखाणाकरिता कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण कागज हा फ़ार्सी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही. इतिहासाचार्य राजवाडे ज्ञानेश्वरीतील खाली नमूद केलेल्या ओव्यांचा आधार देतात.
देवनागरी अक्षरे आडव्या, उभ्या आणि टोकदार रेषांचा अवलंब करते त्यामुळे लिखाणाच्या हस्तलिखित प्रति बनवताना वेग कमी होतो. तर
शिकस्त प्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरून वापरली जाणारी मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती. विराम चिन्हांचा वापर इंग्लिश भाषाशी ओळख झाल्यानंतरच भारतीय लिपींत सुरू झाला.

मराठी लेखनाबद्दल ज्ञानेश्वरांनी खालील ओळीत उल्लेख केला आहे. :-
१]हे बहु असो पंडीतु , धरुणु बालकाचा हातु,
वोळी लेहे वेगवंतु, आपणाची॥(ज्ञानेश्वरी अध्याय १३,ओवी क्र.३०७)
२]सुखाची लिपी पुसिली ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ३,ओवी क्र.३४६)
३]दोषांचीं लिहिलीं फाडीं ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ४,ओवी क्र.५२)
४]आखरे पुसलिया ना पुसे, अर्थ जैसा ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ८,ओवी क्र.१७४)
इ.स. १८०१मध्ये विल्यम कॅरे या मिशनऱ्याने
पंडित वैजनाथ यांच्या मदतीने पहिला मोडी
लिथोग्राफ , श्रीरामपूर बंगालयेथे बनवला.

"रघु भोसल्यांची वंशावळी "," मराठी भाषा व्याकरण "," मराठी कोष", " नवा करार "(१८०७). या ग्रंथांची मोडी लिपीत छपाई केली गेली.
ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मराठी बायबल मोडी लिपीत छापले.

ए.के. प्रियोळकर यांनी मोडी छपाईचा
इतिहास लिहिला.
मोडी लिपीचे चार कालखंडांत वर्गीकरण केले गेले आहे - यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तीच, शिवकालीन शैलीय किंचित उजवीकडे झुकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधिक वर्तुळाकार आणि सुटसुटीत अक्षरे लिहिण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी सुरू केला. तोपर्यंत मोडी लिपी ही टाकाने लिहिली जात असे. असाच प्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत मोडी अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. पेशवेकाळातील लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाऊंटन पेनचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रुंदी आणि टोक येत असे ते या फाऊंटन पेनच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागुंतीची, किचकट आणि कुरूप दिसू लागली. फाऊंटन पेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राही. म्हणून सध्याचे मोडी लेखक फाऊंटन पेनच्या कॅलिग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि लिखाणात काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.

अलीकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून त्यांत असलेली लिपी, ही मोडी लिपी शिकस्तामधून निर्माण झाली या मताचे खंडण करतात. १०व्या शतकात “नस्तलीक” मधून “शिकस्ते” लिपी जन्मास आली. “शिकस्ता” म्हणजे “मोडकी नस्तलीक”. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्तामधून आली नव्हती. कारण, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत मराठी लोकांचा श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. मात्र मोडी लिपीचे नागरी, गुर्जरी(म्हणजे महाजनी) आणि बंगाली लिप्यांशी साधर्म्य आहे. गुजराती आणि बंगाली भाषा या सुरुवातीला देवनागरी लिपीत लिहिल्या जात, परंतु तेथील भाषाभिमान्यांनी हट्टाने वेगळ्या लिपीची उभारणी करून ती वापरण्यास सुरुवात केली.
मोडी वळणे
चिटणीसी, महादजीपंती , बिवलकरी , रानडी .

मोडी लिपीतील असंख्य दस्तऐवज हे खाली दिलेल्या ठिकाणी संग्रहित केले आहेत.
सरस्वती महाल ग्रंथालय, तंजावर , तामिळनाडू
कॉनेमारा ग्रंथालय, मद्रास युनिव्हर्सिटी ,
चेन्नई, तामिळनाडू
संग्रहालय: लंडन , पॅरिस , नेदरलँड्स, स्पेन वगैरे
भारत इतिहास संशोधक मंडळ ,पुणे
राजवाडे संशोधन मंडळ , धुळे
मराठी इतिहास संशोधन मंडळ (?)
मोडीचे प्रशिक्षण
मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे ढवळे प्रकाशन यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तके उपलब्ध आहेत.
तुम्हीच मोडी शिका या नावाचे डायमंड पब्लिकेशनचे पुस्तक - ह्या पुस्तकात निरनिराळे मोडी दस्तऐवज छापलेले आहेत.
जागतिक मोडी लिपी प्रसार समिती मुंबई येथे मोडीचे प्रगत वर्ग घेतले जातात.
भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे मोडीचे वर्ग घेतले जातात.
महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाद्वारे दरवर्षी उन्हाळ्यात, मोडी लिपीच्या प्रशिक्षणाची ८ ते १५ दिवसांची कार्यशाळा घेतली जाते. या कार्यशाळेत मोडी लिपीच्या लेखन-वाचनाची तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यवहार पद्धतीची माहिती (कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक अशा संदर्भांसकट) करून देण्यात येते. प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा असून ती उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळते.

मोडी लिपी म्हणजे देवनागरीची जलद लिपी! ती नावाप्रमाणे नागमोडी वळणाची, ब-यापैकी अखंड लिपी आहे. त्या लिपीचा उगम कसा झाला ते अज्ञात आहे. मोडी लिपीचे जनक हे देवगिरीच्या यादव साम्राज्याचे पंतप्रधान ‘श्रीकरणाधिप’ हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत हे होत असे काही लोक मानतात. यादवांच्या त्या अष्टपैलू पंतप्रधानाने मोडी लिपी यादवांच्या राज्यव्यवहारात आणली. यादव काळात अनेक लिपी प्रचलित होत्या, पण संत ज्ञानेश्वरांच्या वांङमयरचनेनंतर मराठीने झेप घेतली, ती हेमाडपंतांनी यादवांच्या साम्राज्यात सामावून घेतली. तेराव्या शतकातील अनेक संस्कृत व मराठी ग्रंथ मोडी लिपीत लिहिले गेले आहेत.

तो काळ म्हणजे यादव साम्राज्याच्या वैभवाचा कळसाध्याय होता. कला, वांङमय ग्रंथरचनेला राजाश्रय लाभला होता. देवनागरी लिपी सुबोध व सुवाच्य होती, परंतु लिहिण्यास फार वेळ घेई. मोडी लिपीचे ते महत्त्व ओळखून हेमाडपंतांनी मोडी लिपीला चालना दिली. देवगिरी साम्राज्याचे पत्रव्यवहार व साहित्य मोडी लिपीतून होऊ लागले. हेमाडपंतांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी रचलेल्या ग्रंथांची लिपी मोडी ही होती. मोडी लिपीला अखंड शिरोरेखा ओढली जाते व तिला धरून शब्द व वाक्ये अखंड लिहिली जातात. त्या ‘शिरोरेघे’चे जनक हेमाडपंतांना मानण्यात येते.

देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्याला पुढे परचक्राचे ग्रहण लागले. पण, मोडी लिपीचे सुगीचे दिवस सुरुच राहिले. मोडीला देवगिरी सम्राटाच्या राजवटीत लाभलेला राजाश्रय अव्याहतपणे सुरू राहिला.

मोडी लिपीचे चार कालखंडांत विभाजन होते - बहमनी, शिवकालीन, पेशवेकालीन व आंग्लकालीन.

देवगिरी नंतरच्या बहमनी राजवटीतही राज्यव्यवहाराची लिपी मोडीच राहिली. कारण बहुसंख्य सरदार व अधिकारी वर्ग हा मराठा व ब्राह्मण समाजाचा होता. बहमनी कालखंडातील मोडीमधील कागदपत्रांमध्ये फारशी-अरबी शब्दांचा भरणा आढळतो. भाषा मराठी, लिपी मोडी, पण अनेक राजकीय शब्द फारशी-अरबी असा शिरस्ता त्या काळातील पत्रांमध्ये आहे. बहमनीकालीन मोडी लिपीत लेखनाची पद्धत अस्ताव्यस्त व वाचण्यास क्लिष्ट आहे.

बहमनी कालखंडात अतिबलाढ्य मोगल सत्तेस थोपवून धरणारे निजामशाहीचे सरसेनापती लखुजी जाधवराव, निजामशहाला मांडीवर घेऊन त्यांच्या नावे अप्रत्यक्षपणे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे शहाजीराजे भोसले, मलिक अंबर वगैरे मातब्बर सेनानी व सरदार यांचा इतिहास या बहमनीकालीन मोडी कागदपत्रांत अप्रकट राहून दडला आहे. त्या कालखंडातील हजारो कागदपत्रे अजून अभ्यासली गेलेली नाहीत. त्याच कालखंडात महाराष्ट्राला नवसंजीवनी देणा-या भोसले कुळीचा उदयकाळ मालोजीराजे यांच्या कारकिर्दीच्या रूपात झाला. तोही त्याच कालखंडातील कागदपत्रांत दडून बसला असावा.

बहमनी राजवट पाच शाह्यांमध्ये विभक्त झाली. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीद्शाही आणि इमादशाही. त्यांतील बरीद्शाही आणि इमादशाही यांना बाकी तिन्ही शाह्यांनी लवकरच नष्ट केले. शिवाय, त्या तीन शाह्यांचे आपापसांतील संघर्ष व त्यांचे मोगल सत्तेशी संघर्ष असा तो रंजक इतिहास आहे. तो अजून बराच अभ्यासायचा राहिला आहे. त्या काळात त्या सर्व लढायांत व धामधुमीत प्रामुख्याने मराठा सरदार आघाडीवर लढत होते. त्या काळात उत्तरेतून अनेक क्षत्रिय व ब्राह्मण घराणी ही मोगल जाचाला कंटाळून दख्खनमध्ये आली. त्या सर्वांचा मागमूस त्या काळातील कागदपत्रांत आढळू शकतो.

छत्रपतींच्या आयुष्याच्या पूर्वार्धातील कागदपत्रांवर बहमनीकालीन शैलीचा प्रभाव जाणवतो. छत्रपतींना १६५८च्या सुमारास कोकण मोहिमेवर असताना शत्रुपक्षाकडे नोकरी करणारे बाळाजी आवजी चित्रे भेटले. त्यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून त्यांना चिटणीस हे पद दिले गेले व तेथूनच शिवकालीन मोडी लिपीच्या शैलीला प्रारंभ झाला! तीच शिवकालीन ‘चिटणीशी’ मोडी शैली. त्या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे वळणदार मोडी अक्षर दिसण्यास सुंदर व वाचण्यास सुलभ! तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायनिवाडे, राज्यव्यवहाराची पत्रे व आज्ञापत्रे ही त्या शैलीत आहेत.

मराठी भाषेत झालेला फरकसुद्धा त्या कालखंडातील पत्रांत दिसून येतो. शिवाजी महाराजांनी फारशीचा वापर टाळून, अधिकाधिक मराठी व संस्कृत शब्द वापरण्यावर दिलेला भर त्या काळातील मोडी पत्रांत आढळतो. आरमार उभारणी व दुर्गराज रायगडच्या बांधणीसाठी अनुदान व जमाखर्च या सा-या नोंदी त्या शैलीतील मोडी लिपीत आहे. श्रीशिवराज्याभिषेक व दक्षिणदिग्विजय यासंबंधीची पत्रे त्याच मोडी शैलीत आहेत.

शिवाजी महाराजांच्या मृत्युपश्चात शंभुराजे पन्हाळ्याहून राजधानी रायगड येथे दाखल झाले. तेव्हा, त्यांनी किल्ले रायगडाचा खजिना, जिन्नस आणि दफ्तर यांचा समग्र टाळेबंद करवून घेतला. तो सर्व त्याच शिवकालीन शैलीतील मोडी लिपीत आहे.

शंभुछत्रपतींच्या काळात झालेला थोडाफार बदल वगळता त्याच शैलीचा प्रभाव कायम दिसतो. छत्रपती राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत हिरेपारखी ऊर्फ सभासद यांच्याकडून शिवछत्रपतींचे चरित्र लिहवून घेतले. ते चरित्र सभासद बखर म्हणून प्रसिद्ध आहे. शिवछत्रपतींवर लिहिले गेलेले मराठीतील ते पहिले चरित्र. ते शिवकालीन ऊर्फ चिटणीशी शैलीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांशी झालेला १६६७ चा तह, शंभुछत्रपतींनी फोंड्याच्या दर्ग्याला दिलेले दानपत्र व पेडणे येथील देसाई केशव प्रभू यांनी दक्षिण कोकणातील किल्ल्यांविषयी गोव्याचे पोर्तुगीज विजरई (व्हाइसरॉय) यांस पाठवलेला जाबिता (अहवाल) म्हणजे त्याच्या दगाबाजीचा पुरावा (सध्या लिस्बन येथे आहे); ती सर्व पत्रे शिवकालीन मोडी शैलीत आढळतात.

शाहू महाराजांच्या काळात सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ ‘पेशवे’ झाले व पेशवेकालीन लेखनशैली मोडी लिपीत रुजू झाली. त्या काळातील सर्वात दखलपात्र घटना म्हणजे वारण्याचा तह. त्यातून सातारा व कोल्हापूर अशा दोन छत्रपती गाद्या वेगवेगळ्या निर्माण झाल्या. वारण्याचा तह मोडी लिपीत आहे. पेशवेकालीन शैलीचा त्यावर प्रभाव दिसतो. पेशवेकालीन लिपीत सुद्धा जागोजागी वेगवेगळ्या लेखनशैली दिसून येतात. पण, कालखंड एकच असल्याने तीस पेशवेकालीन असे सरसकट संबोधले जाते.

