हेरिटेज वॉक - एलिफंटा ( घारपुरची लेणी )
- पौर्णिमा आल्हाट
हेरिटेज वॉक म्हणल की सगळी ऐतिहासिक वारसा असलेले शहरं आणि ऐतिहासिक ठिकाणांची नावे समोर येतात.... किल्ले आणि इतिहास या समुहा पासून तयार झालेला हेरिटेज वॉक हा एक छोटासा समूह ....हा समूह पुढे जाऊन अनखी मोठा बनेल या मध्ये काही वादच नाही..
या समुहाची खरी कल्पना ऐतिहासिक ठिकाणांची आवड न त्या मध्ये PHD करण्याची इच्छा असलेल्या अर्पिताची..
ऐतिहासिक ठिकाणांची माहिती जानुन घेण्याची उत्सुकता असलेल्यांसाठी व इतिहास प्रेमीं साठी हा समूह तयार करण्यात आला....
हेरिटेज वॉक ला किल्ले आणि इतिहास समुहा मधील मेंबर्स चा ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अपल्या या समुहा मध्ये दर महिन्यातून एक वेळेस ठराविक दिवशी ऐतिहासिक ठिकाणांला भेट दिली जाते तसेच भेट दिलेल्या ठिकाणा बदद्ल माहिती दिली जाते..
घारापुरीची लेणी
"एलिफंटा' या नावानेसुद्धा ओळखली जाणारी ही लेणी मुंबईच्या अगदी जवळ आहेत. पूर्वी या लेणीच्या बाहेर अखंड पाषाणात कोरलेले अजस्र हत्ती होते म्हणून याचे नाव ब्रिटिशांनी एलिफंटा ठेवले. आता ते हत्ती इथे नाहीत. यातला एक हत्ती आता भायखळा इथे असलेल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात ठेवलेला आहे.
या ठिकाणी येण्याचा प्रवाससुद्धा फारच रमणीय आहे. गेट वे ऑफ इंडियावरून बोटीने एक तासात आपण घारापुरी या बेटावर येऊन पोचतो. राष्ट्रकूट राजवटीमध्ये ही लेणी खोदली गेली. हे एक नितांतसुंदर शैव लेणे आहे. शैव संप्रदायातील पाशुपत या पंथीयांनी ही लेणी खोदल्याचे सांगतात.
भगवान महादेवाचे "सदाशिव' या रुपातले अत्यंत देखणे आणि जगप्रसिद्ध शिल्प या ठिकाणी पाहायला मिळते. पण केवळ काहीच माहिती नसल्यामुळे त्याला आपण त्रिमूर्ती असे वर्षानुवर्षे म्हणत आलो आहोत.
स्टेला क्रामरिश या परदेशी विदुषीने याचा सखोल अभ्यास करून ही मूर्ती सदाशिवाची आहे असे सांगितले. इथे शिवाच्या 5 तोंडापैकी 3 आपल्याला दिसतात. चौथे तोंड पाठीमागे तर पाचवे डोक्यावर असते असे समजले जाते. अघोर, तत्पुरुष, सद्योजात, वामदेव, आणि ईशान अशी त्या पाच मुखांची नावे आहेत. अतिशय देखणी, अतिशय उठावदार अशी ही मूर्ती आपली नजर खिळवून ठेवते. याच्याच शेजारी अर्धनारीश्वर शिव आणि दुसऱ्या बाजूला गंगावतरण शिल्प निव्वळ बघत राहावे असे आहे. शिवाचा विवाह प्रसंग उलगडून दाखवणारी कल्याणसुंदर मूर्ती तर त्याच्याच समोर शिवाचे अत्यंत उग्र रूप दाखवणारी अंधकासुर प्रतिमा म्हणजे या लेण्याचे वैभव आहे.
याच घारापुरी टेकडीवर काही तोफा आणि बौद्ध स्तूपाचे अवशेषदेखील सापडले आहेत. मुंबई भेटीत न चुकता याचा समावेश करायला हवा.
