Sunday, 11 June 2017

नेढं असणार्या कुठल्याही दोन किल्ल्यांची नावे सांगा

Daily Quiz # २१०

नेढं असणार्या कुठल्याही दोन किल्ल्यांची नावे सांगा

उत्तर : राजगड, रतनगड, कण्हेरगड, पिंपळा, मोहनदर, लोहगड, न्हावीगड, इर्शाळगड,मदन

लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले. वार्या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार भोक पडत. त्याला नेढं अस म्हटल जात. दगडांच्या मधला ठिसुळ भाग ज्या प्रमाणात असेल तेवढा नेढ्याचा आकार असतो.

सह्याद्रीमध्ये या प्रकारचं छिद्र अर्थात 'नेढं' असलेले किल्ले बरेच. उदाहरणच द्यायचं झालं तर राजगड, लोहगड, कण्हेरा, रतनगड इत्यादी. पण सह्याद्रीतली सर्वात मोठी दोन नेढी नाशिक जिल्ह्यानेच आपल्या उदरात बाळगली आहेत. त्यातलं एक म्हणजे वणीजवळच्या मोहनदरी किल्ल्याचं. साल्हेरवरून दिसणारं हे नेढं एक दुर्गच आपल्या अंगावर घेऊन उभा आहे. भगवान परशुरामांनी साल्हेर पर्वतावरून अपरांत अर्थात कोकणभूमी निर्माण करण्यासाठी एक बाण सोडला आणि तो या डोंगराला आरपार भेदून गेला. साक्षात परशुरामांच्या त्या बाणामुळे हे प्रचंड छिद्र त्या डोंगराला पडलं आणि या छिद्राचा अर्थात नेढ्याचा मालक 'पिंपळा' दुर्ग भटक्यांच्या नकाशावर आला!! पिंपळा किल्ला म्हणजे सह्याद्रीतलं एक आश्‍चर्यच!!

अनाकलनीय आणि विस्मयकारक दृश्य!!! शब्दांच्या मर्यादेलाही जिथे स्वैर भरारी घ्यावीशी वाटेल असा हा न भूतो न भविष्यती अनुभव!!! पिंपळ्याच्या नेढ्यात आपला ज्या क्षणी प्रवेश होतो त्याच क्षणी आजवरच्या सह्यभ्रमंतीचं सार्थक झाल्याची भावना उचंबळून येते आणि हाच क्षण कोणत्याही निस्सीम सह्यभक्ताने मनमुराद जगावा!! डोळ्यांच्या कक्षा भेदून जाव्यात. पिंपळ्याचं हे नेढं सुमारे शंभर फूट व्यासाचं असून शंभर-सव्वाशे लोक सहज मावतील इतका विस्तीर्ण पसारा या नेढ्याचा आहे...






No comments:

Post a Comment