Daily Quiz # २३४
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रांन्सजवळ कुठल्या बोटीतून समुद्रात उडी मारली जेव्हा त्यांना इंग्लंड मध्ये अटक करून भारतात आणले जात होते
उत्तर -: मोरिया / मारिया
त्रिखंडात गाजलेली उडी
.... अटक होणार माहित असतानाही सावरकर पॅरीस हुन ब्रिटनला गेले. लिव्हरपुलला ब्रिटीश भुमीवर पाउल टाकल्या टाकल्या सावरकरांना अटक झाली.
खटला भारतात चालणार म्हणुन कैद्याचा वेष देउन त्यांना मोरीया नावाच्या बोटीतुन ब्रिटनवरुन भारतात पाठविले. त्या बोटीवर हातात साखळ दंड आणि कैद्याचा वेष.. जहाजावर चढण्यापुर्वी सावरकारांचे सहकारी एमपीटी आचार्य सावरकरांना भेटले बोटीवर चढता चढता सावरकर म्हणाले "गोष्टी जर नीट जुळुन आल्या तर आता आपण मार्सेय मधे भेटु !!! (ईग्रजी नुसार मार्सेलीस, फ्रेंच उच्चार मार्सेय) एक महान योजनेस सलाम
आचार्यांच्या लक्षात आल. त्यांनी निरोपा निरोपी केली रवीवार ७ जुलै १९१० मोरया मार्सेलीस बंदरामधे लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ जुलै सावरकरांनी सैनीकांना सांगीतले "मला जरा जाउन यायच आहे" बरोबर जे शिपाई होते. त्यांनी सावरकरांना त्या बोटीवरच संडास असतो त्याच्यात पाठविले. आतील गुन्हेगार / आरोपी दिसावा म्हणुन याला एक भोक असत. सावरकर आत गेले. अंगावरचे जे कपडे होते ते काढुन त्या भोकावर ठेवले. बोटींना पोर्ट होल असते. (पोर्ट होल: समुद्राच्या बाजुची भिंत असते. त्याला एक भोक असत ते, शरीर कसबस जाईल एवढ्याच आकाराच ते असत). पोर्ट होल कमोड पासुन सुमारे साडे सहा-सहाफुट ऊंचीवर होत. त्याला हात धरले प्रचंड ताकतीनिशी त्यावर चढले. त्याच्यातुन सावरकर गेले. बाहेर जे शिपाई उभे होते त्यांना जास्त वेळ लागतो आहे, आतला माणुस दिसत नाही म्हणुन त्यांनी दार ठोठावल. आवाज नाही. म्हणुन शेवटी दरवाजा तोडुन घुसले तेव्हा त्या पोर्ट होल मधुन सावरकरांचे पाय बाहेर पडत होते.... महान साहसाला दंडवत
सावरकरांनी समुद्र पातळीपासुन २८ फुटावरुन समुद्रात उडी मारली. बोटी बाहेर रॅम्प असतो तो चुकवुन समुद्रात उडी !!!. धावत येउन समुद्रात उडी मारण शक्य आहे पण अश्या अवस्थेत उडी मारणे अत्यंत अवघड आहे. असा पराक्रम सावरकरच करु जाणे. सावरकरांनी पाण्यामधे सुर मारला, आणि गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला. सपासप पोहुन गोळ्या चुकावुन सावरकर किनाऱ्या पाशी आले. किनारा इथेही भिंत होती. साधीसुधी नाही तर ९ फुटाची गुळगुळीत भिंत. त्यावर चढले... कसे?, गुळगुळीत भिंतीवर...
सावरकरांची योजना होती. एकदा फ्रेंच भुमीवर पाय ठेवला की मी ब्रिटीश कायद्याच्या बाहेर. तेव्हा फ्रांस आणि ब्रिटनमधे एक्सट्रॅडिशन ट्रीटी, एकमेकांचे गुन्हेगार एकमेकांच्या सुपुर्त करण्याचा कायदा नव्हता. उलट त्यावेळी ब्रिटन व फ्रांन्स युरोपमधे एकमेकांचे स्पर्धकच होते. सावरकरांनी फ्रेंच भुमीवर काही गुन्हा केला नव्हता. त्यामुळे फ्रेंचानी ब्रिटीश पोलीसांना ताब्यात देणार नाही.
सावरकर किनाऱ्यावर आले. आणि रस्त्यावर पळत सुटले, ब्रिटीश पोलीसांनी किनाऱ्यावर आरडाओरडा सुरु केली हा चोर आहे चोर आहे. तिथल्या दोन फ्रेंच पोलीसांनी सावरकरांना पकडल. सावरकरांना फ्रेन्च भाषा येत नव्हती. सावरकर ईंग्लीश मधुन त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतायत पण ते फ्रेंच पोलीसांना कळत नाही. ब्रिटीश पोलीस आले त्यांनी सांगीतल हा जहाजावरुन पळालेला चोर आहे. ब्रिटीशांनी फ्रेंच सैनीकाला लाच दिली. आणी दुर्दैवाने फ्रेंच पोलीसांनी सावरकरांना ब्रिटीशांच्या ताब्यात दिल.
ब्रिटीश पोलीस सावरकरांना घेउन जहाजाकडे नेउ लागले तेव्हा सावरकरांना नेण्यासाठी शामजी कॄष्ण वर्मा आणि मॅडम कामा यांना घेउन आलेली कार आली आणि तिन पाहील. सावरकरांना कैद करुन घेउन चालले आहेत.....
मार्सेलीसची ही उडी त्रिखंडात गाजली. ब्रिटीशांची प्रचंड छीथु झाली. अनंत वृत्तपत्रात छापुन आली आणि सगळ जग स्तिमीत होऊन गेल.
पुढे सावरकरांनी हेगच्या अंतरराष्टीय कोर्टात अपील केल. मला फ्रेंच भुमीवर पकडण्यात आल. पण फ्रन्स मधे मी गुन्हा केला नाही. माझा खटला चालायच असेल तर आंतरराष्ट्रीय कोर्टा समोर चालावा. निकाल यायचा होता. आंतरराष्ट्रीय कोर्टात आपल्या विरुद्ध निकाल जाईल. अस व्हायला नको म्हणुन ब्रिटीशांनी खटला भरभर चालविला आणि दोन जन्म ठेपेंची शिक्षा सावरकरांना सुनविण्यात आली.
दोन जन्म ठेप म्हणजे ५० वर्ष. सावरकर म्हणाले याचा अर्थ ब्रिटीशांचा हिंदु सस्कॄतीवर विश्वास आहे. जन्मठेपेचा अर्थच आहे की गुन्हा एवढा गंभीर आहे की. उरलेला आक्खा जन्म तुरुंगात. सावरकर म्हणले ब्रिटीशांनी मला दोन जन्म ठेप सुनविल्या म्हणजे ब्रिटीशांच पुनर्जन्मावर विश्वास आहे. पुढल्या जन्मातली जन्म ठेपेची शिक्षा मला आत्ताच दिली. कोणत्याही परीस्थितीत न डगमगता आत्मविश्वासाने सामोरी गेलेल्या महान विरास क्रांतीकार्कांच्या मुकुटमणीस प्रणाम.
खरतर असे अनेक प्रसंग आले. अधिकारी सावरकरांना हिणवण्यासाठी म्हणतायत आता ५० वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा. तेव्हा बाणेदारपणे सावरकर म्हणतायत बस्स ५० वर्ष पण तोवर तुमच राज्य टिकल तर ना... आणि असच झाल....
स्वातंत्र्यवीर सावरकर की जय
भारत माताकी जय
वंदे मातरम

No comments:
Post a Comment