त्याच काळात उदयास आलेल्या दोन लेखनशैली म्हणजे तंजावरी व इंदुरी ह्या होत. त्यांतील तंजावरी शैली ही बहमनी धाटणीची पण सुवाच्य आहे. इंदुरी शैलीत टापटीपपणा व दोन ओळींमधील अंतर बरेच दिसते. त्या दोन शैली आंग्ल काळाच्या अस्तापर्यंत प्रभावशाली दिसतात. बहुतेक मराठी बखरी पेशवेकाळात लिहिल्या गेल्या असल्याने त्यांच्यावर पेशवेकालीन शैलीचा प्रभाव जाणवतो. दिल्लीच्या बादशाहकडून बाळाजी विश्वनाथ यांनी चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा १७१९ साली आणल्या (त्या फारशीत होत्या). आणि त्यानंतर फारशी शब्दांचा भरणा मोडी लिपीतील मराठी राज्यकारभारात पुन्हा वाढू लागला. पुढे, १७५२ मध्ये अहमदिया करार झाला व पुढील सर्व मराठी राज्यव्यवहारात फारशी शब्दांचे प्रमाण अधिक वाढले. शिवाय, त्या कालखंडातील मोडी पत्रांत उत्तरकाळात राज्याभिषेक शक वापरण्याची रीत संपुष्टात आली. शालिवाहन शक आणि सुहूर सनाचा वापर प्रकर्षाने दिसून येतो.

अटक ते कटक पसरलेली मराठी दौलत, निजामाचा वेळोवेळी झालेला पाडाव व राजपुताना आणि म्हैसूरवर बसवलेली दहशत हा दैदिप्यमान इतिहास त्याच शैलीतील मोडी कागदपत्रांतून वाचण्यास मिळू शकतो.

तसेच, सरखेल तुळाजी आंग्रे यांच्या आधिपत्याखाली असलेल्या बलाढ्य मराठा आरमाराची वाताहत व स्वकीयांकडून झालेल्या होळीचे दाखले त्या काळातील मोडी पत्रांत आढळतात. पानिपतचा जमाखर्च आणि सदाशिवरावभाऊ व नानासाहेब पेशवे यांच्यातील मोहिमेसंबंधीचा पत्रव्यवहार त्याच शैलीत आढळेल.

माधवराव पेशव्यांचा कालखंड, त्यांच्या कारकिर्दीतील राक्षस भुवनची प्रसिद्ध लढाई हा पत्रव्यवहार, हैदर अलीचा दोनदा केलेला बीमोड त्या शैलीतील कागदपत्रांत आढळून येईल.

नारायणराव पेशवे यांचा वध व तदनंतर मराठी दौलतीत माजलेली यादवी यांचा अभ्यास त्याच कालखंडातील मोडी पत्रांतून करावा लागतो. मराठेशाहीचे आधारस्तंभ ठरलेले महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, रघुजी भोसले व नाना फडणवीस यांचे समग्र योगदान जाणून घ्यायचे असल्यास त्या मोडी पत्रांचाच आधार घ्यावा लागेल.

विल्यम कॅरी या ब्रिटिश अधिका-याने मोडी लिपी १८०८ साली टंकलिखित केली आणि ‘डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज’ नामक पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश छापला. पुढे, इंग्रजांचा अंमल भारतावर सुरू झाला व लेखनपद्धतीत ‘फाऊंटन पेन’ हा नवा प्रकार लेखनासाठी वापरात आला. परिणामी, अक्षरांची वळणे बदलून, ती छोटी होत गेली व लिखाण बेशिस्त होऊ लागले. सर्व व्यवहार त्या शैलीच्या मोडी लिपीत होऊ लागले. नवी शिक्षणपद्धत अंमलात येऊन प्राथमिक शिक्षण हे त्याच शैलीतील मोडीत होऊ लागले. ते १८५० नंतरच्या  मोडी पत्रांत प्रकर्षाने जाणवून येते.

प्रत्यक्षदर्शी गोडसे भटजींनी ‘माझा प्रवास’ या पुस्तकाच्या माध्यमातून १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा पहिला वृत्तांत मराठी भाषेतून व मोडी लिपीतून लिहून काढला होता. स्वातंत्र्यसेनानी वासुदेव बळवंत फडके यांची मोडी लिपीतील हस्तलिखिते उपलब्ध आहेत.

लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतीराव फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सारख्या दिग्गज स्वातंत्र्यसेनानींच्या कर्तबगारीची साक्ष मोडी लिपीतील त्यांची हस्तलिखिते पटवून देतात.

मुंबई सरकारने मोडी लिपी ‘कालबाह्य’ म्हणून १९५२ साली मोडीत काढली.

अहद तंजावर तहद पेशावर पसरलेल्या मराठी साम्राज्याची लाखो कागदपत्रे पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, ग्वाल्हेर, इंदूर, नागपूर, दिल्ली जयपूर, तंजावर इत्यादी ठिकाणी इतिहास व मोडी अभ्यासकांची प्रतीक्षा करत आहेत. ती एकत्रित संख्या कोट्यवधींच्या घरात जाऊ शकते. इतकेच काय तर डेन्मार्क, पोर्तुगाल, नेदरलँड, इंग्लंड इत्यादी युरोपीय देशांत हजारो मोडी पत्रे असण्याची शक्यता आहे. गोव्याच्या व्हाइसरॉयने हजारो कागदपत्रे सुरक्षिततेच्या कारणासाठी १७७७ मध्ये पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे पाठवली, त्यात मोडी कागदपत्रे असण्याची शक्यता आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले आहे, की महाराजांचा दहा टक्केच इतिहास महाराष्ट्राला अद्याप ज्ञात आहे. म्हणजेच, तेथील अभ्यासकांना अजूनही छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे कळलेले नाहीत.

दरवर्षी, हजारो मोडी कागदपत्रे वाळवी लागून, उंदरांच्या कुरतडण्यामुळे अथवा शाई उडून गेल्यामुळे निकामी ठरून, नष्ट करण्यात येतात.

मोडी लिपीचा इतिहास -

मोडी  लिपी ही १३ व्या शतकापासुन २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेची  प्रमुख लेखन पद्धती होती."महादेव यादव" आणि "रामदेव यादव" यांच्या  राज्यकालात १२६०-१३०९ मध्ये "हेमाद्री पंडित (हेमाडपंत)" नावाच्या  प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला असे परंपरेने मानले जाते परंतु ही लिपी  राजा अशोकाच्या काळातही अस्तित्वात असल्याचे नवीन संशोधनातुन समोर आले आहे.
मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते आणि मतभेद आहेत.इतिहासाचार्य  वि.का.रानडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून  आणली, परंतु  चांदोरकरांच्या मते ही लिपी अशोककाळातील मौर्यी (ब्राह्मी)  चाच एक प्रगत प्रकार आहे,पण मोडी लिपी ही श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा   मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना  मान्य नाही.तसेच मोडी हा शब्द फारसी भाषेतील "शिकस्ता" यावरून तयार झाला  आहे असे म्हंटले जात होते पण अलिकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढळलेले  शिलालेख हे मोडी लिपीत असून मोडी लिपी ही शिकस्ता मधून निर्माण झाली या  मताचे खंडण करते. १०व्या शतकात "नस्तलीक" मधून "शिकस्ते" लिपी जन्मास आली.  "शिकस्ता" म्हणजे "मोडकी नस्तलीक". यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची  संकल्पना ही शिकस्ता मधून आली नव्हती. तसेच, महादेवराव, रामदेवराव किंवा  हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता.
मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात होती. सर्वांत जुना  उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास  संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे.मोडी लिपी ही मराठीची जुनी लिपी आहे पण मोडी  लिपी प्रचारात येण्याच्या आधी आपल्या इथे नागरी लिपी वापरली जात होती.आपले  सर्व जुने शिलालेख,अगदी शिवकालीन लेखही नागरी लिपीतच आहेत.मोडी लिपी ही  नागरीचीच 'रंनिंग' लिपी आहे. त्यामुळे नागरी/देवनागरी आणि मोडी यात फारसा  फरक नाही. पण मोडी अनेक वर्षे सतत वापरात असल्याने तिचे स्वरूप जास्त बदलत  गेले. म्हणजे शिवकालीन मोडी आणि उत्तर पेशवेकालीन मोडी यातही फरक आहे.
सुरवातीच्या काळात मराठी-मोडी लिहिण्यासाठी ज्या शाईचा वापर होत असे ती  शाई चिंचेच्या बियांपासून काढलेले बलक व कोळशाच्या किंवा लाखेच्या  भुकटीच्या मिश्रणापासून बनवली जात असे. ह्या शाईचे लिखाण पुसले जाणे अतिशय  कठिण तसेच लेखणी साठी बोरूचा वापर होत असे.
मोडी लिपीचा पहिला  लिथोग्राफ, सेरामपुर बंगाल येथे इ.स.१८०१ मध्ये विल्यम कॅरे याने पंडित  वैजनाथ यांच्या मदतीने बनवला व १८०७ मध्ये 'रघु भोसल्यांची वंशावळी',  'मराठी भाषा व्याकरण','मराठी कोश' या ग्रंथांची मोडी लिपीत छपाई केली गेली.
मोडी लिपीतील बदल -
मोडी लिपी १९५० पर्यंत लिखाणात वापरली जात होती पण गेल्या २-३ शतकात मोडी  लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७००च्या सुमारास चिटणिसी आणि  वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत.  ऐतिहासिक कागदपत्रातील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.मोडी लिपी  पेशव्यांच्या काळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे  यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना  येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, अत्यंत शुध्दलेखन हे या लेखनाचे  वैशिष्ट्य. शिवकाळ ते उत्तर पेशवाई ह्या काळातील मोडीवाचनातून मराठी  भाषेतील स्थित्यंतरे, बदल लक्षात येतात. मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता  येतो.
मोडी लिपीचे कालखंड -
मोडी लिपीचे वर्गीकरण हे चार कालखंडात  केले गेले आहे.– यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन.  यादवकालीन मोडी लिपी लिखानात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली  गेली. तिच, शिवकालीन शैलीत किंचीत उजवीकडे वाकलेली दिसतात. मोडी लिपीला  तिरकस वळण, अधीक वर्तुळाकार आणि सुटसूटीत अक्षरे लिहीण्याचा उपक्रम छत्रपती  शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांजकडून सुरु झाला. इथ पर्यंत मोडी  लिपी ही टाक ने लिहीली जात. याच प्रयत्नांना पुढे चालू ठेवून पेशवेकालीन  शैलीत ती अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसूटीत लिहीली गेली.  पेशवेकाळात लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज  राजवटीत फाऊंटन पेनाचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला  जाडी-रूंदी आणि टोक येत ती या फाऊंटन पेनाच्या वापरात शक्य नसल्याने मोडी  लिपी अगदीच गुंतागूंतीची, किचकट आणि कुरूप दिसू लागली. फाऊंटन पेनाचा एकच  फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून रहात. म्हणून सध्याचे मोडी  लेखक फाऊंटन पेनाच्या कॅलीग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि काही प्रमाणात  पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.
मोडी लिपीची वैशिष्ठे -
•  देवनागरीपेक्षा मोडी लिपीत जलद गतीने लिहिता येते.
•  मोडी लिपीत केवळ एकाच 'ई' काराचा व 'ऊ' कराचा वापर होतो त्यामुळे  ऱ्हस्व-दीर्घ च्या चुका कमी होण्यात मदत होते. मोडी लिपीत दोन अक्षर  एकमेकांना जोडून लिहिण्याच्या विशिष्ट
पद्धतीमुळे, लेखणी वारंवार उचलण्याचा प्रसंग कमी येतो व त्यामुळे लिखाणाची गती वाढण्यास मदत होते.
•  मोडीतील जोडाक्षरे ही संस्कृत भाषेचे नियम पाळतात.
•  मोडीतील जास्तीत जास्त अक्षरे ही 'नागरी' आहेत. 'काने' चा उपयोग वरच्या बाजूला तसेच पुढील अक्षराला जोडण्यासाठी केला जातो.
•  'ई', 'ज', 'झ', 'त्र', 'ट', 'द', 'ध' ही मोडी अक्षरे 'नागरी' तील घसाटी पद्धतीने लिहिली जातात. उ. दा. गुजराती व महाजनी.
•  अनुस्वाराच्या बाबतीत मोडीचे स्वतंत्र नियम आहेत.
•  डोक्यावरील आडवी रेषा वाक्याचे लिखाण सुरू करण्यापूर्वी आखून घेतात  जेणेकरून लिहिताना सारखा हात उचलावा लागू नये, ज्या गोष्टीची गरज नागरी  लिहिताना भासते.
•  थोडक्यात मोडी ही घसाटी पद्धतीने लिहिलेली नागरी होय.
•  अतिशय मोजक्या ठिकाणीच लेखणी उचलली जाते.
•  मोडी अक्षराची सुरवात व शेवट वरच्या ओळीवर असतो.
• मोडी अक्षरांना कुठेही टोके नकोत. सगळी अक्षरे अतिशय वळणाकृती व गोलाकार असली पाहिजे.
•  जोडाक्षर 'बाळबोध' पद्धतीने लिहिली जातात.
•  'आ'कार व 'काना' लिहिताना रेषा खालून वर अशी ओढली जाते.
•  'ई'कार लिहिताना वेलांटी पाठोपाठ 'काना' लिहिला जातो. सगळ्या मात्रा ह्या शब्दाच्या शेवटी दिल्या जातात.
मोडी लिपी शिकतांना/वाचतांना घ्यावयाची काळजी -
•मोडी लिपीमध्ये वेगवेगळ्या अश्या ४८ अक्षरांचा समावेश असतो, त्यामधे ३६ व्यंजने तर १२ स्वर असतात.
•लिखाणाची सुरवात करण्यापूर्वी, संपूर्ण पानावर आडव्या रेषा मारून मग दोन रेषांच्या मध्ये ही लिपी लिहिली जाते.
•ह्या लिपीत विराम चिह्नाचा किंवा उभयान्वयी अव्ययांचा अभाव असतो,वाक्य  समाप्ती दर्शविण्यासाठी कुठल्याही चिन्हाचा वापर नसतो,तसेच देवनागरी लिपीत  वापरण्यात येणाऱ्या उभ्या रेषांचा
उपयोगही नसतो.
•वाक्यातील दुरुस्ती ही फुली मारण्यापेक्षा साधारणपणे चुकीच्या अक्षराखाली किंव्हा शब्दाखाली आडवीरेष मारून दर्शविली जाते.
•काही वारंवार येणाऱ्या शब्दांसाठी त्याचे संक्षिप्त रूप करून त्याचा लिखाणामध्ये उपयोग केला जातो.
•मोडो लिपीत शब्द न तोडता सलग लिहिला जातो.संपूर्ण शब्द मावत नसेल तरी  त्याची जेवढी अक्षरे त्या ओळीत लिहिणे शक्य असेल तेवढी अक्षरे अक्षरशः  कोंबलेली असतात.त्यामुळे तो
शब्द वाचकास माहित असणे फार गरजेचे असते.
मोडी लिपीची हाक -
मोडी लिपीचा काळ हा ९०० वर्षांपेक्षा जास्तचा आहे म्हणजे महाराष्ट्राचा  ९०० वर्षापासूनचा सगळा इतिहास मोडीत लिपीबद्ध केला गेला आहे.एवढा सम्रुद्ध  इतिहास लाभलेल्या देशात तोच इतिहास अभ्यासुन लोकांपर्यंत पोचवण्यासाठी  जाणकारांची कमतरता भासते आहे.आज पुण्यात 12 लाखांपेक्षा जास्त मोडी लिपीतील  दस्तऐवज उपलब्ध आहेत पण त्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासासाठी  त्यामानाने अभ्यासक कमी आहेत.असे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत कि ज्यांच्या  जवळ जुनी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत पण मोडीच्या अज्ञानाने तो अनमोल ठेवा  दुर्लक्षित केल्या जात आहे.
इतकी वर्षे आपण आपल्याला शिकवला गेलेलाच  इतिहास पुढच्या पिढीला शिकवत आलो आहोत पण अजूनही अंधारात असलेला इतिहासाचा  अभ्यास करून तो नवीन पिढीला शिकवण्याच्या आपल्या कर्तव्याकडे कानाडोळा  करण्याच्या वृत्तीने मोडी लिपीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आज  आपण फक्त शिवरायांनी केलेल्या पराक्रमांबद्दल बोलतो,पण तो पराक्रम  गाजविण्यासाठी त्यांनी कोणती आणि कशी तयारी केली,राज्यकारभार कसा  सांभाळला,शिवरायांची राजनीती, युद्धनीती व न्यायनीती या विषयांचा अभ्यास  व्हायला नको का?ह्या बद्दलची माहिती जगापुढे यायला नको का? इ.स.१९५६ मध्ये  स्व.यशवंतराव चव्हाण यांनी मोडी जाणकारांना हे ऐतिहासीक दस्तावेज मोडी  लिपीतून देवनागरी लिपीत लिप्यांतर करण्यासाठी खुले निमंत्रण दिले होते  त्यावेळी त्यांना महाराष्ट्र सोडून इतर राज्यांतून उत्स्फुर्त प्रतिसाद  मिळाला.ही मराठी म्हणवणारया साठी लाजिरवाणी गोष्ट होती पण त्याहीपेक्षा  लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जेव्हां त्यांना जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीच्या  इतिहास विभागाकडून पत्र आले की ‘तुमच्याकडे मोडी लिपी वाचक नसतील तर  आमच्याकडील कुशल लोक तुमच्या विनंतीवरून आम्ही पाठवू शकतो’.त्यावेळी मराठी  जनतेला या जपानी लोकांचे फार कुतूहल वाटले पण स्वत:ची लाज वाटली नाही आणि  आजही ती तशीच कायम आहे.फक्त तोंडानी "शिवाजी महाराजकी जय" म्हणुन फायद्याच  नाही तर इतिहासाचा अभ्यास करून नवीन पैलु प्रकाशात आणण्यासाठी जिज्ञासु  तरुण रक्ताने पुढे सरसावण्याची गरज आहे.जगातील सगळ्या गोष्टी ह्या नश्वर  आहेत पण इतिहास हा तसाच टिकून राहणार आहे.आज जर आपण असेच हातावर हात ठेऊन  बसून राहिलो तर ही ९०० वर्षांची कागदपत्रे नष्ट होऊन बराच अज्ञात इतिहास  काळाच्या पडद्याआड नक्की जाईल व आपण संपूर्ण इतिहास समजून घेण्यापासून  वंचित राहू.वाळवीच्या प्रादुर्भावामुळे वर्षाला हजारोनी पत्र जाळून टाकली  जातात. म्हणजे ही आपली ऐतिहासीक अमुल्यवान संपत्ती आणि अप्रकाशित इतिहास  कायमचाच नष्ट होत आहे की जो वर्तमान आणि भावी पिढीला कधीच कळणार नाही.

