Daily Quiz # २४७
प्रश्न :- मोडीलिपीचे वर्गिकरण कोणत्या चार कालखंडात केले जाते ?
उत्तर :- यादवकालिन, शिवकालिन, पेशवेकालिन,आंग्लकालिन या चार कालखंडात केले जाते
मोडी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात
१२६० - १३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला.
छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बालबोध ( देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ई्स्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यानी केली. उर्दूप्रमाणे मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वापरून कमीतकमी ओळीत सारांश लिहिला जातो.
मोडीतली अक्षरांची वळणे गोलाकार (circular) असतात, त्यांमध्ये मराठीच्या विपरीत, काना खालून वर जातो. यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते. तसेच प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते. मोडी लिपीत चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणे प्रसिद्ध आहेत. पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला असे मानले जाते. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून इतिहास संशोधनाकरिता मोडी जाणकारांची कमतरता भासते.
मोडी लिपीचा इतिहास
मोडी लिपीचा नमुना - हे पत्र सवाई माधवराव पेशवे यांनी सेनापती महादजी शिंदे यांस ३०-१२-१७८४ रोजी लिहिले होते
मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते व मतभेद आहेत. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते मोडी लिपी अशोककालातील मौर्यी(ब्राह्मी)चाच एक प्रगत प्रकार आहे. वाकणकर आणि वालावलकरांच्या मते मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिण्याच्या तिच्या वैशिष्ट्यामुळे इतर लिपींपेक्षा वेगळी झाली आहे. मोडी लिपी श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही. [पहा: Typography Of Devanagari, १९६१, मुद्रक: महाराष्ट्र सरकार.]
मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात आहे. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे. मोडी लिपी अल्पप्रमाणात का होईना, १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती. शेवटच्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७००च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रांतील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.
मोडी लिपी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवाजी महाराजांचा काळ ते उत्तर पेशवाई ह्या काळांतील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे लक्षात येतात व मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मताप्रमाणे
ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या काळात मोडी संकल्पना महाराष्ट्रात येत होती. याच काळात पहिले मुस्लिम आक्रमण भारतात होत होते. लिखाणाकरिता कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण कागज हा फ़ार्सी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही. इतिहासाचार्य राजवाडे ज्ञानेश्वरीतील खाली नमूद केलेल्या ओव्यांचा आधार देतात.
देवनागरी अक्षरे आडव्या, उभ्या आणि टोकदार रेषांचा अवलंब करते त्यामुळे लिखाणाच्या हस्तलिखित प्रति बनवताना वेग कमी होतो. तर
शिकस्त प्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरून वापरली जाणारी मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती. विराम चिन्हांचा वापर इंग्लिश भाषाशी ओळख झाल्यानंतरच भारतीय लिपींत सुरू झाला.
मराठी लेखनाबद्दल ज्ञानेश्वरांनी खालील ओळीत उल्लेख केला आहे. :-
१]हे बहु असो पंडीतु , धरुणु बालकाचा हातु,
वोळी लेहे वेगवंतु, आपणाची॥(ज्ञानेश्वरी अध्याय १३,ओवी क्र.३०७)
२]सुखाची लिपी पुसिली ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ३,ओवी क्र.३४६)
३]दोषांचीं लिहिलीं फाडीं ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ४,ओवी क्र.५२)
४]आखरे पुसलिया ना पुसे, अर्थ जैसा ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ८,ओवी क्र.१७४)
इ.स. १८०१मध्ये विल्यम कॅरे या मिशनऱ्याने
पंडित वैजनाथ यांच्या मदतीने पहिला मोडी
लिथोग्राफ , श्रीरामपूर बंगालयेथे बनवला.
"रघु भोसल्यांची वंशावळी "," मराठी भाषा व्याकरण "," मराठी कोष", " नवा करार "(१८०७). या ग्रंथांची मोडी लिपीत छपाई केली गेली.
ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मराठी बायबल मोडी लिपीत छापले.
ए.के. प्रियोळकर यांनी मोडी छपाईचा
इतिहास लिहिला.
मोडी लिपीचे चार कालखंडांत वर्गीकरण केले गेले आहे - यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तीच, शिवकालीन शैलीय किंचित उजवीकडे झुकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधिक वर्तुळाकार आणि सुटसुटीत अक्षरे लिहिण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी सुरू केला. तोपर्यंत मोडी लिपी ही टाकाने लिहिली जात असे. असाच प्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत मोडी अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. पेशवेकाळातील लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाऊंटन पेनचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रुंदी आणि टोक येत असे ते या फाऊंटन पेनच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागुंतीची, किचकट आणि कुरूप दिसू लागली. फाऊंटन पेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राही. म्हणून सध्याचे मोडी लेखक फाऊंटन पेनच्या कॅलिग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि लिखाणात काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.
अलीकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून त्यांत असलेली लिपी, ही मोडी लिपी शिकस्तामधून निर्माण झाली या मताचे खंडण करतात. १०व्या शतकात “नस्तलीक” मधून “शिकस्ते” लिपी जन्मास आली. “शिकस्ता” म्हणजे “मोडकी नस्तलीक”. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्तामधून आली नव्हती. कारण, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत मराठी लोकांचा श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. मात्र मोडी लिपीचे नागरी, गुर्जरी(म्हणजे महाजनी) आणि बंगाली लिप्यांशी साधर्म्य आहे. गुजराती आणि बंगाली भाषा या सुरुवातीला देवनागरी लिपीत लिहिल्या जात, परंतु तेथील भाषाभिमान्यांनी हट्टाने वेगळ्या लिपीची उभारणी करून ती वापरण्यास सुरुवात केली.
मोडी वळणे
चिटणीसी, महादजीपंती , बिवलकरी , रानडी .
मोडी लिपीतील असंख्य दस्तऐवज हे खाली दिलेल्या ठिकाणी संग्रहित केले आहेत.
सरस्वती महाल ग्रंथालय, तंजावर , तामिळनाडू
कॉनेमारा ग्रंथालय, मद्रास युनिव्हर्सिटी ,
चेन्नई, तामिळनाडू
संग्रहालय: लंडन , पॅरिस , नेदरलँड्स, स्पेन वगैरे
भारत इतिहास संशोधक मंडळ ,पुणे
राजवाडे संशोधन मंडळ , धुळे
मराठी इतिहास संशोधन मंडळ (?)
मोडीचे प्रशिक्षण
मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे ढवळे प्रकाशन यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तके उपलब्ध आहेत.
तुम्हीच मोडी शिका या नावाचे डायमंड पब्लिकेशनचे पुस्तक - ह्या पुस्तकात निरनिराळे मोडी दस्तऐवज छापलेले आहेत.
जागतिक मोडी लिपी प्रसार समिती मुंबई येथे मोडीचे प्रगत वर्ग घेतले जातात.
भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे मोडीचे वर्ग घेतले जातात.
महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाद्वारे दरवर्षी उन्हाळ्यात, मोडी लिपीच्या प्रशिक्षणाची ८ ते १५ दिवसांची कार्यशाळा घेतली जाते. या कार्यशाळेत मोडी लिपीच्या लेखन-वाचनाची तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यवहार पद्धतीची माहिती (कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक अशा संदर्भांसकट) करून देण्यात येते. प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा असून ती उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळते.
मोडी लिपी म्हणजे देवनागरीची जलद लिपी! ती नावाप्रमाणे नागमोडी वळणाची, ब-यापैकी अखंड लिपी आहे. त्या लिपीचा उगम कसा झाला ते अज्ञात आहे. मोडी लिपीचे जनक हे देवगिरीच्या यादव साम्राज्याचे पंतप्रधान ‘श्रीकरणाधिप’ हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत हे होत असे काही लोक मानतात. यादवांच्या त्या अष्टपैलू पंतप्रधानाने मोडी लिपी यादवांच्या राज्यव्यवहारात आणली. यादव काळात अनेक लिपी प्रचलित होत्या, पण संत ज्ञानेश्वरांच्या वांङमयरचनेनंतर मराठीने झेप घेतली, ती हेमाडपंतांनी यादवांच्या साम्राज्यात सामावून घेतली. तेराव्या शतकातील अनेक संस्कृत व मराठी ग्रंथ मोडी लिपीत लिहिले गेले आहेत.
तो काळ म्हणजे यादव साम्राज्याच्या वैभवाचा कळसाध्याय होता. कला, वांङमय ग्रंथरचनेला राजाश्रय लाभला होता. देवनागरी लिपी सुबोध व सुवाच्य होती, परंतु लिहिण्यास फार वेळ घेई. मोडी लिपीचे ते महत्त्व ओळखून हेमाडपंतांनी मोडी लिपीला चालना दिली. देवगिरी साम्राज्याचे पत्रव्यवहार व साहित्य मोडी लिपीतून होऊ लागले. हेमाडपंतांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी रचलेल्या ग्रंथांची लिपी मोडी ही होती. मोडी लिपीला अखंड शिरोरेखा ओढली जाते व तिला धरून शब्द व वाक्ये अखंड लिहिली जातात. त्या ‘शिरोरेघे’चे जनक हेमाडपंतांना मानण्यात येते.
देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्याला पुढे परचक्राचे ग्रहण लागले. पण, मोडी लिपीचे सुगीचे दिवस सुरुच राहिले. मोडीला देवगिरी सम्राटाच्या राजवटीत लाभलेला राजाश्रय अव्याहतपणे सुरू राहिला.
मोडी लिपीचे चार कालखंडांत विभाजन होते - बहमनी, शिवकालीन, पेशवेकालीन व आंग्लकालीन.
देवगिरी नंतरच्या बहमनी राजवटीतही राज्यव्यवहाराची लिपी मोडीच राहिली. कारण बहुसंख्य सरदार व अधिकारी वर्ग हा मराठा व ब्राह्मण समाजाचा होता. बहमनी कालखंडातील मोडीमधील कागदपत्रांमध्ये फारशी-अरबी शब्दांचा भरणा आढळतो. भाषा मराठी, लिपी मोडी, पण अनेक राजकीय शब्द फारशी-अरबी असा शिरस्ता त्या काळातील पत्रांमध्ये आहे. बहमनीकालीन मोडी लिपीत लेखनाची पद्धत अस्ताव्यस्त व वाचण्यास क्लिष्ट आहे.
बहमनी कालखंडात अतिबलाढ्य मोगल सत्तेस थोपवून धरणारे निजामशाहीचे सरसेनापती लखुजी जाधवराव, निजामशहाला मांडीवर घेऊन त्यांच्या नावे अप्रत्यक्षपणे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे शहाजीराजे भोसले, मलिक अंबर वगैरे मातब्बर सेनानी व सरदार यांचा इतिहास या बहमनीकालीन मोडी कागदपत्रांत अप्रकट राहून दडला आहे. त्या कालखंडातील हजारो कागदपत्रे अजून अभ्यासली गेलेली नाहीत. त्याच कालखंडात महाराष्ट्राला नवसंजीवनी देणा-या भोसले कुळीचा उदयकाळ मालोजीराजे यांच्या कारकिर्दीच्या रूपात झाला. तोही त्याच कालखंडातील कागदपत्रांत दडून बसला असावा.
बहमनी राजवट पाच शाह्यांमध्ये विभक्त झाली. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीद्शाही आणि इमादशाही. त्यांतील बरीद्शाही आणि इमादशाही यांना बाकी तिन्ही शाह्यांनी लवकरच नष्ट केले. शिवाय, त्या तीन शाह्यांचे आपापसांतील संघर्ष व त्यांचे मोगल सत्तेशी संघर्ष असा तो रंजक इतिहास आहे. तो अजून बराच अभ्यासायचा राहिला आहे. त्या काळात त्या सर्व लढायांत व धामधुमीत प्रामुख्याने मराठा सरदार आघाडीवर लढत होते. त्या काळात उत्तरेतून अनेक क्षत्रिय व ब्राह्मण घराणी ही मोगल जाचाला कंटाळून दख्खनमध्ये आली. त्या सर्वांचा मागमूस त्या काळातील कागदपत्रांत आढळू शकतो.
छत्रपतींच्या आयुष्याच्या पूर्वार्धातील कागदपत्रांवर बहमनीकालीन शैलीचा प्रभाव जाणवतो. छत्रपतींना १६५८च्या सुमारास कोकण मोहिमेवर असताना शत्रुपक्षाकडे नोकरी करणारे बाळाजी आवजी चित्रे भेटले. त्यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून त्यांना चिटणीस हे पद दिले गेले व तेथूनच शिवकालीन मोडी लिपीच्या शैलीला प्रारंभ झाला! तीच शिवकालीन ‘चिटणीशी’ मोडी शैली. त्या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे वळणदार मोडी अक्षर दिसण्यास सुंदर व वाचण्यास सुलभ! तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायनिवाडे, राज्यव्यवहाराची पत्रे व आज्ञापत्रे ही त्या शैलीत आहेत.
