Daily Quiz # २६०
औरंगजेबाने सत्तास्थापनेच्या युद्धापुर्वी कोणाशी गुप्त करार करुन त्याला बादशहा बनवण्याचे आश्वासन दिले होते?
मुराद
१६५८ च्या फेब्रुवारी महिन्यात दक्षिणेची सर्व व्यवस्था लावून औरंगजेबाने औरंगबादेहून कूच केले. वाटेत त्याला मुराद येउन मिळाला, या दोघांमध्ये आधीच तह झाला होता.
औरंगजेब आणि मुराद यांच्यामधील संबंधाबाबत पुढील हकीकत प्रकाश टाकते. औरंगजेबाने पुढील काही अटींवर मुरादला मदत करण्याचे मान्य केले
होते. पहिली अट अशी होती की आपला शत्रू जो दारा त्याचा नाश करून राज्य दोघांनी
वाटून घ्यावयाचे. मुरादच्या विनंतीला बळी पडून औरंगजेबाने त्याला अशा तर्हेचे
लेखी वचन लिहून दिले. त्यामध्ये मुरादला द्यावयात येणाच्या प्रांतांचा समावेश होता.
इतकेच नव्हे तर आपण दिलेले वचन पाळू याबद्दल औरंगजेबाने-परमेश्वर आणि महमद
पैगंबर यांची शपथ देखील घेतली. (या पत्राचा मजकूर आदाब-इ-आलमगिरी, ७८ व,
७९ अ आणि तजकिरात उस्र सलातिन उस चगताईआ या ग्रंथांमध्ये पूर्णतया
आलेला आहे) औरंगजेबाचा खासगी कारभारी अकीलखान राजी हा देखील आपल्याला
या मैत्रीच्या तहाबाबतची काही हकीकत देतो. तो असे म्हणतो की मुरादबरोबर यावेळी
एकी करणे हे मुत्सद्देगिरीचे आहे असा विचार करून त्याने त्याला एक स्नेहपूर्ण पत्र
पाठविले आणि जी लूट मिळेल तिचा तिसरा हिस्सा व पंजाब अफगाणिस्तान काश्मीर
आणि सिंध हे प्रांत देण्याचे कबूल केले आणि त्या ठिकाणी आपल्या नावाने नाणी
पाडण्याचा व खुत्बा पठण करण्याचा मुरादचा अधिकार मान्य केला.
संदर्भ : औरंगजेबाचा इतिहास, जदुनाथ सरकार

who was vitthal sundar parshurami? what is his role in constructing kalaram mandir? who is legal heirsof him?
ReplyDelete