Sunday, 11 June 2017

किल्ल्यांशी संबंधित असणार्या या शब्दांपैकी कुठल्याही दोन शब्दांचा अर्थ सांगा उष्ट्रखाना कलारगा कुसू थट्टी तवा फरासखाना

Daily Quiz # २१६

किल्ल्यांशी संबंधित असणार्या या शब्दांपैकी कुठल्याही दोन शब्दांचा अर्थ सांगा

उष्ट्रखाना
कलारगा
कुसू
थट्टी
तवा
फरासखाना

1. उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा. सुतरनाला नावाच्या हलक्या तोफा वाहून नेण्यासाठी आणि सांडणीस्वारांबरोबर पत्रांच्या किंवा अन्य वस्तूंच्या थैल्या पाठवण्यासाठी उंटांची आवश्यकता असे. रायगडावर आणि बहुधा पन्हाळगडावरही उष्ट्रखाना होता.

2. कलारगा म्हणजे गडाभोवतालच्या खोबणी.
या बेचक्यांत प्रयत्‍नपूर्वक झाडी वाढवली जाई. कलरग्यातील झाडाची एकही फांदी न तोडण्याची रामचंद्रपंत अमात्यांची आज्ञा होती.

3. कुसू म्हणजे किल्ल्याच्या आतली छोटी तटबंदी किंवा कुंपणाची भिंत.
या शब्दाचे अनेकवचन कुसवे असे होते.

4. थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा.
थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.

5. तवा देवगिरीच्या किल्ल्याला असा एक तवा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी एक खंदक लागतो, त्यावर हा तवा ठेवलेला आहे. बिजागऱ्या लावून तो उभा करता येतो. तव्यामागे आग पेटवून तो तवा लालभडक करीत. हा तवा ओलांडून शत्रू किल्ल्यात प्रवेश करू शकत नसे. अल्लाउद्दीन खिलजीने पखालींनी पाणी ओतून ओतून हा तवा थंड केला आणि देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला.

6. फरासखाना
हा कारखाना वस्त्रे ठेवण्यासाठी असे. सतरंज्या, गादी, तक्के, लोड, सिंहासन, पडदे, गालिचे वगैरे ठेवण्याची जागा.

No comments:

Post a Comment