Daily Quiz # २०३
सर्वात मोठा मराठी शिलालेख कुठे आहे आणि तो कोणाबद्दल लिहिला आहे ?
तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात भोसले घराण्याचा इतिहासा बद्दलचा शिलालेख
तंजावरचा राजा तुळजाजी (१७६३-८७) याने त्याला मुलगा नसल्यामुळे मरणापूर्वी भोसल्यांचे मूळ पुरुष मालोजी राजे यांचा भाऊ विठोजी, त्याच्या वंशातील एक मुलगा दत्तक घेतला (१७८५) आणि त्याचे नाव सरफोजी ठेवले. तोच पुढे दुसरा सरफोजी म्हणून प्रसिद्धीस आला.
सरफोजीने अनेक प्रकाशित ग्रंथ आणि हस्तलिखिते गोळा केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने सरफोजीची अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात इ. स. १८०३ मध्ये कोरून घेतलेला भोसले घराण्याचा इतिहास हा होय. भारतात एवढा मोठा शिलालेख कुठेही नाही. पुस्तकरूपाने हा शिलालेख प्रसिद्ध झाला, तेव्हा त्याची ५० पृष्ठे भरली.

No comments:
Post a Comment