Daily Quiz # २२५
कोणत्या लढाई नंतर निजामाने 30 वर्षे मराठ्यांवर आक्रमण केले नाही ?
कोणत्या लढाई नंतर निजामाने 30 वर्षे मराठ्यांवर आक्रमण केले नाही ?
उत्तर : राक्षसभुवनाची लढाई
१७५९ ला उदगीर ला मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. पण १७६१ ला पानिपतात मराठे हरले आणि निजामाच्या मनात मराठ्यांचा निःपात करायचा विचार परत सुरु झाला. निजामाने १७६३ च्या सुरुवातीला जनोजी भोसल्यांशी मैत्री केली. जनोजी अणि निजामाची फौज भारी होती, तसेच निजामाचा तोफखाना प्रचंड होता. त्यासमोर निभाव लागणे कठीण होते. त्यामुळे गनिमी काव्याने त्याला शह द्यायचा व्यूह मराठ्यांनी आखला. मराठी फौजा नगर पैठण करत निजामाचा मुलुख उध्वस्त करत मार्च १७६३ च्या सुरुवातीस औरंगाबादेस आल्या. राघोबादादांनी औरंगाबादच्या किल्ल्यावर हल्ला केला पण किल्लेदाराने २ लक्ष रुपये देउन तात्पुरता तह करुन घेतला. औरंगाबादेस असताना निजाम व भोसले यांच्या एकत्रित फौजा येउ लागल्या. मराठी फौजा मलकापूरवर गेल्या व तेथून सुमारे ४० हजारांची खंडणी वसूल केली. पाठोपाठ निजाम भोसले बाळापूरनजीक आल्याने मराठे अचानक खाली हैद्राबाद कडे वळले. हे पाहून निजाम पुण्यावर चालून आला. पुण्यात महिनाभर निजामाने धुमाकूळ घातला. विठ्ठल सुंदरने सासवड जाळले. याच काळात मराठ्यांनी विठ्ठल सुंदरचे भागानगरमधील औसा गाव जाळले. निजामाचा प्रांत पूर्ण बेचिराख केला. मे अखेरीस निजाम हैद्राबाद कडे आणि पेशवे पुण्याकडे आपापला प्रांत वाचवायला वळले. भीमाकाठाने निजाम धारूरपर्यंत गेला , परंतु मराठे मागून हल्ले करत असल्याने तो पुन्हा ओरंगाबादेकडे वळला . ३ जुलै रोजी गुलबर्गा मुक्कामी निजामाचा भाऊ बसालतगंज याला माधवरावांनी आपल्या बाजूला वळवून घेतले.
राक्षसभुवनाजवळ गोदावरी दुथडी भरून वाहत असल्याने निजामाने
आधी स्वत:सोबत आपला जनानखाना, बुणगे आणि काही हलक्या तोफा आपल्यासोबत गोदावरीच्या पलीकडे नेल्या. मात्र
मुख्य फौज विठ्ठल सुंदराच्या हाताखाली अजून गोदावरीच्या अलीकडे धोंडराईसच
होती. निजामाचे सैन्य विठ्ठल सुंदरच्या अधिपत्याखाली खुद्द निजामासह
राक्षसभुवनवर आहे आणि जानोजी भोसले पूर्वेकडे १२ कोसांवर आहेत
हे कळताच पेशव्यांनी १० ऑगस्ट रोजी राक्षसभुवनवर निजामावर
प्रचंड हल्ला चढवला. विठ्ठल सुंदर परशुरामी ठार झाला. माधवराव
स्वत: घोड्यावर होते. निजामने हे पाहताच तहाचे बोलणे लावले आणि
इतक्यात प्रचंड पाऊस आल्याने युद्ध विस्कळीत झाले. निजाम गोदावरीच्या
पैलतीरावर असल्याने जीवानिशी वाचला, तो उरलेले सैन्य घेऊन
पळाला. जानोजी भोसले १३ ऑगस्टला शरण आले आणि त्यांनी
मराठ्यांशी तह केला. मराठ्यांच्या अचानक चढाईने निजाम पार घाबरून गेला. त्याने मराठ्यांकडे याचना केली की, “विठ्ठल सुंदरांनी तुम्हांसी दावा बांधिला होता, त्याचा सूड तुम्ही घेतला. तुमची लूट आणिली
आहे ती पाठवून देतो. पूर्वी (उदगीरच्या वेळेस) भाऊसाहेबांचा करार आहे त्याप्रमाणे चालावे.” परंतु माधवरावांनी निजामाच्या या नाटकांना भीक घातली नाही. ३ सप्टेंबर १७६३ ला मराठ्यांनी औरंगबादेवर चाल केली आणि निजाम औरंगबादेत कोंडला गेला. अखेर २५ सप्टेंबर ला निजाम शरण आला आणि उदगीरचा तह कायम करुन नवा २२ लक्षांचा करार झाला. या लढाईनंतर ३० वर्षे निजामाने मराठ्यांवर आक्रमण केले ना
No comments:
Post a Comment