चीन पासून इटली पर्यंत, जपान पासून मेक्सिको पर्यंत सगळ्याच देशांना आपल्या भाषेचा आणि इतिहासाचा अभिमान आहे व तो जपण्याचा ते प्रयत्न करत असतात.२००८ च्या चीनमधील ऑलंपिकच्या उदघाटन सोहळ्यात चीनच्या पंतप्रधानांनी चीनी भाषेतच आपले भाषण केले होते.ऑलंपिकमधील उलटी मोजणी सुद्धा चीनी अंकातच होती. २ तास चाललेल्या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चीनी संस्कृतीचं,इतिहासाचा प्रदर्शन केल.आज जर आपली संस्कृती,भाषा,लिपी,इतिहास जपायचा असेल तर पहिले त्याचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे.परंतु आपल्याच सरकार मधील एका वरिष्ट नेत्याने (कपिल सिब्बल),शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमातून देवनागरी अंकांना काढून त्यांच्या जागी इंग्रजी अंकांना प्राधान्य देण्याचा आदेश देऊन आपल्याला आपल्या भाषेबद्दल आणि इतिहास बद्दल किती कळकळ आहे हे दाखवुन दिले आहे.तेंव्हा अश्या सरकार कडुन आपण किती अपेक्षा करायची हे ज्याचे त्याने ठरवावे.⁠⁠⁠⁠





या छायाचित्रातील शिवमंदिर कोणत्या किल्ल्यावर आहे ?

Daily Quiz # २४६

या छायाचित्रातील शिवमंदिर कोणत्या किल्ल्यावर आहे ?




उत्तर : टंकाई किल्ला

टंकाई (टणकाई) (Tankai)

किल्ल्याची ऊंची :  2818
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

अंकाई आणि टंकाई हे जोड किल्ले आहेत. एकाच खिंडीने वेगळ्या झालेल्या दोन डोंगरांवर हे किल्ले बांधलेले आहेत. या डोंगररांगेजवळुन जाणार्‍या सुरत - औरंगाबाद व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्यांवरील अगस्ती मुनींचा आश्रम, ब्राम्हणी, जैन लेणी या किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात.मनमाड पासून केवळ १० किमीवर आणि धार्मिक स्थान असल्यामुळे किल्ल्यावर सुट्टीच्या दिवसात भाविकांचा वावर असतो. त्यामुळे सकाळी लवकर अंकाई किल्ला पाहुन मग टंकाई किल्ला पाहावा. कारण टंकाई किल्ल्यावर भाविक/पर्यटक फ़ारसे येत नाहीत.


अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्‍या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. अंकाई, गोरखगड, कात्रा या किल्ल्यांची माहिती साईटवर लिहिलेली आहे.

इतिहास :

अनकाई डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता. किल्लावर असलेली ब्राम्हणी (हिंदु) लेणी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली दहाव्या ते बाराव्या शतकातील जैन लेणी किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात. या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकीर्दीत झाली अस मानल जात. इ.स. १६३५ मधे मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला. सुरत - औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा हा महत्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने हा महत्वाचा किल्ला होता. मुघलांकडुन हा किल्ला निजामाकडे गेला. इ.स. १७५२ मधे भालकीच्या तहा नुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.इ.स. १८१८ मधे इंग्रजांनी हा किल्ला जिंकुन घेतला.
पहाण्याची ठिकाणे :अंकाई गावातून किल्ल्याच्या पायथ्याच्या पर्यंत रस्ता आहे. हा रस्ता शाळे जवळुन जातो. तेथे रस्त्याच्या बाजुला उघड्यावर गणेश मुर्ती व काही वीरगळी ठेवलेल्या आहेत. अशीच एक मोठी वीरगळ शाळेच्या विरुध्द बाजूस आहे. या चार फ़ूट उंच चौकोनी वीरगळीवर ख्हालच्या पट्टेवर चारही बाजूंना मुर्ती शिल्प कोरलेली आहेत. त्यात रान डुकराची शिकार करतानाच शिल्प आहे. वरच्या बाजूस सतीचा हात कोरलेला आहे. ही वीरगळ पाहून परत शाळेपाशी येउन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जावे. रस्ता संपतो तिथुन किल्ल्याच्या पहील्या टप्प्यावरील जैन लेण्यांपर्यंत पुरातत्व खात्याने पायर्‍या बांधलेल्या आहे. पायर्‍यांनी आपण १० मिनिटात लेण्यांपाशी पोहोचतो. लेणी दोन स्तरावर बांधलेली आहेत. पहिल्या स्तरावर दोन लेणी आहेत. त्यातील दुसर्‍या लेण्याच्या समोर पाण्याच टाकं आहे. या लेण्यामधे मुर्ती किंवा कोरीवकाम पाहायला मिळत नाही. ही २ लेणी पाहुन १०-१५ पायर्‍या चढुन गेल्यावर, ५ लेणी खोदलेली पाहायला मिळतात. हि लेणी दहाव्या ते बाराव्या शतकात कोरलेली असावीत. यातील पहिली दोन लेणी दोन मजली आहेत. त्यांचे ओसरी, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली आहे. सभा मंडपाच्या व्दारशाखेवर सुंदर कोरीवकाम आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. खांबांच्या टोकाला छताला आधार देणारे यक्ष कोरलेले आहेत. छतावर पाकळ्या असलेले सुंदर कमळ कोरलेले आहे. सभामंडपातून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावरचे दालन दोन स्तंभांवर तोललेले आहे. दुसर्‍या लेण्याच्या ओसरीत डाव्या बाजुला यक्षाची मुर्ती आणि उजव्या बाजुला इंद्राणीची मूर्ती आहे. इंद्राणीच्या मूर्तीला भवानी मातेचे रुप देण्यात आलेले आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. पहिल्या मजल्यावर जाणारा जिना सभामंडपात आहे. पहिल्या मजल्या वरच्या दालनाला चौकोनी नक्षी असलेली जाळी कोरलेली आहे. जाळीच्या बाहेरच्या बाजूला दोन मोठे व्याल कोरलेले आहेत. तिसर्‍या लेण्यात ओसरीत दोन मुर्ती आहेत. डाव्या बाजुची मुर्ती किचकाची आणि उजव्या बाजुची मुर्ती अंबिकेची आहे. पाचव्या लेण्यात तीर्थंकरांच्या मुर्ती आहेत.

लेणी पाहुन डोंगर चढायला सुरुवात केल्यावर आपल्याला दोनही किल्ल्यांच्या मधिल खिंड तटबंदी बांधुन सुरक्षित केल्याच पाहायला मिळत. या तटबंदीवर चर्या बांधलेल्या आहेत. ओबडढोबड पायर्‍यांच्या वाटेने १० मिनिटात आपण अंकाई आणि टंकाईच्या पहिल्या दक्षिणाभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराच्या बाजुला दोन भव्य बुरुज आहेत. या बुरुजां पासुन सुरु झालेली तटबंदी अंकाई आणि टंकाई या दोनही किल्ल्यांपर्यंत जाते. दरवाजाचे लाकडी अवशेष अजुनही काही प्रमाणात टिकुन आहेत.दरवाजा ओलांडुन आत गेल्यावर पाहारेकर्‍यांसाठी असलेल्या देवड्या दिसतात. पुढे थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर उजव्या बाजुला टंकाई किल्ला , डाव्या बाजुला अंकाई किल्ला आणि समोर वायव्य दरवाजा (मनमाड दरवाजा) दिसतात. या मनमाड दरवाजातून खाली उतरुन त्याची भव्यता अनुभवता येते. अशा प्रकारे दोन डोंगरामधिल खिंडीचे संरक्षण करण्यासाठी दोन प्रवेशव्दारांची आणि तटबंदीची रचना केलेली येथे पाहायला मिळते.

