Daily Quiz # २०४
मोगलांचा कोणता वजीर मराठ्यांचा मित्र होता, आणि नंतर याच्याशी बिघडलेले संबंध पानिपतात महागात पडले ?
उत्तर :- सफदरजंग
मुघल वजीर सफदरजंग आणि मराठे यांच्यात पूर्वीपासून सख्य होते. जाट, रोहिले अफगाण यांचे प्राबल्य वाढत होते. मराठ्यांची मदत घेऊन पठाणांचा बिमोड करावा असे वजिराच्या मनात सारखे येत होते. रोहिल्याना सफदरजंग आणि मराठे यांचे वर्चस्व दिल्लीत नको होते. याचं वेळी बादशहा अहमदशाह याचे कान उधमबाई आणि खोजा जावेद यांनी भरले.
त्यामुळे दिल्लीतील सगळेचं गणित बदलले आणि वजिराला दिल्लीचे वातावरण शत्रुमय वाटू लागले. त्याने बल्लमगडचा जाट, रोहिले आणि बंगश यांच्याशी शत्रुत्व पत्करले., रोहिले हे अंतरवेदीत आणि गंगेच्या पूर्वेला राहत, ते बादशाही प्रदेशात अलाहाबाद लखनौ येथे धामधूम करत असत. यावेळी शिंदे-होळकरांच्या फौजा दक्षिणेतच होत्या.
अशातच रोहिले आणि मोगल वजीर यांच्यात युद्ध सुरु झाले. सफदरजंगाने मराठ्यांना मदतीस बोलावले. तोपर्यंत वाजीराचे लखनौ वगरे प्रांत लुटले जात होते. हालहाल होत होते. अशाचं मोक्याची वेळी मराठी फौजा दुअबात आल्या. आल्या तशा त्यांनी बंगशच्या सरदाराचा धुव्वा उडवून दिला. गंगाकाठ हसनपुरास एक असणाऱ्या फतहगडवर जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर वजीर चालून गेले. येथे गंगेवर पूल बांधून पलीकडे जाऊन बंगशची रसद बंद केली.
बंगशच्या सहाय्यार्थ सादुल्लाखान आणि बहादूरखान हे येत असताना त्यांच्यावर गंगाधर यशवंत आणि जवाहरसिंग जाट हे चालून गेले. या दोन्ही फौजात मोठा संग्राम होऊन बहादूरखान आणि दहा हजार रोहिले कापले गले. सादुल्लाखान जीव वाचवून पळून गेला. प्रचंड लुट मराठ्यांना मिळाली. २८ एप्रिल १७५१ ला ही लढाई झाली. अंतर्वेद रोहील्यांच्या रक्ताने लाल झाली.
रोहील्यांची ही वाताहत ऐकताच घाबरून जाऊन अहमदखान बंगशाने छावणी सोडून रातोरात पळ काढला. त्यांच्यावर मराठी फौजा तुटून पडल्या वाट फुटेल तिकडे पळत कित्येकांना गंगेत समाधी मिळाली. मराठ्यांना अंतर्वेदीत मोठा जया मिळाला दत्ताजी शिंदे स्वतः या लढाईत होते

No comments:
Post a Comment