Daily Quiz # २१५
स्वतः जेता असून पराजिताकडे सगळी सूत्रे देउन त्याच्याशी तह करणारा राजा कोण?
उत्तर : अब्दाली
स्वतः जेता असून पराजिताकडे सगळी सूत्रे देउन त्याच्याशी तह करणारा राजा कोण?
उत्तर : अब्दाली
१४ जानेवरी १७६१ रोजी पानिपतचा रणसंग्राम मराठे आणि अब्दाली यांच्यामधे झाला. या युद्धामुळे मराठ्यांनी आपले सर्वस्व गमावले असाच आजपर्यंत समज करून देण्यात आला आहे. पण सत्य परिस्थिती पूर्णपणे वेगळीच आहे याउलट मराठ्यांनी हे युद्ध हरून देखील आपले सर्वस्व न गमावता पुन:प्रस्थापित काही दिवसातच केले
असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. युद्ध झाल्यानंतरच पुन्हा हिंदुस्थानची सूत्रे आपल्याकडे देणा-या व्यक्तीचे नाव होते ‘अहमदशाह अब्दाली ' पानिपतचे युद्ध जिंकणारा.
कोण विजेता असे पाऊल उचलतो ? पराजेत्याकडे सर्व देऊन टाकतो. ऐकले आहे इतिहासात असे कधी ? पण हे सत्य आहे. मराठयांच्या शौर्याची प्रचिती आल्यानंतरच अब्दालीचा पक्का विश्वास बसला होता या हिंदुस्थानचे रक्षण फक्त मराठेच करू शकतात.
या संबंधीचे पत्र अब्दालीने नानासाहेब पेशव्यास गुलराज नावाच्या वकिलाकरवी पाठवले या पत्रात अब्दाली म्हणतो - “तुमचे आमचे वैर असण्याचे कारण नाही, तुमचा पुत्र विश्वासराव आणि बंधू सदाशिवराव भाऊसाहेब युद्धात मारले गेले त्यास आमचा नाईलाज होता. भाऊसाहेब युद्धात उभे राहिले असता आम्हांसही बचावासाठी लढणे प्राप्त होते. दिल्लीचा कारभार आता आपण पूर्ववत चालवावा, त्यास आमची काही
हरकत नाही. शाह आलमास गादीवर बसवावे. झाल्या गोष्टी विसरून जावे आणि आपला स्नेह कायम राहावा अशी मनापासून इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी' हा उल्लेख वाचून कोण म्हणेल मराठ्यांचा पराभव झाला ?
संदर्भ: इतिहासाच्या पाउलखुणा भाग २
No comments:
Post a Comment