मराठी भाषेत झालेला फरकसुद्धा त्या कालखंडातील पत्रांत दिसून येतो. शिवाजी महाराजांनी फारशीचा वापर टाळून, अधिकाधिक मराठी व संस्कृत शब्द वापरण्यावर दिलेला भर त्या काळातील मोडी पत्रांत आढळतो. आरमार उभारणी व दुर्गराज रायगडच्या बांधणीसाठी अनुदान व जमाखर्च या सा-या नोंदी त्या शैलीतील मोडी लिपीत आहे. श्रीशिवराज्याभिषेक व दक्षिणदिग्विजय यासंबंधीची पत्रे त्याच मोडी शैलीत आहेत.
शिवाजी महाराजांच्या मृत्युपश्चात शंभुराजे पन्हाळ्याहून राजधानी रायगड येथे दाखल झाले. तेव्हा, त्यांनी किल्ले रायगडाचा खजिना, जिन्नस आणि दफ्तर यांचा समग्र टाळेबंद करवून घेतला. तो सर्व त्याच शिवकालीन शैलीतील मोडी लिपीत आहे.
शंभुछत्रपतींच्या काळात झालेला थोडाफार बदल वगळता त्याच शैलीचा प्रभाव कायम दिसतो. छत्रपती राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत हिरेपारखी ऊर्फ सभासद यांच्याकडून शिवछत्रपतींचे चरित्र लिहवून घेतले. ते चरित्र सभासद बखर म्हणून प्रसिद्ध आहे. शिवछत्रपतींवर लिहिले गेलेले मराठीतील ते पहिले चरित्र. ते शिवकालीन ऊर्फ चिटणीशी शैलीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांशी झालेला १६६७ चा तह, शंभुछत्रपतींनी फोंड्याच्या दर्ग्याला दिलेले दानपत्र व पेडणे येथील देसाई केशव प्रभू यांनी दक्षिण कोकणातील किल्ल्यांविषयी गोव्याचे पोर्तुगीज विजरई (व्हाइसरॉय) यांस पाठवलेला जाबिता (अहवाल) म्हणजे त्याच्या दगाबाजीचा पुरावा (सध्या लिस्बन येथे आहे); ती सर्व पत्रे शिवकालीन मोडी शैलीत आढळतात.
शाहू महाराजांच्या काळात सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ ‘पेशवे’ झाले व पेशवेकालीन लेखनशैली मोडी लिपीत रुजू झाली. त्या काळातील सर्वात दखलपात्र घटना म्हणजे वारण्याचा तह. त्यातून सातारा व कोल्हापूर अशा दोन छत्रपती गाद्या वेगवेगळ्या निर्माण झाल्या. वारण्याचा तह मोडी लिपीत आहे. पेशवेकालीन शैलीचा त्यावर प्रभाव दिसतो. पेशवेकालीन लिपीत सुद्धा जागोजागी वेगवेगळ्या लेखनशैली दिसून येतात. पण, कालखंड एकच असल्याने तीस पेशवेकालीन असे सरसकट संबोधले जाते.
त्याच काळात उदयास आलेल्या दोन लेखनशैली म्हणजे तंजावरी व इंदुरी ह्या होत. त्यांतील तंजावरी शैली ही बहमनी धाटणीची पण सुवाच्य आहे. इंदुरी शैलीत टापटीपपणा व दोन ओळींमधील अंतर बरेच दिसते. त्या दोन शैली आंग्ल काळाच्या अस्तापर्यंत प्रभावशाली दिसतात. बहुतेक मराठी बखरी पेशवेकाळात लिहिल्या गेल्या असल्याने त्यांच्यावर पेशवेकालीन शैलीचा प्रभाव जाणवतो. दिल्लीच्या बादशाहकडून बाळाजी विश्वनाथ यांनी चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा १७१९ साली आणल्या (त्या फारशीत होत्या). आणि त्यानंतर फारशी शब्दांचा भरणा मोडी लिपीतील मराठी राज्यकारभारात पुन्हा वाढू लागला. पुढे, १७५२ मध्ये अहमदिया करार झाला व पुढील सर्व मराठी राज्यव्यवहारात फारशी शब्दांचे प्रमाण अधिक वाढले. शिवाय, त्या कालखंडातील मोडी पत्रांत उत्तरकाळात राज्याभिषेक शक वापरण्याची रीत संपुष्टात आली. शालिवाहन शक आणि सुहूर सनाचा वापर प्रकर्षाने दिसून येतो.
अटक ते कटक पसरलेली मराठी दौलत, निजामाचा वेळोवेळी झालेला पाडाव व राजपुताना आणि म्हैसूरवर बसवलेली दहशत हा दैदिप्यमान इतिहास त्याच शैलीतील मोडी कागदपत्रांतून वाचण्यास मिळू शकतो.
