चिवट झुंजीचा साक्षीदार : किल्ले रामशेज
- दिपाली रोहन पाटील १२/०६/२०१७
प्रभू श्रीराम वनवासात असताना ज्या डोंगरावर त्यांनी काही दिवस मुक्काम केला होता त्यावरून रामाची शय्या म्हणजेच रामशेज असे किल्ल्याचे नाव पडले असावे असे आढळते.रामशेज हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील आशेवाडी गावात असून सोप्या श्रेणीत मोडणारा आणि चिवट झुंजीचा साक्षीदार असणारा एक ऐतिहासिक किल्ला आहे. रामशेज किल्ला साधारणपणे ५ ते ६ वर्ष अजिंक्य राहून मुघलांविरुद्ध लढा देत राहिला; त्या चिवट झुंजीचे नेतृत्व अजूनही अज्ञातच आहे.
कालौघात किल्ल्याची पडझड झाली असून किल्ल्यावर पाहण्यासारखे तसे फारसे वास्तू अवशेष शिल्लक नसले तरीही पाण्याच्या जोड टाक्यांचे समूह, चोर दरवाजा , देवीचं मंदिर, रामाची गुहा, आणि मनमोहक लांबसडक पठार ( जणू काही माची च भासते) आणि किल्ल्यावरून दिसणारे सभोवतालचे नयनरम्य निसर्ग दृश्य उत्तजेना देणारे असेच आहे. किल्ला तसा भुंडा असून वृक्षवल्ली फारच कमी आहे. सद्यस्तिथीत तिथे काही भटके वृक्षारोपण करून वृक्षवल्ली वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
किल्ल्यावर जाण्यास साधारणपणे अर्धा पावून तास लागतो, सद्य स्थितीत वाट तशी चढाईस सरळ सोपी आहे. आशेवाडी गावातून किल्ला पिटुकला वाटत असून एकचं सपाट कातळ भिंत आपणास खालून नजरेस पडते पण जस जसे आपण किल्ल्यावर चढत जातो तसा तसा गडाचा विस्तार आपणांस उलगडत जातो. किल्ल्यावरून नजरेस पडणाऱ्या निसर्गाचे सुंदर दर्शन आपणास घडते आणि त्यात ढगाळ वातावरण असेल आणि मान्सून येण्याची चाहूल वाटत असेल तर तो ढगांचा लपाछपीचा खेळ, आल्हाद थंड वारा भटक्यांचा अंतरात्मा तृप्त केल्याखेरीज राहत नाही.

No comments:
Post a Comment