Daily Quiz # २४२
पावसाळ्याच्या आसपास डोंगर-उतारावर उभ्या असलेल्या माणसाच्या पाठीमागून सूर्यकिरणे येत असतील आणि समोरच्या उतारावर धुक्याचे वातावरण असेल तर त्या धुक्यात माणसाला संपूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्य दिसू लागते. याला काय म्हणतात ?
उत्तर : इंद्रवज्र
इंद्रवज्र दिसल्याची सह्याद्री परिसरात पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने, तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! त्यावेळी घोड्यावरून रपेट मारत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.
नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर त्याची नोंद आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवले आहे, की Accompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colors. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chain tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes, description would seem to show. या वर्तुळाची त्रिज्या पन्नास ते साठ फुट होती. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वत:लाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मध्यात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनुष्याचे तेजोवलय कडेला मात्र फिकट होत जाते.
इंद्रवज्र. छायाचित्रकार हर्षद पेंडसे. (मायबोली संकेतस्थळावरुन साभार)इंद्रवज्र म्हणजे निसर्गाचा चमत्कारिक आविष्कार! त्यासाठी भौगोलिक स्थितीही तशी असायला हवी. म्हणजे कशी? तर दिवस पावसाळ्याचे असावेत! वेळ सकाळची असावी. हलका पाऊस पडत असावा आणि गडाच्या पश्चिमेकडच्या त्या अक्राळविक्राळ कोकणकड्याकडून (पश्चिम दिशेकडून) दाट धुके असलेले ढग यायला हवेत. उगवत्या सूर्यनारायणाची कोवळी किरणे दरीतून वर झेपावणा-या ढगांवर पडली, की पाहणारांच्या सावल्या आणि त्याभोवती हे वर्तुळाकार इंद्रधनुष्य समोरच्या ढगांवर दिसू लागते. प्रेक्षक कड्याच्या दिशेने तोंड करून उभे राहिला, की निसर्गाचा हा अद्भुतरम्य आविष्कार त्याला पाहायला मिळतो. त्याच वेळी गडाच्या पठारावर मात्र धुके नसले पाहिजे. ते केवळ कड्यापर्यंत असावे. त्यामुळे अशी स्थिती जुळून येणे दुर्मीळ असते. आली तरी ते पाहायला मिळणे... हा सारा नशिबाचा, योगायोगाचा भाग! मुळात हे 'इंद्रवज्र' भारत देशात अत्यंत दुर्मीळ आहे. अनेक दुर्गयात्री त्यासाठी मोठी प्रतीक्षा करत असतात.
इंद्रधनुष्य / इंद्रवज्र कसे निर्माण होते ?
इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट अर्धगोलाकार/धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. खरे म्हणजे प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल ( इन्द्रवज्रच) असतो. पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे , कुठल्या दिशेने, त्यातले अंतर आणि किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते.
खालील आकृती वरून इंद्रधनुष्य कसे बनते याची कल्पना येऊ शकेल.
http://www.akolemaza.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A1-endravajr/
http://sahyadriindravajra.blogspot.in/

No comments:
Post a Comment