टंकाईवर जाण्यासाठी कातळात पायर्‍या कोरलेल्या आहेत. जिथे कातळ खोदण शक्य नाही तिथे पायर्‍या बांधुन काढलेल्या आहेत. या कातळकोरीव पायर्‍यांनी किल्ला चढायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजुला एक छोट टाक दिसत त्याच्या पुढे एक मोठ टाक आहे. या टाक्यात पाणी आणण्यासाठी वर पासुन या टाक्यापर्यंत कातळात पन्हाळी खोदलेली दिसते. थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर डाव्या बाजुला पाण्याची तीन मोठी टाकी एकापुढे एक आहेत. त्यातील दोन खांब टाकी आहे. सर्व टाकी कोरडी असुन त्यात झाड झाडोरा माजलेला असल्यामुळे पटकन दिसत नाहीत. ही टाकी पाहुन परत पायर्‍यांच्या मार्गावर येउन डावीकडे गेल्यावर एक वाट कातळाच्या धारेवरुन जाते. या वाटेने डोंगराला वळसा घालुन ५ मिनिट चालल्यावर आपण कातळात कोरलेल्या गुहांपाशी येतो. या गुहांच्या वरच्या बाजुस एक पाण्याच टाक आहे. कातळ टप्पा चढुन जाउन हे टाक पाहाता येत. कातळ टप्पा चढणे शक्य नसल्यास परत पायर्‍यांपाशी येउन कातळात कोरलेल्या पायर्‍या संपुन जिथे बांधीव पायर्‍या चालु होतात तिथे पर्यंत जाउन डावीकडील कातळ धारेवरुन जाणार्‍या मार्गाने ५ मिनिटात टाक्यापाशी पोहोचता येते. गुहा आणि हे टाक आपल्याला टंकाई किल्ला चढतान दिसत नाही. त्यामुळे ते कुठे आहे याचा नक्की अंदाज येत नाही. याठिकाणी जाणारी वाट सुध्दा मळलेली नाही. अंकाई किल्ला चढताना चौथ्या दरवाजाच्या पुढे असलेल्या मोकळ्या जागेतून ही टाकी आणि गुहा दिसते.

टाकं पाहुन परत आल्यावर बांधीव पायर्‍या आहेत. त्या चढल्यावर आपण बुरुजावर येतो. पुढे परत कातळकोरीव पायर्‍या आहेत. त्या चढुन गेल्यावर आपण किल्ल्यच्या पश्चिमाभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराची लाकडी चौकट अजुनही शाबुत आहे. इथुन समोरचा अंकाई किल्ला आणि आजुबाजूचा परीसर अप्रतिम दिसतो. प्रवेशव्दारातून आत गेल्यावर देवड्या आहेत. देवड्यांच्या तटबंदीला लागुन एक खोली बांधली आहे त्यात एक पीर आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डाव्या बाजुच्या टेकडीवर किल्ल्याच प्रशस्त पठार आहे. एखाद फुटबॉल स्टेडीयम बसेल इतक प्रशस्त आणि सपाट आहे. टेकडीच्या उजव्या बाजूला उतार आणि त्याच्या पुढे दरी आहे. आपण प्रथम टेकडी चढुन पठारावर न जाता दरी उजव्या बाजुला आणि मधली टेकडी डावीकडे ठेवत चालत जाव. वाटेत एक बुरुज आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. ते पाहुन टेकडीच्या दिशेने येताना उतारावर एकमेव खजुराच झाड दिसते. ते झाड एका पूर्ण बुजलेल्या टाक्यात आहे. त्या टाक्याच्या बाजूला आणखी ४ टाकी आहेत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाकी पाहुन तिथुनच टेकडीवर चढुन गेल की लांबलचक पठार आणि त्यावरील दोन वास्तु दिसतात. त्या वास्तूं पर्यंत चालुन गेल्यावर ते एक उध्वस्त शिवमंदिर असल्याच दिसत. या हेमाडपंथी मंदिराचे छत कोसळलेले आहे. पण उर्वरीत अवशेषांवरुन मंदिरावरील कोरीवकामाची आणि त्याच्या सौंदर्‍याची कल्पना येते. मंदिराच्या गाभार्‍यात पिंड आहे. सभामंडपातील नंदीही अजुन शाबुत आहे. मंदिरा समोर कातळात खोदुन काढलेला तलाव आहे. किल्ल्यावरील दुसरी वास्तू म्हणजे एक समाधी आहे. या दोन वास्तू पाहुन किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे सरळ चालत गेल्यावर किल्ल्याचा डोंगर निमुळता होत जातो. या ठिकाणी उतारावर दोन कोरडी टाकी आहे. समोरच एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. त्या वाड्याच्या मागे किल्ल्याच्या निमुळत्या टोकावरचा शेवटचा बुरुज आणि तटबंदी आहे. बुरुज पाहुन परत येताना किल्ल्याच्या दक्षिणेकडुन (दरी उजव्या बाजुला ठेउन) चालत आल्यास वास्तुंचे चौथरे पाहयला मिळतात. हे सर्व पाहुन प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण होते.

टंकाई किल्ल्यावरुन पश्चिमेला अंकाई, दक्षिणेला गोरखगड, हडबीची शेंडी आणि कात्रा किल्ले दिसतात. संपूर्ण किल्ला पाहाण्यास १.३० ते २.०० तास लागतात.अंकाई गावातून टंकाई किल्ल्यावर जाण्यास पाउण तास लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :
मनमाड जंक्शन रस्त्याने आणि रेल्वेने सर्व शहरांशी जोडलेल आहे. मनमाड -औरंगाबाद रस्त्यावर मनमाड पासुन १० किमीवर अंकाई गाव आहे. गावातील शाळेजवळुन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत खाजगी वाहानाने जाता येते. मनमाडहुन येवला, औरंगाबाद दिशेकडे जाणार्‍या एसटीने अंकाई गावाच्या फाट्यावर उतरुन १ किमी चालत किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते.

अंकाई किल्ला हे रेल्वे स्टेशन आहे. पण इथे केवळ पॅसेंजर थांबतात. हे स्टेशन किल्ल्यापासुन २ किमीवर असल्याने गैरसोइच आहे.

राहाण्याची सोय :किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय :मनमाड औरंगाबाद हायवे वर जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय :किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :अंकाई गावातून टंकाई किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो.

जाण्यासाठी उत्तम कालावधी :जुलै ते फेब्रुवारी

सौजन्य : www.Trekshitiz.com

http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Tankai-Trek-T-Alpha.html⁠⁠⁠⁠

Tuesday, 27 June 2017

औरंगजेबाच्या सर्वात मोठ्या बहिणीचे नाव काय ?

Daily Quiz # २४५

औरंगजेबाच्या सर्वात मोठ्या बहिणीचे नाव काय ?

उत्तर - मिहीरउन्नीसा / हुरलनिसा बेगम

शहाजहान आणि मुमताज महल (अंजुमन बानू) या दाम्पत्याला एकूण चौदा मुले झाली. आठ मुलगे आणि सहा मुली. मिहीरउन्नीसा हे या दाम्पत्याचे सर्वात पहिले अपत्य. १६१३ साली आग्रा येथे तिचा जन्म झाला. मिहीरउन्नीसा अल्पायु ठरली, १६१६ साली अजमेर येथे तिचा मृत्यू झाला.

Shahjahan and Mumtaz Mahal:

1.Shahzadi Huralnissa Begum (1613-1616)
2. Shahzadi (Imperial Princess) Jahanara Begum ) (1614-1681)
3. Shahzada (Imperial Prince) Dara Shikoh (1615-1659)
4. Shahzada Mohammed Sultan Shah Shuja Bahadur (1616-1660)
5. Shahzadi Roshanara Begum (1617-1671)
6. Badshah Mohinnudin Mohammed Aurangzeb (1618-1707)
7. Shahzada Sultan Ummid Baksh (1619-1622)
8. Shahzadi Surayya Banu Begum (1621-1628)
9. Shahzada Sultan Murad Baksh (1624-1661)
10. Shahzada Sultan Luftallah (1626-1628)
11. Shahzada Sultan Daulat Afza (1628-?)
12. Shahzadi Husnara Begum (1630-?)
13. Shahzadi Gauhara Begum (1631-1707)
14. Samedia (imperial princess) ?to?


प्रति तानाजी म्हणून कोण ओळखला जातो ?

Daily Quiz # २४४

प्रति तानाजी म्हणून कोण ओळखला जातो ?

उत्तर : प्रति तानाजी - सरदार नावजी लखमाजी बलकवडे

उत्तर शिवकालत सिंहगड, राजगड, पुरंदर रायगड यासारखे बुलंद किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्याने मराठ्याना देशावर प्रभावी हालचाली करणे अवघड जात होते. त्याच बरोबर कोकनात देखील प्रतिकारात अडथळे निर्माण होऊ लागले होते..अशा बिकट परिस्थितिवर मात करण्यासाठी हे बलदंड किल्ले परत जिंकणे आवश्यक होते.या सर्व गोष्टींचा विचार करुन इ.स.१६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव यांनी धाडसी लोकांच्या सहाय्याने किल्ले जिंकण्याचे विचार सुरु केला.या काळात अनेक शुरवीरांचा उदय झाला, त्यापैकिच एक नाव सरदार नावजी लखमाजी बलकवडे....त्यांनी सिंहगड जिंकुन देण्याचे कबुल केले. ट्य बदल्यात शंकराजी पंतानी
त्यांना पवन मावळातील सावरगाव इनाम द्यायचे असे ठरले.. नावजी हे सचिवांच्या पायदळात पदाती पंचसहस्त्री होते.

शंकराजी पंताना सिंहगडाच्य भौगोलिक परिस्थितिचा चांगला अंदाज होत. हे काम नावजीसारख्या एकट्या दुकट्यचे नाही हे त्यांनी जाणले. आणि नावजी बरोबर, सरदार विठोजी कारके याना मदत्नीस म्हणुन दिले..त्यानुसार प्रथम विठोजीनी एकट्यने आणि नंतर विठोजी आणि नावजी दोघांनी सिंहगडाच्या घेराची तपासणी केली.

त्यांना असे आढळले की सिंहगड आधीच कठीण, त्यात मोगलांनी सावध होउन काही ठिकाणी किल्ल्यची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करुन तेथे चौक्या, पहारे आणि रात्रिच्या गस्ती वाढवलेल्या होत्या. शिवाय जास्तीचे सैन्य देखिल या काळात किल्ल्यवर तैनात होते.दगा फ़टका करुन किल्ल घेण्याची सोय राहिली नव्हती.त्यामुळे सुभेदार मालुसरेनां जेव्हढ्या अडचणी आल्या तेव्हढ्याच आता पण असणार याचे जाण पंतसचीव, नावजी आणि विठोजी यांना होती.

दि. २५ जून १६९३ रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी निवडक माणसे घेतली आणि ते राजमाचीवरुन निघाले. पावसाळ्याचे दिवस..त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत सिंहगडानजिकच्या जंगलात येउन पोहोचले आणि योग्य संधीची वात बघत ५ दिवस दबा धरुन बसले.

दि. ३० जूनच्या मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढु लागले. अवघड मार्गानी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यवर मोगलान्चे गस्त सुरु होती आणि पहरेकरी सावध होते, त्यमुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला...तेंव्हा किल्ल्यवरच्या गस्तवाल्यान्ची वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी आले.. या लवचिक संधीचा फ़ायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले.. मराठे सैनिकांनी त्याबाजुचे पहारेकरी गुपचुप कापुन काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फ़ार हानी झाली.मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या लोकांवर हल्ला चढवला असता.पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते..


पावसाळ्यतल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते. नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. ते ही शिड्या लाऊन वर आले.. आत मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते.. हर हर महादेव च्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला..⁠⁠⁠⁠

जन्म आणि मृत्यू दोन्ही स्वारीतच झालेला बादशहा कोणता..?

Daily Quiz # २४३

जन्म आणि मृत्यू दोन्ही स्वारीतच झालेला बादशहा कोणता..?

औरंगझेब हें (१६१८-१७०७) बादशहा शहाजहानचें अर्ज मंदबानु मुम्ताझ महाल या राणीपासून झालेलें सहावें मूल होय. याचें सबंध नांव मुहिउद्दीन मोहंमद औरंगझेब होय. जहांगीर हा अहमदनगरच्या स्वारीहून आग्र्यास परत जात असतां पंचमहाल जिल्ह्यांतील दोहद गांवीं २४ आक्टोबर १६१८ (जुनी पद्धत) रोजीं रात्रीं याचा जन्म झाला. जसा त्याचा जन्म स्वारींत झाला तसा त्याचा मृत्यु देखील स्वारींतच झाला.
याचा मृत्यू मराठयांच्या स्वारीतच दि. २० फेब्रुवारी १७०७ रोजी झाला⁠⁠⁠⁠

Monday, 26 June 2017

पावसाळ्याच्या आसपास डोंगर-उतारावर उभ्या असलेल्या माणसाच्या पाठीमागून सूर्यकिरणे येत असतील आणि समोरच्या उतारावर धुक्याचे वातावरण असेल तर त्या धुक्यात माणसाला संपूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्य दिसू लागते. याला काय म्हणतात ?

Daily Quiz # २४२

पावसाळ्याच्या आसपास डोंगर-उतारावर उभ्या असलेल्या माणसाच्या पाठीमागून सूर्यकिरणे येत असतील आणि समोरच्या उतारावर धुक्याचे वातावरण असेल तर त्या धुक्यात माणसाला संपूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्य दिसू लागते. याला काय म्हणतात ?