तसेच, सरखेल तुळाजी आंग्रे यांच्या आधिपत्याखाली असलेल्या बलाढ्य मराठा आरमाराची वाताहत व स्वकीयांकडून झालेल्या होळीचे दाखले त्या काळातील मोडी पत्रांत आढळतात. पानिपतचा जमाखर्च आणि सदाशिवरावभाऊ व नानासाहेब पेशवे यांच्यातील मोहिमेसंबंधीचा पत्रव्यवहार त्याच शैलीत आढळेल.
माधवराव पेशव्यांचा कालखंड, त्यांच्या कारकिर्दीतील राक्षस भुवनची प्रसिद्ध लढाई हा पत्रव्यवहार, हैदर अलीचा दोनदा केलेला बीमोड त्या शैलीतील कागदपत्रांत आढळून येईल.
नारायणराव पेशवे यांचा वध व तदनंतर मराठी दौलतीत माजलेली यादवी यांचा अभ्यास त्याच कालखंडातील मोडी पत्रांतून करावा लागतो. मराठेशाहीचे आधारस्तंभ ठरलेले महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, रघुजी भोसले व नाना फडणवीस यांचे समग्र योगदान जाणून घ्यायचे असल्यास त्या मोडी पत्रांचाच आधार घ्यावा लागेल.
विल्यम कॅरी या ब्रिटिश अधिका-याने मोडी लिपी १८०८ साली टंकलिखित केली आणि ‘डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज’ नामक पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश छापला. पुढे, इंग्रजांचा अंमल भारतावर सुरू झाला व लेखनपद्धतीत ‘फाऊंटन पेन’ हा नवा प्रकार लेखनासाठी वापरात आला. परिणामी, अक्षरांची वळणे बदलून, ती छोटी होत गेली व लिखाण बेशिस्त होऊ लागले. सर्व व्यवहार त्या शैलीच्या मोडी लिपीत होऊ लागले. नवी शिक्षणपद्धत अंमलात येऊन प्राथमिक शिक्षण हे त्याच शैलीतील मोडीत होऊ लागले. ते १८५० नंतरच्या मोडी पत्रांत प्रकर्षाने जाणवून येते.
प्रत्यक्षदर्शी गोडसे भटजींनी ‘माझा प्रवास’ या पुस्तकाच्या माध्यमातून १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा पहिला वृत्तांत मराठी भाषेतून व मोडी लिपीतून लिहून काढला होता. स्वातंत्र्यसेनानी वासुदेव बळवंत फडके यांची मोडी लिपीतील हस्तलिखिते उपलब्ध आहेत.
लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतीराव फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सारख्या दिग्गज स्वातंत्र्यसेनानींच्या कर्तबगारीची साक्ष मोडी लिपीतील त्यांची हस्तलिखिते पटवून देतात.
मुंबई सरकारने मोडी लिपी ‘कालबाह्य’ म्हणून १९५२ साली मोडीत काढली.
अहद तंजावर तहद पेशावर पसरलेल्या मराठी साम्राज्याची लाखो कागदपत्रे पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, ग्वाल्हेर, इंदूर, नागपूर, दिल्ली जयपूर, तंजावर इत्यादी ठिकाणी इतिहास व मोडी अभ्यासकांची प्रतीक्षा करत आहेत. ती एकत्रित संख्या कोट्यवधींच्या घरात जाऊ शकते. इतकेच काय तर डेन्मार्क, पोर्तुगाल, नेदरलँड, इंग्लंड इत्यादी युरोपीय देशांत हजारो मोडी पत्रे असण्याची शक्यता आहे. गोव्याच्या व्हाइसरॉयने हजारो कागदपत्रे सुरक्षिततेच्या कारणासाठी १७७७ मध्ये पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे पाठवली, त्यात मोडी कागदपत्रे असण्याची शक्यता आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे म्हटले आहे, की महाराजांचा दहा टक्केच इतिहास महाराष्ट्राला अद्याप ज्ञात आहे. म्हणजेच, तेथील अभ्यासकांना अजूनही छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे कळलेले नाहीत.
दरवर्षी, हजारो मोडी कागदपत्रे वाळवी लागून, उंदरांच्या कुरतडण्यामुळे अथवा शाई उडून गेल्यामुळे निकामी ठरून, नष्ट करण्यात येतात.
