Daily Quiz # २०८
मोगलांनी जिंकलेली अखेरची लढाई कोणती समजली जाते
उत्तर : मनुपूर
झकारीयाखान हा मुघल सरदार पंजाबचा सुभेदार होता. १७४५ मध्ये तो मेला व त्याच्या दोन मुलात कलह लागला. धाकट्या शहानवाजखानाने मोठ्या याह्याखानारा कैदेत टाकले. व स्वतः कारभार हातात घेतला. १७४७ मध्ये याह्याखान कसाबसा निसटला व दिल्लीकडे पळून गेला. याह्याखान दिल्लीवरुन सैन्य आणेल या भीतीने आपला सहाय्यक आदिनाबेगच्या सहाय्याने शहानवाजखानाने अब्दालीची मदत मागितली. अब्दालीला हिंदुस्तानात शिरायला निमित्तच हवे होते. जानेवारी १७४८ साली त्याने पंजाबवरती आक्रमण केले. दरम्य्न तत्कालीन वजीर कमरुद्दीनखानाने शहानवाजखानाची कानउघाडणी केली व उलट त्यालाच अब्दालीशी लढायला उद्युक्त केले. पण त्यात शहानवाजखान हरला. अब्दालीने लाहोर पर्यंत पोहोचून एक महिना मुक्काम केला.अखेर दिल्लीवरुन स्वतः शहजादा अहंमदखान, वजीर कमरुद्दीनखान, सफदरजंग इश्वरीसिंह वगैरे त्यावर चाल करुन गेले. सरहिंदजवळ मनुपूर येथे मोठा संग्राम झाला. वजीर कमरुद्दीनखान ठार झाला पण त्याचा मुलगा मीरमन्नू ने नेट लावून लढाई केली व मुघल जिंकले. मोगलांनी जिंकलेली ही शेवटची लढाई समजली जाते.

No comments:
Post a Comment