उत्तर : इंद्रवज्र

इंद्रवज्र दिसल्याची सह्याद्री परिसरात पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने, तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! त्यावेळी घोड्यावरून रपेट मारत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.

नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर त्याची नोंद आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवले आहे, की Accompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colors. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chain tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes, description would seem to show. या वर्तुळाची त्रिज्या पन्नास ते साठ फुट होती. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वत:लाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मध्यात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनुष्याचे तेजोवलय कडेला मात्र फिकट होत जाते.

इंद्रवज्र. छायाचित्रकार हर्षद पेंडसे. (मायबोली संकेतस्‍थळावरुन साभार)इंद्रवज्र म्हणजे निसर्गाचा चमत्कारिक आविष्कार! त्यासाठी भौगोलिक स्थितीही तशी असायला हवी. म्हणजे कशी? तर दिवस पावसाळ्याचे असावेत! वेळ सकाळची असावी. हलका पाऊस पडत असावा आणि गडाच्या पश्चिमेकडच्या त्या अक्राळविक्राळ कोकणकड्याकडून (पश्चिम दिशेकडून) दाट धुके असलेले ढग यायला हवेत. उगवत्या सूर्यनारायणाची कोवळी किरणे दरीतून वर झेपावणा-या ढगांवर पडली, की पाहणारांच्या सावल्या आणि त्याभोवती हे वर्तुळाकार इंद्रधनुष्य समोरच्या ढगांवर दिसू लागते. प्रेक्षक कड्याच्या दिशेने तोंड करून उभे राहिला, की निसर्गाचा हा अद्भुतरम्य आविष्कार त्याला पाहायला मिळतो. त्याच वेळी गडाच्या पठारावर मात्र धुके नसले पाहिजे. ते केवळ कड्यापर्यंत असावे. त्यामुळे अशी स्थिती जुळून येणे दुर्मीळ असते. आली तरी ते पाहायला मिळणे... हा सारा नशिबाचा, योगायोगाचा भाग! मुळात हे 'इंद्रवज्र' भारत देशात अत्यंत दुर्मीळ आहे. अनेक दुर्गयात्री त्यासाठी मोठी प्रतीक्षा करत असतात.

इंद्रधनुष्य / इंद्रवज्र कसे निर्माण होते ?
इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट अर्धगोलाकार/धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. खरे म्हणजे प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल ( इन्द्रवज्रच) असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि  किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते.

खालील आकृती वरून इंद्रधनुष्य कसे बनते याची कल्पना येऊ शकेल.⁠⁠⁠⁠




http://www.akolemaza.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1-endravajr/


http://sahyadriindravajra.blogspot.in/

आजच्या युगात शिवथरघळीचा शोध कोणी आणि कधी लावला ?

Daily Quiz # २४१

आजच्या युगात शिवथरघळीचा शोध कोणी आणि कधी लावला ?

उत्तर : आजच्या जगाला शिवथर घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी १९१६ साली लावून दिला.

रायगड जिल्ह्यातील महाडपासून ३० किमि अंतरावर असणारी जागा. येथे समर्थ रामदास यांनी दासबोधाचे लेखन केले. सन १६४९ ते सन १६६० पर्यंत त्यांचे वास्तव्य इथे होते.

शिवथरघळ ही रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे. ती महाडपासून तीस किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळच्याया काठावर कुंभे कसबे, व आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडाझाडोऱ्याने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदर मठ’ म्हणत असत.

इतिहास
शिवथरघळ आणि आजुबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले होते. पुढे १६४८ मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि समर्थ रामदास सन १६४९ मध्ये या घळीत वास्तव्यासाठी आले. ते नंतर सन १६६० पर्यंत म्हणजे दहा-अकरा वर्षे या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची सात आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. सन १६७६ मध्ये दक्षिणदिग्विजयासाठी जातांना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊनच छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले. आजच्या जगाला या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी १९१६ साली लावून दिला.

पहाण्याची ठिकाणे
पायऱ्याया चढून आल्यावर समोरच ’शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समिती’ने स्थापन केलेली इमारत लागते. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो. घळीमधे रामदासस्वामींची मूर्ती आहे. घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. तो धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळत असतो. घळीच्या वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. या सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत.

पोहोचण्याच्या वाटा

१) शिवथरघळीला जाण्यासाठी पायथ्यापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. पुढे १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण घळीपाशी पोहोचतो. मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या पुढे एक नदीवरील पूल लागतो. त्याच्या पुढे डाव्या बाजूला भोरकडे जाणारा वरंध घाटाचा फाटा लागतो. या रस्त्याने भोरच्या दिशेला जातांना बारस गाव आहे. येथे शिवथरकडे अशी पाटी लावली आहे. येथून पुढे साधारण ३० किमी अंतर पार केल्यावर आपण शिवथरघळीच्या पायथ्याशी पोहोचतो. वाटेत कुंभे शिवथर, कसबे शिवथर, अंबे शिवथर ही गावे लागतात.

२) दुसरा मार्ग जरा अवघड आहे. पुण्याहून निघून राजगड-भुतोंडे-बेळवंडी नदी, कुंबळ्याचा डोंगर, गोप्याघाट, कसबे शिवथर मार्गे घळीत पोहोचता येते. हा मार्ग तसा अवघड आणि वेळ खाणारा आहे.

राहाण्याची सोय
येथे असणाऱ्या ’शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समिती’च्या इमारतीमध्ये पूर्व परवानगीने अनेक जणांच्या राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय
शिधा आपण स्वत: दिला तर जेवणाची सोयदेखील होते.

पाण्याची सोय
बारामाही पाण्याची सोय आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ
बसच्या शेवटच्या थांब्यापासून शिवथरघळीपर्यंत १० मिनिटे लागतात.⁠⁠⁠⁠







हि मूर्ती कोणत्या ठिकाणी आहे आणि या मूर्तीत कोणता प्रसंग चित्रित केला आहे ?

Daily Quiz # २४०

हि मूर्ती कोणत्या ठिकाणी आहे आणि या मूर्तीत कोणता प्रसंग चित्रित केला आहे  ?


उत्तर - गोवर्धन पर्वत उचलणारा कृष्ण.  हे शिल्प हळेबिड येथील मंदिराच्या भिंतीवर आहे.
होयसळ घराण्यांनी अत्यंत सुबक, बारीक बारीक कोरीम काम असलेली अशी मंदिरं कर्नाटकात निर्माण केली, त्यामुळे होयसळा शैली असं म्हटलं जातं.

Thursday, 22 June 2017

चिकणदर्याची वाट कुठल्या किल्ल्याशी संबंधित आहे ?

Daily Quiz # २३९

चिकणदर्याची वाट कुठल्या किल्ल्याशी संबंधित आहे ?

उत्तर : रतनगड

ह्या वाटेला बारा पाय-यांची वाट असे देखील म्हणतात.
देहने गावतून सुरु होवून कोकण दरवाज्या पर्यन्त  ही वाट आहे. 

सहसा या वाटेने कोणी जात नाही, वाट अज्जीबात मळलेली नाही, कोंकण दरवाज्याच्या खाली साधारण १५०-२०० फुटाचा पॅच लागतो. डेहणे गावातून सुरु केल्यावर ७-८ तास लागतात पोहोचायला. वाटेत मध्ये कुठेही पाणी नाही कात्रा बाई च्या व्हॅली चे अतिशय सुंदर दर्शन या वाटेवर होते. 

टीपू सुलतान चा मृत्यु कुठे झाला ?

Daily Quiz # २३८

टीपू सुलतान चा मृत्यु कुठे झाला ?

उत्तर-: श्रीरंगपट्टनम

श्रीरंगपट्टनम दक्षिण–मध्य कर्नाटक (भूतपूर्व मैसूर) राज्य, दक्षिण भारत में स्थित है। इसे पहले 'सेंरिगपटम' भी कहा जाता था। श्रीरंगपट्टनम मैसूर से 9 मील दूर कावेरी नदी के टापू पर स्थित है। पौराणिक किंवदन्ती है कि पूर्व काल में इस स्थान पर गौतम ऋषि का आश्रम था। मैसूर में स्थित 12वीं सदी में श्रीरंगपट्टनम एक मन्दिर था, जो भगवान श्रीरंग (विष्णु) का मन्दिर है। इसी मन्दिर के नाम पर इसका नाम 'श्रीरंगपट्टनम' रखा गया है।
रंगपट्टनम नगर 15वीं शताब्दी में क़िलाबन्द हुआ और मैसूर के राजा (1610 ई.) तथा सुल्तान (1761 ई.) की राजधानी बना। अंग्रेज़ों ने जब इस क़िले की सफल घेराबन्दी की, उस समय हैदर अली और उनके पुत्र टीपू सुल्तान का यहाँ पर शासन था। इस घेराबन्दी का अन्त अंग्रेज़ों के साथ एक संधि (1792 ई.) के रूप में हुआ। चौथे मैसूर युद्ध (1799 ई.) में टीपू सुल्तान की हत्या कर दी गई और क़िला एक बार फिर से अंग्रेज़ों के हाथ में आ गया। इस आधुनिक नगर में 17वीं शताब्दी के हिन्दू स्मारक के साथ-साथ टीपू सुल्तान द्वारा बनवाई गई विशाल मस्जिद को देखने के लिए बड़ी संख्या में पर्यटक आते हैं। टीपू सुल्तान का सुपरिष्कृत ग्रीष्मकालीन महल दरिया दौलत (1781 ई.) गंजम की पूर्वी उपनगरीय क्षेत्र में स्थित है। इस महल की दीवारों पर जुलूस और युद्ध के दृश्य चित्रित हैं। पास के लाल बाग़ के मक़बरे में दो सुल्तानों को दफ़नाया गया है। जांघिल, सफ़ेद बिज्जा (व्हाइट इबिस) वाक् बगुला और गाय बगुला (कैटल एग्रेट) के निवास वाले रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य के आसपास अनेक टापू हैं, जो इसी का हिस्सा हैं।⁠⁠⁠⁠

Tuesday, 20 June 2017

सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांवर आढळणार्या एक धड पण दोन तोंडे आणि दोन पंख असणाऱ्या पक्ष्याच्या शिल्पाला काय म्हणतात ?

Daily Quiz # २३७

सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांवर आढळणार्या एक धड पण दोन तोंडे आणि दोन पंख असणाऱ्या पक्ष्याच्या शिल्पाला काय म्हणतात ?

उत्तर : गंडभेरुंड

गंडभेरुंड - एक गूढ शिल्प, शंतनू परांजपे, साप्ताहिक सकाळ

आपण किल्ल्यांवर फिरायला जातो तेव्हा अनेक प्रकारची शिल्पे पाहतो. काही प्रवेशद्वारांवर तर काही भिंतींवर, भिंतींवरील चित्रांवर तर काही नाण्यांवर! यातील बहुतांश शिल्पे विविध प्राण्यांची, पक्ष्यांची असतात.

इतिहासाच्या पुस्तकात या शिल्पांबद्दल फारशी माहिती सापडत नाही, पण थोडेशी शोधाशोध केली तर बरेच काही सापडते.

या सापडणाऱ्या शरभ, हत्ती, व्याल, व्याघ्र इत्यादी शिल्पांसोबत एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आढळून येते ते म्हणजे दोन तोंडाच्या पक्ष्याचे, मनुष्याचे किंवा पक्ष्याचे एक धड पण दोन तोंडे आणि दोन पंख असणाऱ्या या पौराणिक पक्ष्याला गंडभेरुंड असे म्हणतात.

गंडभेरुंड हे नाव मात्र नवव्या शतकाच्या आधी आढळत नाही. त्यापूर्वी या पक्ष्याला भारुंड, भेरुंड किंवा भोरंड या नावाने ओळखले जात असे. पौराणिक यासाठी, की भारतातील बहुतांश पुराणांमध्ये याचा उल्लेख आढळून येतो. भरत मुनींनी लिहिलेल्या "भरतकोश' या ग्रंथात गंडभेरुंडचा उल्लेख येतो. तो असा,
गंडभेरुंड: देशीताल: गंडभेरुंड तालोय गजाभ्यांमुपरिस्थल: लक्ष्मण: हस्त: कपितथहस्तयोरर्मिलात्स्वास्तिकेनैव संभवेतगंडभेरुंड संज्ञाके विनियोगस्तु तत्र च गौरीमतम (संदर्भ- गडकिल्ल्यांवरील द्वारशिल्पे - महेश तेंडूलकर)

याशिवाय ऋग्वेदात, अथर्ववेदात, मुंडक व श्वेताश्वेतर या पक्ष्याचा उल्लेख आल्याचे आपणास आढळून येते. लहानपणी वाचलेल्या पंचतंत्र, सिंहासन बत्तीशी किंवा हितोपदेश यांसारख्या बोधपर गोष्टींमध्ये दोन तोंडाच्या पक्ष्याचा उल्लेख येतो मात्र तो केवळ कथेत. मात्र यातील बहुतांश कथा या लोककथा होत्या आणि त्या प्राचीन काळापासून चालत आल्या होत्या, पण त्यांचे अस्तित्व आपल्याला नाकारता येत नाही.