मोडी लिपीचा इतिहास -
मोडी लिपी ही १३ व्या शतकापासुन २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेची प्रमुख लेखन पद्धती होती."महादेव यादव" आणि "रामदेव यादव" यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ मध्ये "हेमाद्री पंडित (हेमाडपंत)" नावाच्या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला असे परंपरेने मानले जाते परंतु ही लिपी राजा अशोकाच्या काळातही अस्तित्वात असल्याचे नवीन संशोधनातुन समोर आले आहे.
मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते आणि मतभेद आहेत.इतिहासाचार्य वि.का.रानडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते ही लिपी अशोककाळातील मौर्यी (ब्राह्मी) चाच एक प्रगत प्रकार आहे,पण मोडी लिपी ही श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही.तसेच मोडी हा शब्द फारसी भाषेतील "शिकस्ता" यावरून तयार झाला आहे असे म्हंटले जात होते पण अलिकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढळलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून मोडी लिपी ही शिकस्ता मधून निर्माण झाली या मताचे खंडण करते. १०व्या शतकात "नस्तलीक" मधून "शिकस्ते" लिपी जन्मास आली. "शिकस्ता" म्हणजे "मोडकी नस्तलीक". यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्ता मधून आली नव्हती. तसेच, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता.
मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात होती. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे.मोडी लिपी ही मराठीची जुनी लिपी आहे पण मोडी लिपी प्रचारात येण्याच्या आधी आपल्या इथे नागरी लिपी वापरली जात होती.आपले सर्व जुने शिलालेख,अगदी शिवकालीन लेखही नागरी लिपीतच आहेत.मोडी लिपी ही नागरीचीच 'रंनिंग' लिपी आहे. त्यामुळे नागरी/देवनागरी आणि मोडी यात फारसा फरक नाही. पण मोडी अनेक वर्षे सतत वापरात असल्याने तिचे स्वरूप जास्त बदलत गेले. म्हणजे शिवकालीन मोडी आणि उत्तर पेशवेकालीन मोडी यातही फरक आहे.
सुरवातीच्या काळात मराठी-मोडी लिहिण्यासाठी ज्या शाईचा वापर होत असे ती शाई चिंचेच्या बियांपासून काढलेले बलक व कोळशाच्या किंवा लाखेच्या भुकटीच्या मिश्रणापासून बनवली जात असे. ह्या शाईचे लिखाण पुसले जाणे अतिशय कठिण तसेच लेखणी साठी बोरूचा वापर होत असे.
मोडी लिपीचा पहिला लिथोग्राफ, सेरामपुर बंगाल येथे इ.स.१८०१ मध्ये विल्यम कॅरे याने पंडित वैजनाथ यांच्या मदतीने बनवला व १८०७ मध्ये 'रघु भोसल्यांची वंशावळी', 'मराठी भाषा व्याकरण','मराठी कोश' या ग्रंथांची मोडी लिपीत छपाई केली गेली.
मोडी लिपीतील बदल -
मोडी लिपी १९५० पर्यंत लिखाणात वापरली जात होती पण गेल्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७००च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रातील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.मोडी लिपी पेशव्यांच्या काळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, अत्यंत शुध्दलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवकाळ ते उत्तर पेशवाई ह्या काळातील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे, बदल लक्षात येतात. मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.
मोडी लिपीचे कालखंड -
मोडी लिपीचे वर्गीकरण हे चार कालखंडात केले गेले आहे.– यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखानात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तिच, शिवकालीन शैलीत किंचीत उजवीकडे वाकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधीक वर्तुळाकार आणि सुटसूटीत अक्षरे लिहीण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांजकडून सुरु झाला. इथ पर्यंत मोडी लिपी ही टाक ने लिहीली जात. याच प्रयत्नांना पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत ती अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसूटीत लिहीली गेली. पेशवेकाळात लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाऊंटन पेनाचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रूंदी आणि टोक येत ती या फाऊंटन पेनाच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागूंतीची, किचकट आणि कुरूप दिसू लागली. फाऊंटन पेनाचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून रहात. म्हणून सध्याचे मोडी लेखक फाऊंटन पेनाच्या कॅलीग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.
मोडी लिपीची वैशिष्ठे -
• देवनागरीपेक्षा मोडी लिपीत जलद गतीने लिहिता येते.
