Sunday, 11 June 2017

शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात भाषा संवर्धना साठी एक डिक्शनरी तयार करून घेतली. त्या डिक्शनरीचे नाव काय आणि ती कोणी लिहिली ?

Daily Quiz # २१९ 

शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात भाषा संवर्धना साठी एक डिक्शनरी तयार करून घेतली. त्या डिक्शनरीचे नाव काय आणि ती कोणी लिहिली ?

उत्तर : राज्यव्यवहार कोश, लेखक : धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य

शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. . राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला

हा कोश फार्सी-मराठी नसून दख्खनीयावनी(उर्दू)-संस्कृत आहे. त्यातल्या १३८० शब्दांपैकी फारतर दहा टक्के शब्द मराठीत अजूनही प्रचलित आहेत.

[१] इ.स.च्या सातव्या शतकात प्रथम व्यापाराच्या निमित्ताने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरब आले, नंतर तुर्क, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज आले, भारतावर त्यांचे राजकीय वर्चस्वही काही काळ टिकून राहिले. त्यामुळे अगदी यादवकालापासून, म्हणजे १२ ते १४ शतकापासून फार्शी शब्दांचा वापर मराठी भाषेत होऊ लागला. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेच्या रक्षणार्थ ‘महाराष्ट्र राज्याची स्थापना केली‘ तेव्हा राज्यकारभारात आणि दैनंदिन व्यवहारात आलेल्या अनेक फार्सी, अरबी, तुर्की- म्हणजेच या नव्या शब्दांना पर्यायी संस्कृत अथवा प्राकृत शब्द योजण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्यातूनच राज्याभिषेकानंतर (१६७४) त्यांनी ‘राज्यव्यवहार कोश‘ तयार करण्यासाठी रघुनाथ नारायण हणमंते या पंडिताची नियुक्ती केली.

राज्यव्यवहार कोशाच्या दहा सर्गात १३८० फार्सी- दख्खनी उर्दू शब्द आले असून, त्यांच्या पर्यायी संस्कृत प्राकृत शब्द सुचविले आहेत. 

[२] कोशातील शब्द
मराठी भाषेत प्रचलित असलेल्या परकीय भाषेच्या सुळसुळाटाला शिवाजीने राज्यव्यवहारकोश करून चांगलाच शह दिला होता हे सर्वसाधारणपणे मान्य करण्यास कोणाचेही दुमत नसावे. ही गोष्ट खरोखरच खरी. इतिहासकार वि. का. राजवाड्यांच्या मते सन १६२८ मध्ये मराठी(+फ़ार्सी) पत्रलेखनात मराठी शब्दांचे प्रमाण १६२८ मध्ये शेकडा १४.४ टक्के होते, ते १६७७ मध्ये ६२.७ एवढे आणि १७२८मध्ये ९३.७ टक्क्यांपर्यंत वाढले. सध्याच्या लाखभर शब्दसंख्या असलेल्या मराठीत तुर्की-अरबी-फ़ार्सी शब्द फक्त २९००(२.९६%) आहेत.
इतके असूनसुद्धा मराठीतून फ़ार्सी शब्दांचे उच्चाटन झाले नाही.

शिवाजीपुरस्कृत शब्दकोशातील अनेक शब्द टिकले नाहीत. मराठीतले सध्याचे फ़ार्सी शब्द संस्कृत शब्दापेक्षा अर्थाची वेगळी छटा दाखवतात आणि त्यामुळे सररास वापरले जातात. 

[३] वजीरच्या जागी प्रधान, दिवाणच्या जागी सचिव असे संस्कृत शब्द उपयोजण्यास सांगितले. सेनापती, सुमंत, अमात्य, न्यायाधीश हे शब्दही या कोषाचीच देणगी. 

[४] कोशात अरबी-फार्सी-तुर्की शब्दांना संस्कृत प्रतिशब्द दिले आहेत. उदा. गरम-उष्ण, गुलाम-दास, चोपदार-दण्डधर, चाकर-सेवक

[५] सेनापती, सुमंत, अमात्य, न्यायाधीश हे शब्दही या कोषाचीच देणगी. योगप्रभू म्हणतात तसे, कोशात 'सेनापती' 'सुमंत' नाहीत. सेनाकर्ता व सेनानी, आणि सुमंत्र आहेत. अनेक प्रांतांवर नेमलेल्या अधिकाऱ्यासाठी सुमंत्र(फारसी, कारमुल्की! ). वजिरासाठी सामंत(प्रधान नाही! ) (सामंत म्हणजे स्वतंत्र नसलेला छोटा राजा,; लष्करातला वरिष्ठ अधिकारी) आणि सरनोबतसाठी सेनानी आणि दलवायी. 

[६] घोडा ( अश्व), पागा ( अश्वशाला), साहेब ( स्वामी), अमात्य, कोषागर

No comments:

Post a Comment