यातून एक कळून येते, की या ग्रंथांच्या आधीसुद्धा दोन तोंडांच्या पक्ष्याला महत्त्व असणार. अर्थात प्रत्यक्षात हा पक्षी होता का नाही याबद्दल माहिती नाही; परंतु दंतकथा किंवा शिल्पे यांवरून त्याचे अस्तित्व दिसून येते.
गंडभेरुंड या शब्दाची उत्पत्ती, शब्दाचा किंवा शिल्पाचा वापर कर्नाटक प्रांतात जास्त केलेला आढळून येतो.

कानडी भाषेत गंड या शब्दाचा अर्थ वीर किंवा योद्धा असा आहे, तर भेरुंड या शब्दाचा अर्थ द्विमुख असणारा पक्षी किंवा भयंकर पक्षी असा होतो. जैन साहित्यात सुद्धा या पक्ष्याला भारुंड असे नाव दिलेले आहे. या साहित्यातील वर्णन जर आपण पहिले तर या पक्ष्याला तीन पाय असल्याचे वाचनात येते; परंतु कोणत्याही शिल्पांमध्ये तीन पाय दिसत नाही हे विशेष.

भेरुंड हा शब्द कदाचित भारुंड या शब्दाचा अपभ्रंश आसावा, भा(बा) म्हणजे दोन आणि रुंड म्हणजे मुख. तर हे दोन शब्द मिळून भारुंड असा शब्द झाल्याचे नाकारता येत नाही. परंतु, पुराणात येणारे दाखले किंवा वेगवेगळ्या राजसत्तांनी केलेला उल्लेख यांवरून इतके लक्षात येते, की गंडभेरुंड हा पक्षी ताकदीचे आणि शौर्याचे प्रतीक मानला जाई आणि त्याचा संदर्भ बऱ्याचदा विष्णूचे वाहन असणाऱ्या गरुडाशी जोडलेला आहे.

दंतकथा :

प्रत्येक गोष्टीला एखादी दंतकथा ही असतेच. गंडभेरुंडच्या बाबतीत अशी दंतकथा सांगितली जाते, की भगवान विष्णू यांनी नृसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकशपुचा वध केला. नरसिंह अवतार हा सिंहाचे तोंड आणि मनुष्याचे शरीर घेऊन बनलेला असल्याने तो अधिक शक्तिशाली होता. त्यामुळे त्याने या शक्तीचा दुरुपयोग करून सर्व जगाचा संहार करायचे असे ठरवले. हे पाहून शंकराने शरभाचे रूप घेऊन नरसिंहाचा वध केला म्हणून विष्णूने शरभापेक्षा ताकदवान असलेल्या गंडभेरुंड म्हणजे दोन तोंडाच्या गरुडाचे रूप घेऊन शरभाचा पराभव केला. अशी ती कथा. पण यातून एक कळते, की गंडभेरुंड आणि शरभ हे एकमेकांचे वैरी दाखवले आहेत. त्यामुळेच, की काय महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांवर आढळणाऱ्या गंडभेरुंडच्या शिल्पांमध्ये शरभ हा नक्की असतो. एकतर गंडभेरुंड हा शरभाचा पराभव करताना दाखवला जातो किंवा शरभाने गंडभेरुंडचा पराभव केलेला दिसून येतो. या ऐकीव कथेवरूनच गंडभेरुंडची कल्पना आलेली असावी; कारण प्रामुख्याने महाराष्ट्रात अशा कथांना शिल्प स्वरूपात दाखवणे हे पूर्वीपासून चालत आलेले आहे. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर पुण्यातील त्रिशुंड गणेश मंदिरातील शंकराच्या लिंगोद्भव रूपाचे शिल्प. त्यामुळे गंडभेरुंड आणि शरभ यांच्यातील युद्धाला तरी वर सांगितलेल्या पौराणिक कथेचा आधार असावा.

हिट्टाइट ते भारत :

गंडभेरुंडचा प्रवास जर आपण पाहिलात तर कळेल, की वरील दंतकथेला फारसा अर्थ नाही कारण भारतात ही संकल्पना येण्यापूर्वी प्राचीन हिट्टाइट तसेच इजिप्शियन, सुमेरियन संस्कृतीमध्ये प्रचलीत होती. लगेश या सुमेरियन संस्कृतीमधील एका शहरात दोन तोंडाच्या गरुडाचे शिल्प आढळून येते. सुमेरियन संस्कृतीचा जर कालखंड आपण पहिला तर लक्षात येईल की, साधारण तीन हजार वर्षे इसवी सन पूर्व येतो, त्यामुळे दोन-तोंडाच्या गरुडाची संकल्पना त्याआधीसुद्धा असण्याची शक्यता नाकारू शकत नाही. पण पुरावा म्हणून गृहित धरले तरी साधारण इसवी सन पूर्व तीन हजार हे वर्ष दोन तोंडाच्या गरुडाचे उगमस्थान होते.

तरीसुद्धा इसवी सन पूर्व तीन हजार ते इसवी सन अठराशे, म्हणजे साधारण 4800 वर्षे या शिल्पाचा प्रभाव जगावर राहिला ते केवळ हे शिल्प अफाट ताकदीचे प्रतीक आहे म्हणूनच.

सुमेरियन संस्कृती नंतर हे शिल्प आढळून येते ते हिट्टाइट संस्कृतीमध्ये. बोगुस्की या तुर्कस्तानमधील एका गावात जे पूर्वी हिट्टाइट संस्कृतीचे राजधानीचे शहर होते. तिथे दोन तोंडाच्या गरुडाचे शिल्प एका दगडात कोरलेले दिसून येते. या शिल्पाचा काळ इसवी सन पूर्व सांगितला जातो. या गरुडाने त्याच्या दोन्ही पायात दोन ससे पकडले आहेत. याचा अर्थ एका बलाढ्य साम्राज्याने त्याच्या घबराट अशा शत्रूंचा पराभव केला. भारतात सशाच्या जागी हत्ती, शरभ इत्यादी दिसून येतात. दोन्हीकडे गरुड हाच ताकदवान दाखवला आहे. कातळात कोरलेल्या गरुडाशिवाय बोगुस्की शहरात असलेल्या इमारतींवरसुद्धा दोन तोंडाचा गरुड सापडल्याचे उल्लेख आढळतात. यानंतर दोन तोंडांचे गरुड हे इजिप्त तसेच असीरियन बांधकामांवर दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते हे शिल्प साधारण सहाव्या किंवा सातव्या शतकातल्या असाव्यात. यानंतर हे शिल्प रोमन साम्राज्य, पार्शियन साम्राज्य मग अरब, ग्रीक, हुण असे करत करत भारतात येऊन पोचले. भारतात कर्नाटक राज्यात या शिल्पाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आणि येथील बहुतांश राजांनी हे चिन्ह आपल्या दरबारचे चिन्ह म्हणून स्वीकारले. हा जवळपास हजार वर्षांच्या काळात या शिल्पाचे स्वरूपसुद्धा बदलले नाही हे आश्चर्य. हा थोडे फार बदल त्या त्या राजांनी केले असतील, पण मूळ कल्पना ही कायम राहिली.
दोन तोंडाचा गरुड (Two Headed Eagle)
वरती सारखा दोन तोंडाचा गरुड असा उल्लेख आला. अर्थात भारतात याचा उल्लेख गंडभेरुंड म्हणून येत असला तरी बाकीच्या देशात मात्र Two Headed Eagle असाच उल्लेख येतो.

Two Headed Eagle याचा इथे उल्लेख करायचे कारण म्हणजे याचे आणि गंडभेरुंड या दोघांमधील साम्य. दोघांनाही तोंडे दोनच आणि दोन्हीकडे हा पक्षी गरुडच. पण भारतात काही काही ठिकाणी मनुष्याचे धड आणि तोंड पक्ष्याचे अशा स्वरूपात सुद्धा हे शिल्प आढळते. वर उल्लेख केल्याप्रमाणे Two Headed Eagle हा हिट्टाइट, इजिप्शियन, सुमेरियन अशा विविध संस्कृतीमध्ये सापडतो, इतकेच काय तर महान अशा रोमन साम्राज्यात सुद्धा याचा वापर केल्याचे दिसून येते. युरोपातील वेगवेळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर होत होता किंवा अजूनही केला जातो. अनेक राजांनी याचा स्वीकार आपले चिन्ह म्हणून केला किंवा आपल्या नाण्यांवर हे चिन्ह वापरले. अर्थात या ठिकाणी गंडभेरुंडवर जोर जास्त आहे, त्यामुळे सर्व लिहित बसत नाही.
गंडभेरुंड हे जरी भारतात पडलेले नाव असले तरी बाहेरील देशात त्याचा उल्लेख हा Two Headed Eagle म्हणून येत होता. भारतात त्याचे आगमन होण्याआधी इतर देशात तो बऱ्यापैकी प्रसिद्ध होता. आश्चर्याची बाब एवढीच, की दोन्हीकडे, भारतात आणि बाहेरसुद्धा याचे स्वरूप शक्तिशाली काल्पनिक प्राणी असेच केले गेले. पण एकंदरच गंडभेरुंड किंवा Two Headed Eagle यावर कोणत्याही एका देशाचा हक्क नाही. बऱ्याच देशांमध्ये त्याचे अस्तित्व दिसून येते आणि अनेक देश ते अभिमानाने मिरवत आहेत. पण काळाच्या ओघात त्याचे महत्त्व कमी होत आहे, हे मात्र तितकेच खेदजनक.

भारतातील गंडभेरुंड :

भारतातील जुन्या काळातील गंडभेरुंड जर शोधायला गेले तर सापडतो तो सिरकप स्तुपावर असलेला गंडभेरुंड. इतर देशांप्रमाणेच दोन तोंडे आणि एक धड असे त्याचे स्वरूप होते. साधारण अकराव्या किंवा बाराव्या शतकापर्यंत भारतातील गंडभेरुंडचे स्वरूप असेच असावे. त्यानंतर मग त्यात शरभ, सिंह इत्यादी प्राण्यांची जोड मिळाली असावी. आता उल्लेख आलाच आहे तर सांगतो, माझ्या मनात अभ्यास करताना एक प्रश्न पडला आणि त्याचे उत्तर शोधण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला, तो प्रश्न असा कर्नाटक राज्यात हत्ती आणि गंडभेरुंड यांचे युद्ध दाखवले जाते किंबहुना गंडभेरुंडने हत्तीला पायात दाबून ठेवले आहे, असेच बऱ्याचदा दिसते. याउलट केरळमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा गजलक्ष्मीच्या रूपाने हत्तीची पूजा केली जाते.

गंडभेरुंड हे नाव बऱ्याच विजयनगर साम्राज्यातील राजांनी त्यांच्या नावापुढे लावले. दुसरा देवराय हा रायागजा-गंडभेरुंड या नावाने ओळखला जात असे. कृष्णराय आणि सदाशिव हे राजे गजंघ-गंडभेरुंड या नावाने तर अच्युतदेवराय हा राजा अरिभा-गंडभेरुंड या नावाने ओळखला जात असे. याशिवाय या राजांनी गंडभेरुंडची आकृती असणारी नाणीसुद्धा पाडली होती. महाराष्ट्रात या गंडभेरुंडाचे विविध प्रकार आढळतात. त्यापैकी जेता गंडभेरुंड आणि जित गंडभेरुंड असे दोन प्रकार मुख्यत्वे असतात.










मैसूरचा दसरा. प्रत्येक हत्तीच्या झूलीवर आणि प्रत्येक माहुताच्या अंगरख्यावर गंडभैरुंड.





ताम्रपाषाण युगातील पुरातत्वीय अवशेष महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या परिसरात सापडले ?

Daily Quiz # २३६

ताम्रपाषाण युगातील पुरातत्वीय अवशेष महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या परिसरात सापडले ?

उत्तर -: प्रवरा नदी

“जोर्वे संस्कृती”

 महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर पासून पूर्वेकडे ८ किलोमीटर अंतरावर प्रवरा नदीच्या काठावर जोर्वे गाव वसलेले आहे. या ठिकाणी डॉ. एच. डी. सांकलिया व डॉ. एस. बी. देव यांनी इ.स. १९५०-५१ साली केलेल्या उत्खननामुळे साधारणत: साडेतीन हजार वर्षापुर्वीची (इसवी सन पूर्व १२०० ते १५००) वसाहत उजेडात आली. प्राथमिक सर्वेक्षणात येथे ताम्रपाषाणयुगीन मातीची भांडी आणि गारगोटींच्या छिलक्यांची हत्यारे सापडली. त्यामुळे महाराष्ट्रात ताम्रयुग झालेच नाही, या मताचे खंडन झाले. या उत्खननानंतर इतर ठिकाणी केलेल्या उत्खननामध्ये इतरही अनेक वसाहती सापडल्या, पण “जोर्वे” येथील उत्खननानंतर त्या सापडल्या असल्याने “जोर्वे संस्कृती” या नावाने त्यांना ओळखले जाते. या संस्कृतीमधील समाज शेती प्रधान होता व तो स्थिरस्थावर होऊन शेती करू लागला होता. प्रवरेच्या तीरावर ही एक सुखसंम्पन्न वसाहत होती, असे संशोधनाअंती आढळून आले आहे.

 ज्या कालखंडात मानवाने तांबे आणि दगड यांचा हत्यार म्हणुन वापर केला, त्या कालखंडास “ताम्र-पाषाणयुग” या नावाने ओळखले जाते. भारतात ताम्रयुगातील अवशेष महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काही भागात आढलले आहेत. महाराष्ट्रामध्ये जोर्वे, नेवासे, दायमाबाद, इनामगाव या ठिकाणी असे अवशेष सापडले आहेत. या काळातील लोक गहु, धान्य आणि विविध प्रकारच्या कडधान्यांची शेती करत असत. शेतीसोबतच गाय, म्हैस, शेळी, उंट पालन यांचा व्यवसाय असे.

