Daily Quiz # २११
जयप्पा शिंदेंचा खून कोणी करवला ?
उत्तर - बिजेसिंग
मारवाडवर अजितसिंग नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला दोन मुले, अभयसिंग आणि बख्तसिंग. या अभयसिंगास ढोकळसिंग म्हणजे विनाशकर्ता असे म्हटले जायचे. अभयसिंग १७५० मध्ये मरण पावला व त्याचा मुलगा रामसिंग यास बाजुला सारुन त्याचा चुलता बख्तसिंग याने राज्य घेतले. हा रामसिंग जयपूरच्या इश्वरसिंगाचा जावई होता. १७५३ मध्ये इश्वरसिंगाच्या बायकोने बख्तसिंगाची भेट घेउन त्यास विषप्रयोगाने ठार केले.
यानंतर रामसिंगास राज्य मिळण्याची आशा होती . पण बख्तसिंगचा मुलगा बिजेसिंगने नागूर बिकानेर मेडते व झालूर अशी संस्थाने हस्तगत केली. फक्त अजमीर मात्र रामसिंगाकडे राहिले. रामसिंग व चेतराम वकिलाने कुंभेरीस लढत असलेल्या मराठा फौजेची मदत घ्यायचे ठरवले. मराठ्यांकडील होळकर हे बिजेसिंगचे स्नेही होते. म्हणून त्यांनी जयाप्पाला पगडीबंधू करुन मदत मागितली. जयाप्पाने ती मान्य करुन १७५४ ला मारवाडात स्वारी केली.
हे पाहून बिजेसिंग नागूर सोडून चार कोस पुढे आला. २ मोठ्या लढाया झाल्या. जयाप्पा दत्ताजी जनकोजी आणि शिंदेंकडील सर्वांनी शर्थ केली. बिजेसिंग नागूरला पळून गेला. तेथून त्यास त्याचा सासरा जयपूरचा माधोसिंग ची मदत येउन मिळाली. जयाप्पा शिंदे रामसिंगाच्या मदतीने नागूरला वेडा देउन बसले. सव्वा वर्षे वेढा झाला तरी निकाल लागेना. तेव्हा बिजेसिंगाने एक दिवस ३ ४ मारेकरी जयाप्पाच्या छावणीत पाठवले. त्यांनी जयाप्पावर अचानक हल्ला केला. झालेल्या झटापटीत एक मारेकरी जयाप्पांनी स्वतः मारला पण ते जखमी होउन मृत्यूमुखी पडले. बाकी मारेकरी फौजेने उडवले.

No comments:
Post a Comment