Daily Quiz # २२६
सह्याद्रीत फुलणाऱ्या या अतीमोहक फुलाचे नाव काय ?
सह्याद्रीत फुलणाऱ्या या अतीमोहक फुलाचे नाव काय ?
उत्तर : अंजन किंवा अंजनी
Common Name : Ironwood tree, kora kaha flower, delek air tree
Botanical name : Memecylon umbellatum
Family : Melastomataceae
अंजन किंवा अंजनी म्हणजे 'मेमोसिलॉन अंबेलॅटम' या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा एक फुलवृक्ष आहे. याची पाने प्रकाशात धरली तर त्यांची सोनेरी कड सहज लक्षात येते. सह्याद्रीत आणि कोकणातील डोंगर टेकड्यांवर निसर्गतः उगवणारे बुटक्या चणीचे हे वृक्ष थंडी संपताना फुलायला सुरवात करतात ते अगदी पावसाळ्याची सुरवात होईपर्यंत फुलतच असतात. खोड - फांद्या - काटक्यांवर दाटीदाटीने या इवलुशा फुलांचे गेंद तयार होतात. निळसर - जांभळ्या - फिकट गुलाबी रंगाच्या अनेक छटांची उधळण अंजनीच्या फुलांमध्ये पाहायला मिळते. पाहूनच तृप्त व्हावे अशी ही रंगांची उधळण असते.



No comments:
Post a Comment