 जोर्वे येथील उत्खननात ब्राँझच्या सहा कुऱ्हाडी व एका तांब्याची बांगडी मिळाली होती. तसेच या ठिकाणी जास्त प्रमाणात रंगीत खापरे देखील मिळाली होती. काही कुंभ, वाडगे, थाळ्या देखील मिळाल्या होत्या. यावर पानांची, झाडांची तसेचा प्राणी आणि पक्षी यांचे चित्रे काढलेली आढळतात. अशा प्रकारची खापरे जोर्वे संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण मानली जातात. त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश व कर्नाटक आणि आंध्रच्या काही भागात केलेल्या उत्खननातून अशाच प्रकारची खापरे मिळाली. पण सर्वप्रथम जोर्वे याठिकाणी अशा प्रकारची खापरे सापडलेली असल्याने नंतरच्या अशा प्रकारच्या सर्व खापरांना जोर्वे संस्कृतीची खापरे म्हणून संबोधले जाते. “जोर्वे संस्कृती” अंतर्गत एक पाच खोल्या असलेल्या घराचे अवशेष सापडले आहेत.

 अकराव्या शतकातील काही शिलालेखात याचा ‘जउरग्राम’ असा उल्लेख येतो. स्थानिक परंपरेनुसार ‘जरासंधनगरी’ म्हणून हे ओळखले जाते.⁠⁠⁠⁠

"नऊ लक्ष बांगडी फुटली" असे वर्णन मराठ्यांच्या कोणत्या युद्धाचे केले जाते ?

Daily Quiz # २३५

"नऊ लक्ष बांगडी फुटली" असे वर्णन मराठ्यांच्या कोणत्या युद्धाचे केले जाते ?

मराठ्यांच्या इतिहासातील वसईचा दिग्विजय ही महत्त्वाची विजयश्री मानली जाते. त्या काळी पोर्तुगीजांचा अंमल कोकणपट्टीतील साष्टी प्रांतावर होता. तेथील प्रजा पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळली होती. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न केले होते. त्यामुळे पोर्तुगीज बरेच नमले होते. छत्रपतींच्या महानिर्वाणानंतर शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांना पुन्हा एकदा पोर्तुगीजांना धडा शिकवणे गरजेचे ठरले. मराठ्यांचे प्रशासन कल्याण प्रांतात इसवी सन १७१९ मध्ये सुरू झाले. तेव्हापासून मराठ्यांचा पोर्तुगीजांशी पुन्हा संघर्ष सुरू झाला. उत्तर फिरंगाण १७३७ व १७३९ या दोन वर्षांत जवळ जवळ पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात आले. उत्तर फिरंगणात साष्टी बेट, वांद्रे, वसई, ठाणेअंधेरीपासून वसईपर्यंतची अनेक बेटे कार्लाई, रेवदांडा, चौल, माहीम, तारापूर, चिंचणी इत्यादी परिसरांचा समावेश होतो.

स्थायी असलेले पोर्तुगीज अनिर्बंध सत्ता गाजवत होते. वसई हे त्यांचे प्रमुख ठिकाण होते. मराठ्यांनी वसई ताब्यात घेण्याचा चंग बांधला. वसईच्या उत्तरेला आगासी, शेजारी अर्नाळा हा जलदुर्ग, त्यापुढे माहीम व केळवे ह परिसर, पूर्वेस तांदुळवाडी, इशान्येस मनोहर व अशेरीगड आहेत. शिवाय, आसपास डहाणू, उंबरगा, नारगोल, खतलगड, दमण, कावणदुर्ग इत्यादी ठिकाणे आहेत. वसईजवळ खाडीवर घोडबंदर हे ठिकाण आहे.

चिमाजी अप्पांच्यानेतृत्वाखाली इसवी सन १७३७ च्या गुढीपाडव्यानंतर वसईच्या मोहिमेस प्रारंभ झाला. मराठे कल्‍याणमार्गे उत्‍तर कोकणात दाखल झाले. पोर्तुगीज ठाण्याच्या कोटाचे बांधकाम त्यापूर्वी काही वर्षे करत होते. बाजीरावांनी तो कोट बांधून पुरा होण्यापूर्वीच साष्टी बेट जिंकण्याचे ठरवले. शंकराजी फडके, गंगाजी नाईक अंजूरकर यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली ते काम करण्याचे योजले. गडाचा खाडीच्या तोंडावर असलेला बुरुज प्रथम उडवला गेला. त्यावेळी पोर्तुगीज गव्हर्नर पळून गेला. मराठ्यांनी साष्टी बेट ताब्यात घेतले. नारायण जोशींनी पारसिकचे ठाणे जिंकले. बेलापूर, धारावी, सांताक्रुझ ही ठिकाणे मराठ्यांच्या ताब्यात आली. मराठ्यांनी ठाण्यावरील हल्ला चपळाईने केला आणि वसईकडे मोर्चा वळवला.

माणिकपुऱ्यावरून वसईचा कोट गाठला. त्यांनी अनेक लहान ठाणी जिंकली. त्यानंतर झाडाझटका व न्याहऱ्या करून महादजी केशव, खंडो चिमणाजी, मोराजी शिंदे, बाळाजीराव, राजबाराव बुगुडकर राणे बहादूरपुऱ्यास रवाना झाले. त्यांचा वसईचा कप्तान ग्रेनेडियर याच्याशी सामना झाला. त्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या घोडदळास तुडवून बहादूपुऱ्याजवळ पहिला मोर्चा लावला. सोपारा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यामध्ये मराठ्यांना तेरा तोफा मिळाल्या. पाठोपाठ त्यांनी अर्नाळा जिंकला. मराठे त्याचा बंदोबस्त करून १ जुलै १७३७ ला पुण्यास परत आले. पुढे, ती मोहीम तशीच सुरू राहिली.

वसईच्‍या किल्‍ल्याच्‍या तिन्‍ही बाजूंना समुद्र आणि दलदल असल्‍याने तो किल्‍ला काबिज करणे अवघड होते. वसईच्‍या वेढ्यासाठी मराठ्यांनी दोन वर्षे कसून लढा दिला. मोहिमेत रामचंद्रपंत, अमरसिंह, शिर्के अशा दहा-पंधरा लोकांनी मोठा पराक्रम केला. पोर्तुगीजांकडे मराठ्यांच्‍या तुलनेत तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्‍त्रे अद्यावत होती. त्‍यांनी त्‍या साधनांच्‍या सहाय्याने मराठ्यांचे मोठे नुकसानही केले. मात्र मराठ्यांनी वेढा सैल पडू दिला नाही. कान्‍होजी आंग्रे यांच्‍या आरमाराने समुद्री मार्ग बंद केले असल्‍यामुळे पोर्तुगीजांची रसद बंद पडून त्‍यांची कोंडी झाली. वसईच्‍या मोर्चामध्‍ये महादजी केशव, जनार्दन हरि, गणेश हरि असे लोक सामिल होते. त्यांनी माहीमच्या कोटावर प्रचंड हल्ला चढवला आणि पोर्तुगीज दोन-तीन हजार सैन्यानिशी मराठ्यांच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी कोटातून बाहेर पडले. मराठ्यांच्या फौजेस बाहेर पडणे किंवा आत राहून शत्रूचा सामना करणे या दोन्ही गोष्टी अवघड होऊन बसल्या. रामचंद्रपंतांच्या हाताला पोर्तुगीजांची गोळी लागली. अनेक मराठे त्या धुमश्चक्रीत कोंडले गेले. त्यांची पार दाणादाण उडाली. त्यामध्ये राजबाराव बुगुडकर, वाघोनी खानविलकर, चिंतो शिवदेव, जनर्दन हरि, गणेश हरि हे सर्व लढवय्ये वीरगतीस प्राप्त झाले. तत्‍कालिन नोंदीनुसार त्‍या लढाईत मराठ्यांचे बारा हजार तर पोर्तुगीजांचे आठशे सैनिक कामी आले.

चिमाजी अप्‍पांनी २२ मार्च १७३९ रोजी वसईची मोहिम फत्‍ते करून मराठ्यांच्‍या इतिहासात मानाचा तुरा रोवला. विजयानंतर मराठी सैन्‍याने किल्‍ल्‍यातील चर्चमधील मोठ्या घंटा उतरवून त्‍यांची हत्‍तीवरून मिरवणूक काढली. त्‍यापैकी एक घंटा नाशिक येथील नारोशंकराच्‍या मंदिरात पाहण्‍यास मिळते. ती 'नारोशंकराची घंटा' म्‍हणून प्रसिद्ध आहे. दुसरी घंटा पालीच्‍या बल्‍लाळेश्‍वर मंदिरात आहे. वसईचा किल्‍ला स्‍वराज्यात यावा यासाठी चिमाजी अप्‍पा यांनी वज्रेश्‍वरी देवीस नवस केला होता. मोहिम फत्‍ते झाल्‍यानंतर चिमाजी अप्‍पांनी वसईला वज्रेश्‍वरी देवीचे मंदिर बांधले.

- सदाशिव शिवदे⁠⁠⁠⁠

Saturday, 17 June 2017

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रांन्सजवळ कुठल्या बोटीतून समुद्रात उडी मारली जेव्हा त्यांना इंग्लंड मध्ये अटक करून भारतात आणले जात होते

Daily Quiz # २३४

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रांन्सजवळ कुठल्या बोटीतून समुद्रात उडी मारली जेव्हा त्यांना इंग्लंड मध्ये अटक करून भारतात आणले जात होते

उत्तर -: मोरिया / मारिया

त्रिखंडात गाजलेली उडी

.... अटक होणार माहित असतानाही सावरकर पॅरीस हुन ब्रिटनला गेले. लिव्हरपुलला ब्रिटीश भुमीवर पाउल टाकल्या टाकल्या सावरकरांना अटक झाली.

खटला भारतात चालणार म्हणुन कैद्याचा वेष देउन त्यांना मोरीया नावाच्या बोटीतुन ब्रिटनवरुन भारतात पाठविले. त्या बोटीवर हातात साखळ दंड आणि कैद्याचा वेष..  जहाजावर चढण्यापुर्वी सावरकारांचे सहकारी एमपीटी आचार्य सावरकरांना भेटले बोटीवर चढता चढता सावरकर म्हणाले "गोष्टी जर नीट जुळुन आल्या तर आता आपण मार्सेय मधे भेटु !!! (ईग्रजी नुसार मार्सेलीस, फ्रेंच उच्चार मार्सेय) एक महान योजनेस सलाम

आचार्यांच्या लक्षात आल. त्यांनी निरोपा निरोपी केली रवीवार ७ जुलै १९१० मोरया मार्सेलीस बंदरामधे लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ जुलै सावरकरांनी सैनीकांना सांगीतले "मला जरा जाउन यायच आहे" बरोबर जे शिपाई होते. त्यांनी सावरकरांना त्या बोटीवरच संडास असतो त्याच्यात पाठविले. आतील गुन्हेगार / आरोपी दिसावा म्हणुन याला एक भोक असत. सावरकर आत गेले. अंगावरचे जे कपडे होते ते काढुन त्या भोकावर ठेवले. बोटींना पोर्ट होल असते. (पोर्ट होल: समुद्राच्या बाजुची भिंत असते. त्याला एक भोक असत ते, शरीर कसबस जाईल एवढ्याच आकाराच ते असत). पोर्ट होल कमोड पासुन सुमारे साडे सहा-सहाफुट ऊंचीवर होत. त्याला हात धरले प्रचंड ताकतीनिशी त्यावर चढले. त्याच्यातुन सावरकर गेले. बाहेर जे शिपाई उभे होते त्यांना जास्त वेळ लागतो आहे,  आतला माणुस दिसत नाही म्हणुन त्यांनी दार ठोठावल. आवाज नाही. म्हणुन शेवटी दरवाजा तोडुन घुसले तेव्हा त्या पोर्ट होल मधुन सावरकरांचे पाय बाहेर पडत होते.... महान साहसाला दंडवत

सावरकरांनी समुद्र पातळीपासुन २८ फुटावरुन समुद्रात उडी मारली. बोटी बाहेर रॅम्प असतो तो चुकवुन समुद्रात उडी !!!. धावत येउन समुद्रात उडी मारण शक्य आहे पण अश्या अवस्थेत उडी मारणे अत्यंत अवघड आहे. असा पराक्रम सावरकरच करु जाणे. सावरकरांनी पाण्यामधे सुर मारला, आणि गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला. सपासप पोहुन गोळ्या चुकावुन सावरकर किनाऱ्या पाशी आले. किनारा इथेही भिंत होती. साधीसुधी नाही तर ९ फुटाची गुळगुळीत भिंत. त्यावर चढले... कसे?, गुळगुळीत भिंतीवर...

सावरकरांची योजना होती. एकदा फ्रेंच भुमीवर पाय ठेवला की मी ब्रिटीश कायद्याच्या बाहेर. तेव्हा फ्रांस आणि ब्रिटनमधे एक्सट्रॅडिशन ट्रीटी, एकमेकांचे गुन्हेगार एकमेकांच्या सुपुर्त करण्याचा कायदा नव्हता. उलट त्यावेळी ब्रिटन व फ्रांन्स युरोपमधे एकमेकांचे स्पर्धकच होते. सावरकरांनी फ्रेंच भुमीवर काही गुन्हा केला नव्हता. त्यामुळे फ्रेंचानी ब्रिटीश पोलीसांना ताब्यात देणार नाही.

