कोकणातील दुर्गशृंखला
- दीपाली रोहन पाटील (9/03/2015)
कोकण नाव घेतल कि डोळ्यासमोर सुंदर समुद्र किनारे, नारळांची बाग बगीचे आणि एकंदरीत निसर्ग सौदर्य, तेथील विशिष्ट अशी संस्कृती यांची नीर निराळी चित्र आपल्या दृष्टपटलावर तरळून जातात.कोकणाचे दोन भाग एक तळ कोकण आणि दुसरा म्हणजे कोकण यावेळी ट्रेक क्षितीज संस्थे ने आयोजित केलेल्या मालवण ट्रेक मुळे तळ कोकणात जाण्याचा योग आला आणि मनातल्या सुप्त इच्छा सुफळ संपूर्ण झाल्या.या ट्रेक चे नेतृत्व अमित सामंत यांनी यशस्वीरीत्या आणि अगदी सगळ्यांना हवे हवेसे वाटेल असेच केले. अमित सामंत आणि त्यांची अर्धांगिनी मूळचे कोकणातले असून आम्हा सगळ्यांचं स्वागत जणू माहेरी आलेल्या लेकीसारखाच त्यांनी यथासांग केलं. सगळी व्यवस्था अगदी चोख होती चमचमीत खाण्यापासून ते अगदी कोकणात बागडण्या पर्यंत.
मालवण ट्रेक नेमका ६, ७ आणि ८ मार्च २०१५ रोजी होळीच्या सुट्ट्या पाहून आयोजित करण्यात आला असल्याने आमची होळी कोकणातील दुर्ग शृंखलेचे दर्शन घेवून आगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.आणि मला ती मनापासून भावली. निसर्गाच्या सानिध्यात मुळी स्वर्गाभास झाल्यासारखाच वाटत. कोकण विभाग हा तसा आर्थिक दृष्ट्या संपन्न नसला तरी निसर्गाने भर भरून देणगी दिली आहे.कोकणाचा इतिहास अगदी अनादी काळापासून अस्तित्वात असून वर्षोन न वर्षे या संपन्न भूमीची सगळ्याच लोकांनी दखल घेतली आहे.
या अभूत पूर्ण ट्रेक मुळे आम्ही स्वप्नवत वाटणारे १० किल्ले, ३ मंदिर आणि डच वखार पहिली आणि आमची होळी हि खऱ्या अर्थाने खूपच रंगली.होळीत आपण वेग वेगळ्या रंगांची उधळण करतो आणि सणाचा आनंद घेतो वाईट गोष्टी सोडून नव्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो तेच आम्ही या निमित्ताने अंगिकारले आणि विभिन्न पण इतिहासाचे साक्षीदार असणारे किल्ले आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती घेवून आम्ही नखशिखांत अभ्यासिक पातळीवर न्हावून निघालो.
पहिल्या दिवशी रामगड, भरतगड , भगवंतगड आणि सिंधुदुर्ग पहिले.किल्ल्यांची इथंभूत माहिती ट्रेक क्षितीज च्या वेबसाईट वर दिलेली आहे. वाचकांसाठी लिंक येथे प्रस्तुत करीत आहे.
चारही किल्ल्याचा विस्तार आणि त्याचं महत्व जाणून घेत ते इतिहासाचे कसे शिल्पकार आहेत आणि कोकणातील त्याचं महत्व नजरेस न पडेल तर नवल. भुईकोट आणि जलदुर्ग यांचा सुरेख संगम आपल्याला बघयला मिळतो.
दुसऱ्या दिवशी आम्ही परुळे मंदिर घुमडे देवीचं मंदिर आणि लक्ष्मि नारायण मंदिर तसेच यशवंत गड ( रेडीचा किल्ला ), तेरेखोल ( गोवा) आणि निवतीचा किल्ला पहिला. भुईकोट असूनही समुद्रकिनारा लाभलेले कोकणातील हे किल्ले दुर्ग शृंखले मधील शिरोमणीच आहेत.कोकणातील मंदिर विलोभनीय असून मनाला खूप शांतता लाभते. अधिक माहितीसाठी लिंक प्रस्तुत करीत आहे :
यशवंत गड (रेडीचा किल्ला ): http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Yashawantgad_(Redi_Fort)-Trek-Y-Alpha.html
तिसऱ्या दिवशी आम्ही असेच सुंदर इतिहासाचे ३ शिल्पकार पाहिले. त्यात छोटेखानी सर्जेकोट, विशिष्ट असा देवगड आणि सर्वांनी पहावा आणि इतिहास समजून घ्यावा असा विजयदुर्ग पहिला. अधिक माहितीसाठी लिंक प्रस्तुत करीत आहे:
विजयदुर्ग : माहिती अजून टाकायची आहे.
प्रत्येक दिवशी दुर्ग भ्रमंती करताना थकला भागला जीव जेवण्याच्या अधीन न झाला तर काय गोष्ट.कोकण आणि तेथील चमचमीत , स्वादिष्ट आणि रुचकर जेवण मनाला खूप भावलं प्रत्येक घासा गणिक तृप्तीचा ढेकर आल्यावाचून राहिला नाही.कोकण आणि त्यातही घरचं जेवण लीना सामंत मुळे सगळ कसा सुखकर झालं.या सुगरनीला माझा भरभरून आशीर्वाद.
जाणीवपूर्वक लक्षात ठेवून खवायांसाठी जेवण्यातील पदार्थांची यादी पुढीलप्रमाणे:-
शाकाहारी ( कोकणी पद्धतीचं): आमरस, सोल कढी, भेडींची भाजी,आंबोळ्या काळ्या वाटण्याचे सांबार, डाळ भात,शेवयी खीर,साबुदाणा खिचडी , पोहे आणि इतर
मांसाहारी ( कोकणी पद्धतीचं) : कोंबडी वडे, सुरमयी, सौंदiळे, बांगडा, कालव,कोलंबी आणि इतर.
यथेच्छ जेवण, दुर्गभ्रमंती, गावात राहण्याची मजा, निसर्गाच्या सानिध्यात हरवलेले मन, इकडून तिकडून बागडणारे स्वच्छंद जीव आणि आम्ही भटके एकत्र आलो कि ज्ञानाची देवाण घेवाण , मजा मस्ती, धमाल आणि संस्मरणीय असे कधीच न कोमेजणारे क्षण परत परत लाभो हीच सदिच्छा.- दीपाली रोहन पाटील
No comments:
Post a Comment