Sunday, 11 June 2017

नेपोलियनला वॉटर्लू च्या लढाईत हरवणारा ब्रिटिश सेनानी कोण ?

Daily Quiz # २१३

नेपोलियनला वॉटर्लू च्या लढाईत हरवणारा ब्रिटिश सेनानी कोण ?

उत्तर : ड्युक ऑफ वेलींग्टन किंवा ऑर्थर वेलस्ली

१८ जून १८१५ रोजी झालेल्या जगप्रसिद्ध वॉटर्लू च्या युद्धात नेपोलियन पराभूत झाला. या युद्धात ब्रिटिश आणि प्रशियन सेनेचे नेतृत्व केले होते ते ड्युक ऑफ वेलींग्टन अर्थात ऑर्थर वेलस्ली ह्याने. वॉटर्लू हे ठिकाण सध्या बेलजियम मध्ये ब्रुसेल्सपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. या पराभवाने नेपोलियन ची राजकीय कारकिर्द संपुष्टात आली आणि त्याला ब्रिटिशांनी सेंट हेलिना बेटावर कैदेत ठेवले. तिथेच त्याचा मृत्यू झाला.
याच ड्युक ऑफ वेलींग्टन ने श्रीरंगपट्टण च्या लढाईत टिपू सुलतानचा पराभव केला होता तसेच असाय च्या लढाईत दौलतराव शिंद्यांचा पराभव केला होता.
वेलींग्टन युद्धात त्याच्या भक्कम बचावासाठी प्रसिद्ध आहे जेणेकरून त्याने आपल्याहून वरचढ फौजांचा पराभव स्वतःच्या फौजेचे कमीत कमी नुकसान होऊन केला आहे.

No comments:

Post a Comment