सावरकर किनाऱ्यावर आले. आणि रस्त्यावर पळत सुटले, ब्रिटीश पोलीसांनी किनाऱ्यावर आरडाओरडा सुरु केली हा चोर आहे चोर आहे. तिथल्या दोन फ्रेंच पोलीसांनी सावरकरांना पकडल. सावरकरांना फ्रेन्च भाषा येत नव्हती. सावरकर ईंग्लीश मधुन त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतायत पण  ते फ्रेंच पोलीसांना कळत नाही. ब्रिटीश पोलीस आले त्यांनी सांगीतल हा जहाजावरुन पळालेला चोर आहे. ब्रिटीशांनी फ्रेंच सैनीकाला लाच दिली.  आणी दुर्दैवाने फ्रेंच पोलीसांनी सावरकरांना ब्रिटीशांच्या ताब्यात दिल.

ब्रिटीश पोलीस सावरकरांना घेउन जहाजाकडे नेउ लागले तेव्हा सावरकरांना नेण्यासाठी शामजी कॄष्ण वर्मा आणि मॅडम कामा यांना घेउन आलेली कार आली आणि तिन पाहील. सावरकरांना कैद करुन घेउन चालले आहेत.....

मार्सेलीसची ही उडी त्रिखंडात गाजली. ब्रिटीशांची प्रचंड छीथु झाली. अनंत वृत्तपत्रात छापुन आली आणि सगळ जग स्तिमीत होऊन गेल.

पुढे सावरकरांनी हेगच्या अंतरराष्टीय कोर्टात अपील केल. मला फ्रेंच भुमीवर पकडण्यात आल. पण फ्रन्स मधे मी गुन्हा केला नाही. माझा खटला चालायच असेल तर आंतरराष्ट्रीय कोर्टा समोर चालावा. निकाल यायचा होता. आंतरराष्ट्रीय कोर्टात आपल्या विरुद्ध निकाल जाईल. अस व्हायला नको म्हणुन ब्रिटीशांनी खटला भरभर चालविला आणि दोन जन्म ठेपेंची शिक्षा सावरकरांना सुनविण्यात आली.

दोन जन्म ठेप म्हणजे ५० वर्ष. सावरकर म्हणाले याचा अर्थ ब्रिटीशांचा हिंदु सस्कॄतीवर विश्वास आहे. जन्मठेपेचा अर्थच आहे की गुन्हा एवढा गंभीर आहे की. उरलेला आक्खा जन्म तुरुंगात. सावरकर म्हणले ब्रिटीशांनी मला दोन जन्म ठेप सुनविल्या म्हणजे ब्रिटीशांच पुनर्जन्मावर विश्वास आहे. पुढल्या जन्मातली जन्म ठेपेची शिक्षा मला आत्ताच दिली. कोणत्याही परीस्थितीत न डगमगता आत्मविश्वासाने सामोरी गेलेल्या महान विरास क्रांतीकार्कांच्या मुकुटमणीस प्रणाम.

खरतर असे अनेक प्रसंग आले. अधिकारी सावरकरांना हिणवण्यासाठी म्हणतायत आता ५० वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा. तेव्हा बाणेदारपणे सावरकर म्हणतायत बस्स ५० वर्ष पण तोवर तुमच राज्य टिकल तर ना... आणि असच झाल....

स्वातंत्र्यवीर सावरकर की जय
भारत माताकी जय
वंदे मातरम

स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्लंड मध्ये अटक करून भारतात आणले जात असतांना त्यांनी फ्रान्सच्या कुठल्या बंदराजवळ बोटीतून समुद्रात उडी मारली ?

Daily Quiz # २३३

स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्लंड मध्ये अटक करून भारतात आणले जात असतांना त्यांनी फ्रान्सच्या कुठल्या बंदराजवळ बोटीतून समुद्रात उडी मारली ?

उत्तर : मॉर्सेलिस बेट

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते 'आचार्य प्रह्लद केशव' अत्रे यांनी दिली.

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना 'बाबाराव' हे मोठे आणि नारायणराव हे धाकडे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत
बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच
ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.

मार्च, १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.

इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. अभिनव भारत व मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनांची स्थापना त्यांनी केली. पुण्यामध्ये विदेशी कापडाची होळी केली (१९०५). श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचना स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते.

त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव
भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्‍याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉंब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते बॉंम्बचे तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने
नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध 'अनंत कान्हेरे' या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे
सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज
इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या
ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून
ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.

ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(१९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रांन्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनार्‍यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (१९११).मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रांन्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली
नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू
राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.

अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन
महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान
सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसर्‍या
भागात समाजसुधारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ
साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारावंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत समाजासमोर आलेले दिसतात.

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्द केले. हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी जे काम रत्‍नागिरीत केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला
जातिव्यवस्था, चातुर्वर्ण आणि हिंदूंचा धर्मभोळेपणाच जबाबदार आहेत, हे सावरकरांनी ओळखले आणि
त्या विरोधात कार्य केले. सावरकरांनी असंख्य मंदिरे दलितांना उघडी करून दिली. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रार्येंल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा याची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.

एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलुंसह स्वातंत्र्यवीर
सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व
तत्कालीन कॉंग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा,
सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अश अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले.

१९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २२व्या दिवशी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

सावरकर साहित्य :

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार,
जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंब-र्‍यांचा
लेखक,ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.
सावरकरांचे पहिले काम म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी
त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्‍नागिरीत
रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी.
शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट
विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने
आहेत.सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला.
सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य,
वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण,
सेवानिवृत्तीवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.


ग्रंथ आणि पुस्तके :

वीर सावरकरांनी ६,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्याच कमला या काव्यसंग्रहातील खालील ओळी त्यांचा कडवा राष्ट्रवाद दर्शवितात
-
अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती
त्याची महती गणती कोणी ठेवली असेल का?
परी गजेंद्र शुंडे उपटीले, श्रीहरिसाठी नेले,
फूल ते अमर ठेले मोक्षदाते पावन.
अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची.


इतिहास :

१८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा पहिले स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून
तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला जोडला)भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
हिंदुपदपादशाही


कथा :

सावरकरांच्या गोष्टी भाग - १
सावरकरांच्या गोष्टी भाग - २
नाटके :

संगीत उ:शाप
संगीत संन्यस्त खड्‌ग
संगीत उत्तरक्रिया
बोधिसत्व- (अपूर्ण)

कविता :

महाकाव्ये :

कमला
गोमांतक
विरहोच्छ्वास
सप्तर्षी
स्फुट काव्य
सावरकरांच्या कविता

जन्म:       मे २८, १८८३
           भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू:       फेब्रुवारी २६, १९६६ भारत
चळवळ:     भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:     अभिनव भारत हिंदू महासभा
धर्म:        हिंदू
वडील:      दामोदर सावरकर
पत्नी:       यमुनाबाई विनायक सावरकर⁠⁠⁠⁠



Thursday, 15 June 2017

कोकणातील दुर्गशृंखला

कोकणातील दुर्गशृंखला
- दीपाली रोहन पाटील (9/03/2015)
कोकण नाव घेतल कि डोळ्यासमोर सुंदर समुद्र किनारे, नारळांची बाग बगीचे आणि एकंदरीत निसर्ग सौदर्य, तेथील विशिष्ट अशी संस्कृती यांची नीर निराळी चित्र आपल्या दृष्टपटलावर तरळून जातात.कोकणाचे दोन भाग एक तळ कोकण आणि दुसरा म्हणजे कोकण यावेळी ट्रेक क्षितीज संस्थे ने आयोजित केलेल्या मालवण ट्रेक मुळे तळ कोकणात जाण्याचा योग आला आणि मनातल्या सुप्त इच्छा सुफळ संपूर्ण झाल्या.या ट्रेक चे नेतृत्व अमित सामंत यांनी यशस्वीरीत्या आणि अगदी सगळ्यांना हवे हवेसे वाटेल असेच केले. अमित सामंत आणि त्यांची अर्धांगिनी मूळचे कोकणातले असून आम्हा सगळ्यांचं स्वागत जणू माहेरी आलेल्या लेकीसारखाच त्यांनी यथासांग केलं. सगळी व्यवस्था अगदी चोख होती चमचमीत खाण्यापासून ते अगदी कोकणात बागडण्या पर्यंत.
मालवण ट्रेक नेमका , आणि मार्च २०१५  रोजी होळीच्या सुट्ट्या पाहून आयोजित करण्यात आला असल्याने आमची होळी कोकणातील दुर्ग शृंखलेचे दर्शन घेवून आगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.आणि मला ती मनापासून भावली. निसर्गाच्या सानिध्यात मुळी स्वर्गाभास झाल्यासारखाच वाटत. कोकण विभाग हा तसा आर्थिक दृष्ट्या संपन्न नसला तरी निसर्गाने भर भरून देणगी दिली आहे.कोकणाचा इतिहास अगदी अनादी काळापासून अस्तित्वात असून वर्षोन वर्षे या संपन्न भूमीची सगळ्याच लोकांनी दखल घेतली आहे.
या अभूत पूर्ण ट्रेक मुळे आम्ही स्वप्नवत वाटणारे १० किल्ले, मंदिर आणि डच वखार पहिली आणि आमची होळी हि खऱ्या अर्थाने खूपच रंगली.होळीत आपण वेग वेगळ्या रंगांची उधळण करतो आणि सणाचा आनंद घेतो वाईट गोष्टी सोडून नव्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो तेच आम्ही या निमित्ताने अंगिकारले आणि विभिन्न पण इतिहासाचे साक्षीदार असणारे किल्ले आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती घेवून आम्ही नखशिखांत अभ्यासिक पातळीवर न्हावून निघालो.
पहिल्या दिवशी रामगड, भरतगड , भगवंतगड आणि सिंधुदुर्ग पहिले.किल्ल्यांची इथंभूत माहिती ट्रेक क्षितीज च्या वेबसाईट वर दिलेली आहे. वाचकांसाठी लिंक येथे प्रस्तुत करीत आहे.
चारही किल्ल्याचा विस्तार आणि त्याचं महत्व जाणून घेत ते इतिहासाचे कसे शिल्पकार आहेत आणि कोकणातील त्याचं महत्व नजरेस पडेल तर नवल. भुईकोट आणि जलदुर्ग यांचा सुरेख संगम आपल्याला बघयला मिळतो.
दुसऱ्या दिवशी आम्ही परुळे मंदिर घुमडे देवीचं मंदिर आणि लक्ष्मि नारायण मंदिर तसेच यशवंत गड ( रेडीचा किल्ला ), तेरेखोल ( गोवा) आणि निवतीचा किल्ला पहिला. भुईकोट असूनही समुद्रकिनारा लाभलेले कोकणातील हे किल्ले दुर्ग शृंखले मधील शिरोमणीच आहेत.कोकणातील मंदिर विलोभनीय असून मनाला खूप शांतता लाभते. अधिक माहितीसाठी लिंक प्रस्तुत करीत आहे :
यशवंत गड (रेडीचा किल्ला ): http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Yashawantgad_(Redi_Fort)-Trek-Y-Alpha.html
तेरेखोल चा किल्ला: http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Terekhol_Fort-Trek-T-Alpha.html
तिसऱ्या दिवशी आम्ही असेच सुंदर इतिहासाचे ३ शिल्पकार पाहिले. त्यात छोटेखानी सर्जेकोट, विशिष्ट असा देवगड आणि सर्वांनी पहावा आणि इतिहास समजून घ्यावा असा विजयदुर्ग पहिला. अधिक माहितीसाठी लिंक प्रस्तुत करीत आहे:
विजयदुर्ग : माहिती अजून टाकायची आहे.
प्रत्येक दिवशी दुर्ग भ्रमंती करताना थकला भागला जीव जेवण्याच्या अधीन झाला तर काय गोष्ट.कोकण आणि तेथील चमचमीत , स्वादिष्ट आणि रुचकर जेवण मनाला खूप भावलं प्रत्येक घासा गणिक तृप्तीचा ढेकर आल्यावाचून राहिला नाही.कोकण आणि त्यातही घरचं जेवण लीना सामंत मुळे सगळ कसा सुखकर झालं.या सुगरनीला माझा भरभरून आशीर्वाद.
जाणीवपूर्वक लक्षात ठेवून खवायांसाठी जेवण्यातील पदार्थांची यादी पुढीलप्रमाणे:-
शाकाहारी ( कोकणी पद्धतीचं): आमरस, सोल कढी, भेडींची भाजी,आंबोळ्या काळ्या वाटण्याचे सांबार, डाळ भात,शेवयी खीर,साबुदाणा खिचडी , पोहे आणि इतर
मांसाहारी ( कोकणी पद्धतीचं) : कोंबडी वडे, सुरमयी, सौंदiळे, बांगडा, कालव,कोलंबी आणि इतर.
यथेच्छ जेवण, दुर्गभ्रमंती, गावात राहण्याची मजा, निसर्गाच्या सानिध्यात हरवलेले मन, इकडून तिकडून बागडणारे स्वच्छंद जीव आणि आम्ही भटके एकत्र आलो कि ज्ञानाची देवाण घेवाण , मजा मस्ती, धमाल आणि संस्मरणीय असे कधीच कोमेजणारे क्षण परत परत लाभो हीच सदिच्छा.

दीपाली रोहन पाटील