Daily Quiz # २२४
महाराष्ट्रा बाहेरील कुठल्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे शिल्प कोरले आहे ?
उत्तर : गोजीरा किल्ला
वेल्लोर, तामिळनाडू येथे असणार्या गोजीरा किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे शिल्प कोरले आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याजवळ पडझड झाली आहे. दरवाज्याच्या आतल्या बाजूला एका खांबावर महाराजांचे शिल्प कोरले आहे.
जिंजीच्या जवळच अलीकडे वेलोर नावाचा स्थळदुर्ग आहे. बळकट तटबंदी व बेलाग बुरुज ही त्याची बलस्थानं आहेत. खंदकात सदैव पाणी असायचे व त्यात सुसरी, मगरी सोडलेल्या होत्या. त्यामुळे हा दुर्ग अजिंक्य मानला जायचा. इसवी सन १६७७ च्या मे महिन्यात शिवाजी महाराजांनी वेलोरला वेढा घातला. अब्दुल्लाखान नावाच्या एक हबशी किल्लेदाराने निकराने किल्ला लढविला. शेवटपर्यंत वेलोर हाती आला नाही. वेलोरच्या जवळ दोन टेकड्या आहेत. तिथे दोन दुर्ग उभारले व त्यांना नावे दिली..साजरा व गोजरा. या दोन किल्ल्यांवरून मराठा सरदार नरहरी रुद्र यांच्या नेतृत्वाखाली वेलोरवर मराठी फौजा तोफांची सरबत्ती करू लागल्या. चिवट सिद्दी अब्दुल्लाखान अखेपर्यंत लढत राहिला. किल्ल्यात साथीचा रोग पसरल्यामुळे अब्दुल्लाखानाचा नाइलाज झाला. रघुनाथपंत हनुमंते व नरहरी रुद्र यांनी संधी साधली. २२ जुल १६७८ रोजी ५० हजार होन देऊन मराठय़ांनी वेलोरवर भगवा जरीपटका फडकवला. अशाप्रकारे राजांनी दक्षिणेत आपले अस्तित्व निर्माण केले.
किल्ल्यावर प्रवेशद्वार, पहारेकाऱ्यांच्या देवड्या, इमारतींचे काही अवशेष, तुळशीवृंदावन (?) आणि बुरुज आहेत. वर भरपूर गवत आणि काटेरी झुडपं माजली आहेत.

No comments:
Post a Comment