• मोडी लिपीत केवळ एकाच 'ई' काराचा व 'ऊ' कराचा वापर होतो त्यामुळे ऱ्हस्व-दीर्घ च्या चुका कमी होण्यात मदत होते. मोडी लिपीत दोन अक्षर एकमेकांना जोडून लिहिण्याच्या विशिष्ट
पद्धतीमुळे, लेखणी वारंवार उचलण्याचा प्रसंग कमी येतो व त्यामुळे लिखाणाची गती वाढण्यास मदत होते.
• मोडीतील जोडाक्षरे ही संस्कृत भाषेचे नियम पाळतात.
• मोडीतील जास्तीत जास्त अक्षरे ही 'नागरी' आहेत. 'काने' चा उपयोग वरच्या बाजूला तसेच पुढील अक्षराला जोडण्यासाठी केला जातो.
• 'ई', 'ज', 'झ', 'त्र', 'ट', 'द', 'ध' ही मोडी अक्षरे 'नागरी' तील घसाटी पद्धतीने लिहिली जातात. उ. दा. गुजराती व महाजनी.
• अनुस्वाराच्या बाबतीत मोडीचे स्वतंत्र नियम आहेत.
• डोक्यावरील आडवी रेषा वाक्याचे लिखाण सुरू करण्यापूर्वी आखून घेतात जेणेकरून लिहिताना सारखा हात उचलावा लागू नये, ज्या गोष्टीची गरज नागरी लिहिताना भासते.
• थोडक्यात मोडी ही घसाटी पद्धतीने लिहिलेली नागरी होय.
• अतिशय मोजक्या ठिकाणीच लेखणी उचलली जाते.
• मोडी अक्षराची सुरवात व शेवट वरच्या ओळीवर असतो.
• मोडी अक्षरांना कुठेही टोके नकोत. सगळी अक्षरे अतिशय वळणाकृती व गोलाकार असली पाहिजे.
• जोडाक्षर 'बाळबोध' पद्धतीने लिहिली जातात.
• 'आ'कार व 'काना' लिहिताना रेषा खालून वर अशी ओढली जाते.
• 'ई'कार लिहिताना वेलांटी पाठोपाठ 'काना' लिहिला जातो. सगळ्या मात्रा ह्या शब्दाच्या शेवटी दिल्या जातात.
मोडी लिपी शिकतांना/वाचतांना घ्यावयाची काळजी -
•मोडी लिपीमध्ये वेगवेगळ्या अश्या ४८ अक्षरांचा समावेश असतो, त्यामधे ३६ व्यंजने तर १२ स्वर असतात.
•लिखाणाची सुरवात करण्यापूर्वी, संपूर्ण पानावर आडव्या रेषा मारून मग दोन रेषांच्या मध्ये ही लिपी लिहिली जाते.
•ह्या लिपीत विराम चिह्नाचा किंवा उभयान्वयी अव्ययांचा अभाव असतो,वाक्य समाप्ती दर्शविण्यासाठी कुठल्याही चिन्हाचा वापर नसतो,तसेच देवनागरी लिपीत वापरण्यात येणाऱ्या उभ्या रेषांचा
उपयोगही नसतो.
•वाक्यातील दुरुस्ती ही फुली मारण्यापेक्षा साधारणपणे चुकीच्या अक्षराखाली किंव्हा शब्दाखाली आडवीरेष मारून दर्शविली जाते.
•काही वारंवार येणाऱ्या शब्दांसाठी त्याचे संक्षिप्त रूप करून त्याचा लिखाणामध्ये उपयोग केला जातो.
•मोडो लिपीत शब्द न तोडता सलग लिहिला जातो.संपूर्ण शब्द मावत नसेल तरी त्याची जेवढी अक्षरे त्या ओळीत लिहिणे शक्य असेल तेवढी अक्षरे अक्षरशः कोंबलेली असतात.त्यामुळे तो
शब्द वाचकास माहित असणे फार गरजेचे असते.
मोडी लिपीची हाक -
मोडी लिपीचा काळ हा ९०० वर्षांपेक्षा जास्तचा आहे म्हणजे महाराष्ट्राचा ९०० वर्षापासूनचा सगळा इतिहास मोडीत लिपीबद्ध केला गेला आहे.एवढा सम्रुद्ध इतिहास लाभलेल्या देशात तोच इतिहास अभ्यासुन लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाणकारांची कमतरता भासते आहे.आज पुण्यात 12 लाखांपेक्षा जास्त मोडी लिपीतील दस्तऐवज उपलब्ध आहेत पण त्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासासाठी त्यामानाने अभ्यासक कमी आहेत.असे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत कि ज्यांच्या जवळ जुनी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत पण मोडीच्या अज्ञानाने तो अनमोल ठेवा दुर्लक्षित केल्या जात आहे.
