Sunday, 11 June 2017

महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते ?

Daily Quiz # २०२

महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते ?

ब्लू मॉरमॉन’ फूलपाखरू

‘ब्ल्यू मॉरमॉन’ या मोठय़ा असणाऱया फुलपाखरास शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी वनांसह कोल्हापूर जिल्हय़ातील दाजीपूर अभयारण्यातदेखील या फुलपाखराचा संचार मोठय़ा प्रमाणात आढळतो.

महाराष्ट्रातील शेकरू या प्राण्याला राज्य प्राण्याचे मानचिन्ह, पक्षामध्ये हरियाल या पक्षाला राज्य पक्षाचे मानचिन्ह, झाडांमध्ये आंब्याला राज्य वृक्ष तर फुलामध्ये जारूल या फुलाला राज्य फूलाचा दर्जा दिला आहे.

त्यामध्ये ब्लू मॉरमॉन या फुलपाखराचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विविध प्रकारची जैव वनसंपत्ती मोठय़ा प्रमाणात आढळते. त्यामध्ये फुलपाखरेही आढळतात. फुलपाखरे ही सदृढ पर्यावरणाची सुचक आहेत.

ब्लू मॉरमॉन तथा राणी पाकोळी (शास्त्रीय नाव: पॅपिलिये पॉलिम्नेस्टर) हे भारताच्या
महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित झाले आहे..
फुलपाखरांचे अभ्यासक व निसर्गप्रेमींमार्फत राज्य फुलपाखरू म्हणून ब्लू मॉरमॉन या प्रजातीचा विचार करण्याची मागणी झाल्यावर २२ जून, २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने या फुलपाखराला राज्य फुलपाखरूचा दर्जा दिला. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे.

ब्लू मॉरमॉन हे फुलपाखरू आकाराने सर्वात मोठे असलेल्या सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरू असून ते मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. पंखाखालील बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो.




No comments:

Post a Comment