मागच्या अठवडया् मध्ये ४ जून रोजी मुंबई येथील एलिफंटा म्हणजेच घारपुरची लेणी येथे पहिला वॉक झाला, या वॉक मध्ये मुंबई आणि पुणे येथील लहानां पासून मोठयां पयँत एकूण १६ एलिफंटा लेणी बदद्ल ची माहिती जाणून घेण्याची इच्छा असलेल्या मेंबर्स ने सहभाग घेतला होता.
या वॉक ची सुरूवात पुणेकरांसाठी सकाळी ६ वाजता पुणे स्टेशन येथून व मुंबईकरांसाठी गेट वे आॅफ इंडिया येथून झाली. मीही पुणे मधील मेंबर्स सोबत 'हेरिटेज वॉक ' च्या पहिल्या वॉक साठी आले होते. 3 तास रेलवे च्या प्रवासा नंतर आम्ही सगळे मुंबई मध्ये पोहचलो. या पहिल्या वॉक ची उत्सुकता मला ही तेवडीच होती जेवढी बाकी मेंबर्सला. आम्ही सगळे १६जन किमान सकाळी 11 दरम्यान गेट वे आॅफ इंडिया जवळ भेटलो आणि आम्हा सर्वांचा ऐकमेकां सोबत परिचय झाला. १ तास लाइन मध्ये उभे राहिल्या नंतर आमचा बोटीने एलिफंटा लेणी च्या दिशेने प्रवास सुरू झाला. सोबत असलेले छोटे मेंबर्स सभोवती दिसत असलेल्या समुद्राच्या लाटांचा आनंद घेत होते तर काही जन त्या समुद्र किनारा वरती मानाने उभे असलेल्या मुंबई शहराला न्याहाळत होते तर काही दुरवरती दिसत असलेल्या एलिफंटा बेटा कडे अतुरतेने बघत होते.
जवळपास १तास बोटीच्या प्रवासा नंतर आम्ही सगळे एलिफंटा लेणी च्या बेटा वरती पेहचलो आणि लेणी च्या दिशेने चालू लागलो वाटे च्या दोन ही बाजूने झाडी आणि लहान दगडी शिल्पे तसेच अनेक दगडी वस्तूंची छोटी दुकाने वाटे मध्ये लागत होती...
अशाच एका झाडी मधे घरुन आलेले जेवणाचा सर्वानी मिळू न अस्वद घेतला आणि उत्सुकतेने पुढच्या वाटचलीला लागलो, थोडे अंतर चढून वरती गेल्यानंतर मुख्य लेणी दिसली आणि लेणी जवळ पोहोचल्या नंतर प्रचंड शिळे मध्ये कोरलेल मनमोहक शिल्पे होती, परंतु काही शिल्पाचं अवयव तुटलेले तर काहींचे नुकसान झालेले.... अर्पिता ने दिलेल्या माहिती नुसार इंग्रज येथे बंदुका चालवायचा सराव करायचे म्हणुन या शिल्पांची अशी अवस्था झाली असावी....
सोबतच या लेण्यां मध्ये एक मोठे शिवलींग आणि तीन मुख असलेली बुद्धांचे मनमोहक शिल्प आहे. प्रत्येक शिल्पे वेगळी आणि अतिशय सुंदर.. तसेच येथे १४. ०९. १९३० अशी जन्म दिनांक असलेली एक तोफ ही आहे....
असा हा एलिफंटा/ घारपुरीच्या लेणी चा सुंदर अनुभव डोळ्यांत साठवून आम्ही सगळे परत आपल्या घरांच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागलो... एलिफंटा लेणी चा हा पहीला हेरिटेज वॉक सर्वांसाठी स्मरणीय राहीला.... धन्यवाद 😊
- पौर्णिमा आल्हाट.

No comments:
Post a Comment