इतकी वर्षे आपण आपल्याला शिकवला गेलेलाच इतिहास पुढच्या पिढीला शिकवत आलो आहोत पण अजूनही अंधारात असलेला इतिहासाचा अभ्यास करून तो नवीन पिढीला शिकवण्याच्या आपल्या कर्तव्याकडे कानाडोळा करण्याच्या वृत्तीने मोडी लिपीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आज आपण फक्त शिवरायांनी केलेल्या पराक्रमांबद्दल बोलतो,पण तो पराक्रम गाजविण्यासाठी त्यांनी कोणती आणि कशी तयारी केली,राज्यकारभार कसा सांभाळला,शिवरायांची राजनीती, युद्धनीती व न्यायनीती या विषयांचा अभ्यास व्हायला नको का?ह्या बद्दलची माहिती जगापुढे यायला नको का? इ.स.१९५६ मध्ये स्व.यशवंतराव चव्हाण यांनी मोडी जाणकारांना हे ऐतिहासीक दस्तावेज मोडी लिपीतून देवनागरी लिपीत लिप्यांतर करण्यासाठी खुले निमंत्रण दिले होते त्यावेळी त्यांना महाराष्ट्र सोडून इतर राज्यांतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.ही मराठी म्हणवणारया साठी लाजिरवाणी गोष्ट होती पण त्याहीपेक्षा लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जेव्हां त्यांना जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीच्या इतिहास विभागाकडून पत्र आले की ‘तुमच्याकडे मोडी लिपी वाचक नसतील तर आमच्याकडील कुशल लोक तुमच्या विनंतीवरून आम्ही पाठवू शकतो’.त्यावेळी मराठी जनतेला या जपानी लोकांचे फार कुतूहल वाटले पण स्वत:ची लाज वाटली नाही आणि आजही ती तशीच कायम आहे.फक्त तोंडानी "शिवाजी महाराजकी जय" म्हणुन फायद्याच नाही तर इतिहासाचा अभ्यास करून नवीन पैलु प्रकाशात आणण्यासाठी जिज्ञासु तरुण रक्ताने पुढे सरसावण्याची गरज आहे.जगातील सगळ्या गोष्टी ह्या नश्वर आहेत पण इतिहास हा तसाच टिकून राहणार आहे.आज जर आपण असेच हातावर हात ठेऊन बसून राहिलो तर ही ९०० वर्षांची कागदपत्रे नष्ट होऊन बराच अज्ञात इतिहास काळाच्या पडद्याआड नक्की जाईल व आपण संपूर्ण इतिहास समजून घेण्यापासून वंचित राहू.वाळवीच्या प्रादुर्भावामुळे वर्षाला हजारोनी पत्र जाळून टाकली जातात. म्हणजे ही आपली ऐतिहासीक अमुल्यवान संपत्ती आणि अप्रकाशित इतिहास कायमचाच नष्ट होत आहे की जो वर्तमान आणि भावी पिढीला कधीच कळणार नाही.
चीन पासून इटली पर्यंत, जपान पासून मेक्सिको पर्यंत सगळ्याच देशांना आपल्या भाषेचा आणि इतिहासाचा अभिमान आहे व तो जपण्याचा ते प्रयत्न करत असतात.२००८ च्या चीनमधील ऑलंपिकच्या उदघाटन सोहळ्यात चीनच्या पंतप्रधानांनी चीनी भाषेतच आपले भाषण केले होते.ऑलंपिकमधील उलटी मोजणी सुद्धा चीनी अंकातच होती. २ तास चाललेल्या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चीनी संस्कृतीचं,इतिहासाचा प्रदर्शन केल.आज जर आपली संस्कृती,भाषा,लिपी,इतिहास जपायचा असेल तर पहिले त्याचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे.परंतु आपल्याच सरकार मधील एका वरिष्ट नेत्याने (कपिल सिब्बल),शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमातून देवनागरी अंकांना काढून त्यांच्या जागी इंग्रजी अंकांना प्राधान्य देण्याचा आदेश देऊन आपल्याला आपल्या भाषेबद्दल आणि इतिहास बद्दल किती कळकळ आहे हे दाखवुन दिले आहे.तेंव्हा अश्या सरकार कडुन आपण किती अपेक्षा करायची हे ज्याचे त्याने ठरवावे.

No comments:
Post a Comment